स्वप्नं - [बरेच दिवस या विषयावर लिहायचं मनात होतं . आज मुहुर्त मिळालाय !]
स्वप्न : खूप लोकांनी यावर आधीच लिहुन बोलुन ठेवलयं , स्वप्न का पडतात , त्यांना अर्थ असतो का , असतो तर नक्की ईन्टरप्रिटेशन कसं करायचं स्वप्नांचं , सगळ्यांना ब्ल्यॅक & व्हाईटच स्वप्ने पडतात की काहीना रंगीत ही पडतात , प्राण्यांना ही स्वप्ने पडत असतील काय ?? .....वगैरे वगैरे ...
या लेखात हे सारे चर्चेचे मुद्दे नाहीत .
मला तरी बर्याचदा फार विचित्र स्वप्न पडतात अन ती डेटेल्ड लक्षात ही रहातात , ती ऐकल्या वर माझे कित्येक मित्रांनी "Joke of the day " हा प्रतिसाद दिलाय !! अशीच स्वप्न ईतरांनाही पडत असतील काय या कुतुहलापोटी लिहितोय .....
मित्रांनो , तुम्हालाही पडतात का अशी काही खास स्वप्ने ? चला तर मग शेयर करुयात अशी काही स्वप्ने ...
(डिस्क्लेमर : स्वप्नं हा अत्यंत वैयक्तिक विषय आहे हे मान्य पण काय शेयर करावे काय करु नये हे कळण्याइतके सगळेच माबोकर सुज्ञ आहेत .)
ह्याला स्वप्न आणी स्वर्गात
ह्याला स्वप्न आणी स्वर्गात खुद्द राम पडला असेल नवमीला, झीट येउन.. पत्ता चुकुन ह्याच्या स्वप्नात गेल्याबद्दल...
(No subject)
(No subject)
(No subject)
असं म्हणतात की पितर बाळाच्या
असं म्हणतात की पितर बाळाच्या रुपाने घरात आले असतील तर ते बाळ खूप रडतं. >> खरंय निंबुडा, माझ्या बहीणीच्या वेळी आईला एक वयस्कर बुटकासा सावळासा, मोठ्या कपाळाचा, सरळ रेशमी केसांचा कद नेसलेला पुरूष स्वप्नात आलेला. आईने ते स्वप्न तिच्या साबाला सांगितले. आजीच्या म्हणण्यानुसार ते आमचे पणजोबा होते. (आजीचे साबू) ते माझे आजोबा १२ वर्षांचे असतानाच वारलेले, फोटो वगैरेमध्ये बघून कळालं की हो तोच माणूस स्वप्नात आलेला. आज्जी म्हणाली बहुदा मुलगाच होईल. माझी बहीण झाली ती सेम तशीच दिसते. ती ३ महीने खूप रडायची. रात्रभर खूप खूप रडायची. तिचं नावराशीवरून अक्षर र / रा / रो आलेलं. (पणजोबांचं नाव रामचंद्र होतं) भटजींनी सांगितलं त्यावरून नाव ठेवा. तिचं नाव रोहिणी ठेवलं आणि ती रडायची बंद झाली. माहीत नाही खरं काय पण हा अनुभव घेतल्यामुळे असं वाटतं निंबुडा, तुम्ही म्हटलेलं खरं असावं
ह्याला स्वप्न आणी स्वर्गात
ह्याला स्वप्न आणी स्वर्गात खुद्द राम पडला असेल नवमीला, झीट येउन.. पत्ता चुकुन ह्याच्या स्वप्नात गेल्याबद्दल...>>>
पर्या माझी चेष्टा करतोस...पर्या
थांब , आता आज मीच तुझ्या स्वप्नात येवुन राडा करतो बघ !!
बाकी " गणिताचा पेपर " हे लोकांचे खास पेटंट स्वप्न असते ... मला मात्र आजही स्वाप्नात पेपर आला तर तो १० वी चा संस्क्रुतचा असतो !!
