स्वप्नं - [बरेच दिवस या विषयावर लिहायचं मनात होतं . आज मुहुर्त मिळालाय !]
स्वप्न : खूप लोकांनी यावर आधीच लिहुन बोलुन ठेवलयं , स्वप्न का पडतात , त्यांना अर्थ असतो का , असतो तर नक्की ईन्टरप्रिटेशन कसं करायचं स्वप्नांचं , सगळ्यांना ब्ल्यॅक & व्हाईटच स्वप्ने पडतात की काहीना रंगीत ही पडतात , प्राण्यांना ही स्वप्ने पडत असतील काय ?? .....वगैरे वगैरे ...
या लेखात हे सारे चर्चेचे मुद्दे नाहीत .
मला तरी बर्याचदा फार विचित्र स्वप्न पडतात अन ती डेटेल्ड लक्षात ही रहातात , ती ऐकल्या वर माझे कित्येक मित्रांनी "Joke of the day " हा प्रतिसाद दिलाय !! अशीच स्वप्न ईतरांनाही पडत असतील काय या कुतुहलापोटी लिहितोय .....
मित्रांनो , तुम्हालाही पडतात का अशी काही खास स्वप्ने ? चला तर मग शेयर करुयात अशी काही स्वप्ने ...
(डिस्क्लेमर : स्वप्नं हा अत्यंत वैयक्तिक विषय आहे हे मान्य पण काय शेयर करावे काय करु नये हे कळण्याइतके सगळेच माबोकर सुज्ञ आहेत .)
मला काल ( की परवा? ) एक
मला काल ( की परवा? ) एक विचित्र स्वप्न पडलं .
स्वप्नात
महाराजांची कोणाशी तरी लढाई चालली होती ...वन टु वन ...
अन महाराज हरत होते
स्वप्नांची तर्हाही खूप
स्वप्नांची तर्हाही खूप मजेशीर असते.... आपली आवडी/ नावडीची माणसं त्यात लीलया डोकावून जातात....
माझ्या बाबांना भानुरेखा खूप आवडते.... सॉल्लिड फॅन आहेत तिचे ते.... एरवी हिंदी पिक्चर ढुंकून बघणार नाहीत, पण त्यात (उमराव जान, खूबसूरत, उत्सव स्टाईल) रेखा असेल तर थोडा वेळ का होईना, तिच्या कामावर, अदाकारीवर, अभिनयावर स्तुतीसुमने उधळत तो पिक्चर काही मिनिटे तरी पहातील....
तर एके रात्री रेखाचा टीव्हीवर पिक्चर लागलेला बघून बाबांची टीव्हीसमाधी लागली होती. अगदी डोलत होते तिच्या छबीकडे बघत एकटक. आम्ही त्यांना त्यावरून खूप चिडवले.
दुसर्या दिवशी दुपारी : बाबा भरपेट जेवून अम्मळ वामकुक्षीसाठी घोरासुराच्या आधीन झाले होते. दुपारच्या चहाचा दरवळ सुटला तसे आपोआप जागे झाले, पण जाम वैतागलेले होते. त्यांना कारण विचारले तर म्हणाले : भानुरेखा स्वप्नात आली होती. पांढरी साडी, लाल काठ, एक वेणी अशा वेषात... शनिपाराच्या बसस्टॉपवर हातात नायलॉनच्या दोन जाडजूड पिशव्या घेऊन उभी होती. मला म्हणाली, सध्या लिज्जतचे पापड विकत आहे, तुम्ही विकत घेणार ना?!!!!
त्यांचे ते कै च्या कै स्वप्न ऐकून आम्ही हसून गडाबडा लोळायचे शिल्लक राहिलेलो आणि ते स्वप्नात कधी नव्हे ते रेखा भेटायला आली आणि तीही पापड विकायला, म्हणून जाम उखडलेले! 
काय सुखी माणसे आहात
काय सुखी माणसे आहात रे.......... मला प्रयत्न करुनही स्वप्ने नाही पडत........

इठे येऊन वाचायला मजा येतेय्.......प्रगो (उर्फ कोदंडधारी राम) भारी शक्कल लढवलियेस....