(अन कित्येकदा मी गणिते स्वप्नात सोडवतो , स्वप्नात प्रोग्राम्स लिहितो ....( अर्थात कागदावर लिहुन काढल्यावर कळंतं की ते कधीच बरोबर येत नाही
)
धम्माल च्या कम्माल स्वप्नं
धम्माल च्या कम्माल स्वप्नं आहेत एकेकांची! निखळ करमणूक!
तुम्ही लोक्स स्वप्नं फक्त बघता..... माझे वडील कधी काळी त्यांच्या लहानपणी स्वप्नात असताना उठून झोपेत (खरोखरी) चालत जायचे घराबाहेर...... रात्री नारायण पेठेतल्या घरातून बाहेर पडले की अनेकदा लकडी पुलावरच्या गार हवेने जाग यायची त्यांना! घरी परत आल्यावर आजी चांगलाच कान पिळायची किंवा पाठीत रट्टे द्यायची..... एकदा तर ते झोपेत गादीची वळकटी करुन तीही बरोबर घेऊन गेले होते!!!
त्यांची परंपरा अनेक वर्षे माझा चुलतभाऊ सांभाळत होता. खडकवासला/ पानशेतला एन.सी.सी. च्या कॅम्पला त्यांचा शाळेचा वर्ग गेला असताना ह्या साहेबांनी झोपेत धरणाच्या भिंतीपर्यंत, अगदी काठापर्यंत चालत जाऊन वर्गातल्या समस्त पोरांची झोप उडवली होती. नंतरच्या २ रात्री मास्तरांनी त्याला बेल्टने बांधून ठेवला होता तंबूत, झोपेत चालत जाऊ नये म्हणून!
आमच्या तिसर्या मजल्यावरच्या घरी हा पठ्ठा रहायला आला होता. माझ्या आईला रात्रीतून अचानक जाग आली तर हा आमच्या कसलीही जाळी/ ग्रिल वगैरे नसलेल्या बाल्कनीच्या कठड्यावर चढलेला व ''पतंग, पतंग'' करत पुढचे पाऊल हवेत (आणि मग पाताळात!!!!) टाकणार तोच आईने त्याला मागे खेचले, आणि मग साहेबांचा गाल चांगलाच रंगला!!! त्यानंतर तो आमच्या त्या घरी रहायला आला की आम्ही त्याचा एक पाय कशाला तरी बांधून ठेवायचो.
तो राहतो त्या भागात आजूबाजूला २०-२५ वर्षांपूर्वी शेतं होती. ह्यांची कॉलनी हीच त्या परिसरातील कॉलनी. तर हे साहेब रात्री बंगल्याच्या पुढच्या दारातून, पायात स्लीपर्स घालून, दाराची कडी काढून झोपेत जायचे बाहेर भटकायला..... चांगली चक्कर मारुन यायचे शेतात वगैरे..... येताना मागच्या दारात स्लीपर्स काढायचे (त्यांना चिखल, शेतातली माती वगैरे लागलेली असायची, पायजम्याच्या कडांना चिखल किंवा माती, गवताच्या काड्या लागलेल्या असायच्या ) आणि घरात येऊन पुन्हा गादीवर देह लोटून डाराडूर झोपून जायचे! काकू पहाटे उठली की तिला पुढचा दरवाजा कडी न लावलेल्या अवस्थेत आढळायचा! आणि दुसर्या दिवशी त्याला झोपेतल्या फेरफटक्याविषयी विचारले तर त्याला काही म्हणजे काही आठवायचे नाही!
त्याची बहीण आर्किटेक्चरला होती तेव्हा रात्री उशीरा ती व तिची मैत्रिण असाईनमेन्ट, ड्रॉईंग्ज वगैरे पूर्ण करत असायच्या त्यांच्या हॉलमध्ये! तर माझे बंधुराज मध्यरात्री, ठार झोपेत यायचे हातात झाडू परजत.... आणि फर्निचरच्या, दिवाणाच्या खाली शोधत बसायचे.... विचारलं तर सांगायचे, ''उंदीर शोधतोय!!!!'' किंवा तोंडानेही अनेकदा ''उंदीर, उंदीर....'', कधी ''झुरळ, झुरळ....'' असा जोरात बडबडत असायचा..... हा हा हा हा.... आणि त्याला त्या संदर्भात काही प्रश्न विचारले की त्यांची झोपेत अगदी तर्कसुसंगत उत्तरे द्यायचा तो!!! माझी बहीण व तिची मैत्रिण त्याला असे अनेक प्रश्न मुद्दाम विरंगुळा म्हणून विचारायच्या.... तो जरा वेळ खुडबूड करायचा.... काहीही सापडायचे नाही .... (कारण ते तिथे नसायचेच मुळी!!!).... मग त्याला सांगितले की ''जा, झोप आता'' म्हटल्यावर तो आज्ञाधारकपणे जाऊन झोपायचा!
त्याचे लग्न झाल्यावर मात्र परिस्थितीत सुधारणा आहे!
आता तो झोपेत हिंडत फिरत घराबाहेर जात नाही. मात्र त्याची बायको सांगते की तो कधीतरी रात्री मधेच झोपेत असंबध्द बरळत उठून बसतो, तेव्हा त्याचे डोळे टक्क उघडे असतात आणि प्रत्यक्षात तो झोपेत असतो, इकडेतिकडे काहीतरी शोधल्यासारखे करतो आणि त्याला सांगितले की,''झोप आता,'' म्हटल्यावर आज्ञाधारकपणे पुन्हा झोपून जातो! हाय का न्हाय मजेशीर???!!! 
''झोप आता,'' म्हटल्यावर
''झोप आता,'' म्हटल्यावर आज्ञाधारकपणे पुन्हा झोपून जातो" >>>>
लई भारी
हॉस्टेलला असताना माझं एकदा
हॉस्टेलला असताना माझं एकदा माझ्या रूमपार्टनरशी भांडण झालं. (तीच भांडली बर्का माझ्यासारख्या गरीब बापडीशी
) आणि तणतणत ज्युनिअर्सच्या रूममध्ये गेली झोपायला अंथरूण पांघरूण घेऊन. रात्री कधीतरी उशीरा दरवाजा वाजला. बघितलं तर ह्या मॅडम, झोपाळलेले डोळे, विस्कटलेल्या अंथरूण्-पांघरूणाचा घोळ घेऊन उभ्या! हसू दाबत विचारलं काय झालं, तर किरकिरत पुटपुटली... मुर्ख भुताटक्या कुठल्या! अख्खा दिवस बडबड कमी पडते तर रात्रीच्यापण त्रास देतात.
घडलेलं असं होतं. त्या दोघी ज्युनिअर्सना दिवसभराच्या घटना रात्री झोपेत बडबडायची सवय होती. आणि आज तर त्या गप्पा मारत असल्यासारख्या झोपेत एकमेकींशी बोलत होत्या, हसत होत्या. पुन्हा दोघींचे कलर्स पक्के, त्यामुळे हसल्यानंतर दातांची पांढरीशुभ्र कवळी फक्त हालताना दिसे अंधारात! माझी रूमपार्टनर फट्टू, एकवेळ गुंडांशी दोन हात करेल पण भूताचं नाव काढलं तरी पाचावर धारण बसायची.
डोक्यावर पांघरूण ओढताना मॅडमनी ऑर्डर सोडली..."लाईट घालवू नकोस, मला भिती वाटतेय..."
"वा.. इथे फाटलेय मस्तपैकी आणि ऑर्डर्स सोडतेय...!" असं पुटपुटत मीपण पांघरूण डोक्यावरून ओढलं (अहं घाबरून नाही काही.. लाईटीत झोप येत नाही म्हणून !