मला जर कधी झोपेत काही दिसले तर त्यात प्रत्यक्षातल्या व्यक्ती आणि जागाच दिसतात. त्यांची सरमिसळ झालेली असते हा भाग वेगळा.......
सध्या पवई हे अयोध्यानगरी झालय........ कोदंडधारीचे हापिस हाय ना तिथे.....
जिना चढत/उतरत असताना मधल्या
जिना चढत/उतरत असताना मधल्या पायर्याच गायब आहेत असे स्वप्न अनेकदा पडते.
परीक्षा द्यायच्या वयात परीक्षेची कधी भीती वाटायची नाही. नंतर नोकरी करत असतानाही काही परीक्षा दिल्या...आयआयबी तसेच अन्य प्रोफेशनल कोर्सेसच्या...अभ्यास अर्थातच वेळेअभावी कसाबसा..झाला न झाला...असा. या परीक्षांची केंद्रेही अगदी मोजकी असायची अनोळखी भागातली...परीक्षा रविवारच्या त्यामुळे रस्त्यात कोणाला विचारावे इतकी वर्दळही नाही.. अशाच एका परीक्षेला सेंटर शोधत शोधत पाउण तास उशिरा पोचलो(३ तासाचा पेपर्)...आत घेतील का नाही ही भीती..पण घेतले की...प्रश्नपत्रिका पाहिली तर कळले की मला जेवढी उत्तरे येताहेत त्याचे शब्द मोजले तर त्यापेक्षा प्रश्नपत्रिकेतले शब्द जास्त भरतील. म्हणुन उत्तरपत्रिकेवरचे नियम वाचायलाअ घेतले...अहाहा...
परीक्षार्थीला एक तास उशिरा येण्याची मुभा....पेपर सुरू झाल्यावर एका तासाने पेपर देऊन जाण्याची मुभा...मग पहिल्या तासाच्या ठोक्याला टाकला की पेपर. पण त्याचा सूड तो पेपर माझ्या स्वप्नात येऊन अजून घेतोय.
तेव्हापासून अजूनही मला परीक्षेला जायला खूप उशीर झालाय, हॉल टिकिट मिळत नाही, ज्या पेपरला जावे त्यापेक्षा वेगळाच पेपर समोर येतोय, अशी सगळी स्वप्ने पडतात. तरी बरे नंतर नीट अभ्यास करून मी तो विषय सोडवला होता.
माझ्या स्वप्नात मवे सारखी
माझ्या स्वप्नात मवे सारखी सारखी येते...
अरुंधती तुझ्या दोन्ही पोस्ट
अरुंधती तुझ्या दोन्ही पोस्ट
नानबा छान माहिती!
मला एकदा एक दगडी गुढगंभिर, शांत देऊळ स्वप्नात आलं होत आणि नंतर अनेक महिन्यांनी ते प्रत्यक्षात दिसलं.
<अजूनही मला परीक्षेला जायला खूप उशीर झालाय, हॉल टिकिट मिळत नाही, ज्या पेपरला जावे त्यापेक्षा वेगळाच पेपर समोर येतोय, अशी सगळी स्वप्ने पडतात. > हो हो मलाही. आणि परिक्षा आहे हेच मी विसरलेय अस पण! दिवस्भर मग एक विचित्र भावना मनात साठुन रहाते!
प्रसाद काय स्वप्न आहे
मला एक स्वप्न सातत्याने पडतं.
मला एक स्वप्न सातत्याने पडतं. आज अॅल्जेब्रा / गणित / अकाऊंट्स चा पेपर आहे आणि आपण काहीही अभ्यास केलेला नाही. हे स्वप्न पुन्हा काल पहाटे पडलं. मी नेहमी प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत जागा होतो.
रच्याकने, शाळा-कॉलेज संपून अनेक वर्ष झाली, एवढंच नव्हे तर माझी पोरं शाळेत जायची वेळ जवळ आली तरी हेच स्वप्न का पडत असावं?
स्वप्नात कधी नव्हे ते रेखा
स्वप्नात कधी नव्हे ते रेखा भेटायला आली आणि तीही पापड विकायला >>>
मी एकदा संध्याकाळी
मी एकदा संध्याकाळी अजिंक्यतार्यावर जाउन बसलो होतो ...थंडगार वारा ...समोर सातारा....