)
निंबुडा | 2 July, 2010 -
निंबुडा | 2 July, 2010 - 05:20
मला पूर्वी खूप वेळा मी खूप उंच ब्रिजवर आपल्याच नादात चढतेय असं दिसायचं आणि एका ठिकाणी त्या पुलाच्या पायर्याच संपल्यात पण मी लक्षात न येता तशीच पुढे पाऊल टाकतेय आणि खाली कोसळतेय असं दिसायचं पण जमिनीवर पोचण्यापूर्वीच जाग यायची. >>>> एक विचारु का?... कधी हे observe केले आहे का, की जेव्हा असे स्वप्न पडते त्यानंतर काही दिवसांमध्ये तुझी प्रगती होते आहे किंवा काहीतरी अनुकुल घडते आहे .... मी असे ऐकले आहे की जेव्हा कधी वरुन खाली पडण्याची स्वप्न पडतात तेव्हा तुमची प्रगती होते.. मला कधी पडली नाहीत म्हणुन check करते आहे.
एक विचारु का?... कधी हे
एक विचारु का?... कधी हे observe केले आहे का, की जेव्हा असे स्वप्न पडते त्यानंतर काही दिवसांमध्ये तुझी प्रगती होते आहे किंवा काहीतरी अनुकुल घडते आहे >> कधी लॉग नाही हो ठेवला घटनांचा. :-|
कधी लॉग नाही हो ठेवला
कधी लॉग नाही हो ठेवला घटनांचा. >>>
मला एखादं छानसं स्वप्न पडलं की तो दिवस खूप छान जातो येवढाच काय तो लॉग मी ठेवलाय :-|
मलाही चित्रविचित्र स्वप्नं
मलाही चित्रविचित्र स्वप्नं पडतात बरेचदा. उठल्यावर ती आठवतात सुद्धा. कधीकधी प्रत्यक्षात जे घडत असतं त्याचेही पडसाद स्वप्नांत उमटतात. म्हणजे खूप तहान लागली असेल तर खूप ऊन पडलंय आणि शोष पडलाय असं स्वप्न पडतं. शाळा-कॉलेजच्या दिवसांत आई पहाटे हाक मारायची तेव्हा उठून आवरायला लागलेय असं स्वप्न पडायचं. सगळ्यात कहर म्हणजे एकदोनदा मध्यरात्री मला कुणीतरी फासावर लटकवतंय असं स्वप्न पडलं आणि जाग आली तर कळलं की आमच्या बहिणाबाईंनी लोळत लोळत पाय माझ्या मानेवर टाकले होते आणि त्यामुळे गुदमरायला झालं होतं
निंबुडा, तुझा अनुभव विलक्षणच म्हणायला हवा !
स्वप्नांविषयीच्या काही
स्वप्नांविषयीच्या काही गोष्टी. बर्याचश्या वाचलेया, काही ऐकिवातल्या बर्याचश्या मनोरंजक; म्हणूनच लक्षात राहिलेल्या. मला स्वतःला गाढ(व शांतपणे झोपलाय) झोप लागते, स्वप्न क्वचित पडतात आणि लक्षातही रहात नाहित. जर स्वप्न पडलच तर त्याचा अर्थ एव्हढाच की तब्येत (बहुधा पोटच) बिघडलय किंवा बिघडणारे. एक दोनदा दिवसभराच्या घटनांशी संबधित स्वप्न पडलीत, पण भविष्याशी निगडीत असं काहीच नाही.
स्वप्न हा बर्येचदा अंतर्मनाचा खेळ असतो. एखादी व्यक्ती, वस्तू वा घटना सुप्त मनात नोटिस होउन रहाते आणि जागृत मन शांत झाल्यावर अंतर्मनाचे खेळ सुरु होतात. साधारणपणे, माणसाची झोप सलग गाढ नसते, तीला स्वतःचा ग्राफ असतो आणि तो हलकी -गाढ - हलकी अश्या क्रमाने असतो. एका रात्रझोपेत ह्याची साधारणतः दोन ते तीन सायकल्स पूर्ण होतात. हलक्या झोपेत अंतर्मन जोमात कार्य करते. अंतर्मनाची ही ताकद आपल्या फायद्यासाठी वापरली गेली आहे. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, शिवणयंत्र. हे बनवण्याआधी हाताने शिवायची पध्दतच अस्तित्वात होती त्यामुळे, शिवणयंत्र बनवून झालं पण त्या सुईत धागा ओवायची आयडिया मिळत नव्हती. शोधकर्त्याला रात्री पडलेल्या स्वप्नात एक राक्षस त्याला भाल्याने टोचत असताना दिसला, भाल्याला टोकाजवळ भोक होतं. जाग आल्यावर त्याने तशी सुई बनवून शिवणयंत्र बनवलं. आजतागायत तेच शिवणयंत्र (तेच म्हणजे तसेच ) आपण वापरतो. दिवसभर डोक्यात भुणभुणत असलेला प्रॉब्लेम स्वप्नात सुटल्याची उदाहरणं आहेत.