नकळत डोळा लागला अगदी १०- १५ मिनिट फक्त ...तेव्हा...
" मला थंडी वाजतेय ...आजुबाजुला पांढरा शुभ्र बर्फ ...मी हिमालयात आहे !!!.....समोर शंकराचार्य स्थापित विष्णु मंदीर आहे ...( तेही ग्रीक स्टाईल मध्ये ..ते तशे उंच उंच खांब ...) ....
मी आत गेलो ... तिथे वर्दळ नाहीये फारशी ..... एक माणुस एका खांबाला टेकुन बसलाय ...निवांत .....दाढी वाढवलीये ...पण भगवी वस्त्रे नाहीयेत ...म्हणजे तो सन्यासी नक्केच नाहीये ...मी त्याच्या समोर गेलो ...तो अजुनही समाधीतच आहे ....मी नीट निरखुन त्याच्या कडे पहायला लागलो ...
त्याने अचानक डोळे उघडले ...अन त्याच्या त्या घनदाट दाढी मागुन मिश्कील हसला ...अन.....माझ्या लक्षात आले ..........."तो मीच आहे !!!"
मी अगदी खडबडुन जागा झालो .............
हे अगदी खरं स्वप्न आहे ...काही येक येक्ष्ट्रा नाय .....
बादवे माझ्या सगळ्या स्वप्नांव्हा शेवट असाच होतो ....ज्या सेन्ट्रल कॅरॅक्टर विषयी स्वप्न फिरत असतं तो मीच असतो
मला नुकताच पडलेल
मला नुकताच पडलेल स्वप्नः
(अॅस अलवेज!!!) मी बशीत बसलेले असते, (पण बस PMT ची नव्हती पिवळ्या रंगाची होती) बस एका गल्लीत येऊन थांबते आणी ड्रायव्हर मागे प्रवाश्यांकडे वळुन म्हणतो: "ह्या खेपेला जास्त वेळ लागला, ह्या आधीच्या खेपेला मी कमी वेळात इथे लोकांना घेऊन आलो" ... ड्रायव्हर कोण तरः "अक्षय कुमार"
काल मी आणी माझी मैत्रीण (रुम-मेट) एका गुंडाला पकडत होतो, एकदम बॉलीवुड टाईप प्लॅन होता , पोलीस पण होती पण आम्ही मुख्य भुमीकेत होतो ... स्वप्नात!
मला आपली परीक्षेला आहे अशी
मला आपली परीक्षेला आहे अशी घामाघुम करुन ऊठविणारी स्वप्न बरेचदा पडायची ऊठल्यावर लक्षात यायच अरे आता कसल्या परीक्षा शीक्षाण झाल की आपल
एकदा आपण दुसर्याच विषयाचा अभ्यास करुन गेलो आणी पेपर दुसर्याच कुठल्या तरी ईषयाचा होता अस पण सपान आलेल
नमस्कार काल मला एक स्वप्न
नमस्कार
काल मला एक स्वप्न पडले मला त्याचा अर्थ कळत नहिये पण असे वाटते कि काहितरि वाईट घडेल.
मी देवीची आरती करत होतो आणि अचानक तिचि मुर्ति कोसळली मी झट्क्न जागा झालो
कोनी सान्गेल का याचा अर्थ ?????????????????????????
मी देवीची आरती करत होतो आणि
मी देवीची आरती करत होतो आणि अचानक तिचि मुर्ति कोसळली मी झट्क्न जागा झालो
>>> लवकरच एक "देवी " तुमच्या प्रेमात "पडणार" आहे अन तुमची "झोप उडणार" आहे ...इतका साधा सोप्पा अर्थ आहे याचा
माझे कालचे स्वप्न- यात काहीही
माझे कालचे स्वप्न- यात काहीही अतिशोयोक्ती नाही-
माझ्या गावातल्या शाळेबाहेर सुनिल गावसकर चनेमने विकतो आहे, मी त्याला शेकहँड घालतो आणि विचारतो की साउथ अफ्रिका सेरिजमधे आपले काय होईल. त्यावर सुनिल म्हणतो की सेरिज १-१ टाय होईल.
त्याने एवढी टीप सांगूनही मी चनेमने विकत घेत नाहीच!
माझ्या कडे एक Russian maid
माझ्या कडे एक Russian maid महिन्यातुन एकदा घर साफ करायला यायची. तेव्हा मला एकदा स्वप्न पड्लेल कि मरिया शेरापोव्हा(tennis player) माझ्या घरि फरशी पुसते आहे.
-शिरीन
मला अगदी कालपरवा एक स्वप्न
मला अगदी कालपरवा एक स्वप्न पडलं ....." मी मुंबईत बिल्डर झालो होतो "
चला कमी किमतीतल्या फ्लॅटची
चला कमी किमतीतल्या फ्लॅटची सोय झाली! माबोकरांना आधी चान्स देणार ना?
मला काल पडलेल्या (विचित्र)
मला काल पडलेल्या (विचित्र) स्वप्नात मी माझ्या घरात खोदकाम करत होतो,पाण्यासाठी, मग चांगला ७-८ फूटाचा खड्डा काढला,खड्ड्यात मी उभा होतो, पण पाणी नाही दिसलं,नंतर अंगणात देखील खोदकाम केलं, नंतर मी एका नविन वेगळ्याच आणि अगदी अडचणीच्या, जुन्या जागेत खोडकामाची जागा शोधत्/ठरवत होतो, ते सगळं दृश्य आतादेखील मला स्पष्ट दिसतं !

जाणकारांना याचा काही अर्थ,उलगडा होत असेल तर जरुर सांगा...

गुदमरण्याच्या वरच्या
गुदमरण्याच्या वरच्या अनुभवावरुन आठवलं; हा प्रकार साधारण पणे अशा रितीने होतो. तूम्ही लावलेला सकाळचा गजर वाजतो, आवाज कानातून मेंदूपर्यंत पोहोचतो, मेंदूकडून कानांद्वारे येणारे एकण्याचे सिग्नल्स थांबवले जातात. मेंदू एक सुटेबल स्टोरी असलेलं स्वप्न बनवतो. रिवाईंड करतो. स्वप्नात आग वगैरे लागलेली दिसते, संबंधित अशा सगळ्या गोष्टी दिसतात. आगीचा बंब जाताना दिसतो, बंबाची घंटा वाजत असते, त्याच वेळेला एकण्याचे सिग्नल्स मेंदुकडून परत सुरु केले जातात. आणि तुम्ही गजर वाजत असताना जागे होता. हे सर्व अक्षरशः मिनीटभरात घडतं.... मेंदूच्या क्षमतेला आणि माणसाच्या शरिररचनेला सलाम.
वरचा पॅरा वैज्ञानिकदृष्ट्या संपूर्णपणे खरा आहे, निव्वळ ऐकीव नव्हे...
>>>>> या गोष्टीचा मी अनेकदा अनुभव घेतला आहे.
मला अगदी ढिगाने स्वप्न पडतात आणि आठवतात देखिल.. पण आता मी प्रयत्नपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करतो... पण काही स्वप्ने अगदीच विसरता येणार नाहीत.
स्वप्नांच्या मालिकाही पाहिल्यात. काही ठराविक स्वप्ने स्थळ-काळाच्या वेगवेगळ्या संदर्भासहीत पडतात.
हा धागा वर आणा
हा धागा वर आणा
मंदार_जोशी | 15 February,
मंदार_जोशी | 15 February, 2012 - 13:55 नवीन
हा धागा वर आणा
>>> मला तर आजकाल स्वप्न पडतच नाहीत
मला डॉक दिसले होते स्वप्नात
मला डॉक दिसले होते स्वप्नात पंत.!! का कोण जाणे!!!
आज प्रथमच पाहतोय हा
आज प्रथमच पाहतोय हा धागा......
मला एक पडलेल स्वप्न जे मी कधीही विसरू शकणार नाही.
सचिन तेंडुलकर, मी आणि विनोद कांबळी तिघे जानी दोस्त आहोत. सचिनच्या घरी आम्ही तिघे गप्पा मारत बसलो आहोत आणि सचिनच्या आईने आमच्यासाठी कोळंबी-भात बनवलाय.
(सचिनला कोळंबी फार आवडते अस वाचल होत कुठतरी... कदाचीत त्यामुळे)
आणि नेहमी पडणार स्वप्न म्हणजे मी कुठेतरी चाललोय आणि पायात चपला/बूट काहीच नाही आणि सगळ्या सप्नभर शोधत राहतो तरी सापडत नाहीत.
मला पण स्वप्नात कायम M3 चा
मला पण स्वप्नात कायम M3 चा पेपर येतो. मी धावत पळत परीक्षा हॉलमध्ये पोचतो आणि डेस्कवर बसल्यावर लक्षात येतं आपण हॉल तिकीट विसरलोय.
मग घामेघुम होत जाग येते
मला नेहमी स्वप्नात गणिताची
मला नेहमी स्वप्नात गणिताची परीक्षा आहे आणि माझा काहीही अभ्यास नाही, मी खुप घाबरलेली आहे असे येते.
मला लहानपणापासून जवळ जवळ २४
मला लहानपणापासून जवळ जवळ २४ वर्शापर्यन्त नागसापाची स्वप्न पडायची.....माझी घरची माणसे फार टरकलेली अशा स्वप्नाने एकदा..... लहानपणी(४-५ वर्शाची असताना) मला खूप ताप आला होता आणि मी रात्रभर डोळे उघडे ठेवून तिथे नाग आहे अस सतत बड्बड्त होते.. शेवटी बाबानी एक काठी आणून मला दाखवली आणि सान्गितल तो नाग इथे आला तर मी मारीन त्याला.... आणि गम्मत म्ह्ण़़जे मला तो नाग आणि ते सगळ अजून इतक्या वर्शानी स्पष्ट आठवत.... आता मला असली नागसापाची स्वप्न नाही पडत................ आता एकच स्वप्न पड्त माझा पेपर आहे आणि मी पेपर द्यायला जात आहे पण इतक्या अड्चणी येतात की मी १ तास उशिरा पोहोचते....
मला आपली परीक्षेला आहे अशी
मला आपली परीक्षेला आहे अशी घामाघुम करुन ऊठविणारी स्वप्न बरेचदा पडायची ऊठल्यावर लक्षात यायच अरे आता कसल्या परीक्षा शीक्षाण झाल की आपल >>>
मला तर हे स्वप्न महिन्यातून १ दा तरी पडतं. मी खूप घाबरते . जाग आल्यावर कळत आपला शिक्षण संपून ४ वर्षे नोकरी पण झालीये .
दुसरा स्वप्न म्हणजे माझ्या मागे बिबट्या किवा सिंह लागलेला असतो आणि मी आमच्या सोसायटी तून त्याला कुठे कुठे चकवत पळते . जोरात पळायचं असत पण पाय उचलत नाहीत . जाग आल्यावर काय बिनडोक स्वप्न होतं म्हणून हसू येत .
मध्यंतरी एक पडलेल
मध्यंतरी एक पडलेल स्वप्न...ज्याने मला हसु येत आनि घरचे घाबरतात.पहाटे कधीतरी मी झोपेत सगळ्यांना उठवुन वर्गणी मागत होते.माझी चुलत धाकटी बहीण जाम टरकलेली,,कारण मी तिच्या गालावर हात फिरवुन तिला जाग केल.,.आनि म्हणाले मला पैसे दे,,इतिहास संशोधक मंडळ स्थापण करायच आहे.
माझे सताड डोळे उघडे पाहुन घाबरली बिचारी. माझ्याकडे नाही म्हटली...मी म्हणाले हो का..बरं.. आनि परत स्वत:च्या जागेवर येऊन झोपले.... सकाळी ह्यातल काही आठवत नव्हत.
मला नेहमी पडनारे स्वप्न मी
मला नेहमी पडनारे स्वप्न मी पुलावरुन चालले आहे कधी गाडिवरुन कींवा चालत ,नदीला खुप पुर आला दुथडी भरुन पाणी वाहतेय्,पुलाचे कट्डे दिसतायेत पण पायाखालिन पाणि वाहतय जोरात आणि मी पार करतेय्...स्वप्नामध्ये गोळा येतो पोटात हे करताना. नेहमी पाण्याचीच स्वप्ने पड्तात त्यात पुल वेगळे असतात कींवा धरणाचा बंधारा असतो...पण मी बुड्त नाही कधी त्यातुन जात असते...आणि नेहमी स्वप्नात रात्रच असते...
Pages