काही स्वप्न भविष्यकाळाची चाहूल देणारी असू शकतात, विशेषतः एकच स्वप्न वारंवार पडणे, काहिही रेफरन्स नसताना पडणारी स्वप्ने, ज्याने मन प्रसन्न होतं अशी स्वप्ने. स्वप्नात दृष्टांत झाल्याचेही किस्से आहेत. संपूर्णपणे अनोळखी व्यक्ती, वस्तू वा स्थळ स्वप्नात दिसण हे ह्या प्रकारच्या स्वप्नाच निदर्शक मानतात..
गुदमरण्याच्या वरच्या अनुभवावरुन आठवलं; हा प्रकार साधारण पणे अशा रितीने होतो. तूम्ही लावलेला सकाळचा गजर वाजतो, आवाज कानातून मेंदूपर्यंत पोहोचतो, मेंदूकडून कानांद्वारे येणारे एकण्याचे सिग्नल्स थांबवले जातात. मेंदू एक सुटेबल स्टोरी असलेलं स्वप्न बनवतो. रिवाईंड करतो. स्वप्नात आग वगैरे लागलेली दिसते, संबंधित अशा सगळ्या गोष्टी दिसतात. आगीचा बंब जाताना दिसतो, बंबाची घंटा वाजत असते, त्याच वेळेला एकण्याचे सिग्नल्स मेंदुकडून परत सुरु केले जातात. आणि तुम्ही गजर वाजत असताना जागे होता. हे सर्व अक्षरशः मिनीटभरात घडतं.... मेंदूच्या क्षमतेला आणि माणसाच्या शरिररचनेला सलाम.
वरचा पॅरा वैज्ञानिकदृष्ट्या संपूर्णपणे खरा आहे, निव्वळ ऐकीव नव्हे...
अगदी तसच जेव्हा डायनॉसोर्सचं
अगदी तसच जेव्हा डायनॉसोर्सचं पृथ्वीवर राज्य होतं, आणि आपण उत्क्रांत होत असलेले सस्तन प्राणी जीव घेऊन घाबरून त्यांच्यापासून पळायचो
नानबा उत्तम पोस्ट, मानवाचा 'कलेक्टीव्ह सबकाँशस' हा अत्यंत इंटरेस्टींग विषय आहे. जरुर लिही त्यावर.
सर्व सस्तन प्राण्यांना रेप्टाईल्सची भिती वाटते याचे कारणही हेच असावे.
मला कायम पडणारे स्वप्न - 'मी आणि बायको कुठल्यातरी अनोळखी हिलस्टेशनवर आहोत.
स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिसणे- डेजा वू; हा देखील नेहमीचा अनुभव. देजावू हा मनाचा खेळ आहे हे माहिती असूनही ते जेंव्हा होते तेंव्हा अंगावर काटा येतोच.
डेजा वू/ देजावू >>>> म्हणजे
डेजा वू/ देजावू >>>>
म्हणजे काय?
आमच्या (माझ्या आणि मोदकच्या) एका शालेय मित्राने असा प्रश्न उपस्थित केला होता की आपल्याला स्वप्नात अनोळखी व्यक्ती दिसू शकतात का? त्या मित्राच्या मते, असे होऊ शकत नाही. आपण पाहिलेलेच चेहरे आपल्या स्वप्नात येऊ शकतात. भलेही मग ते नकळत किंवा अप्रत्यक्षपणे पाहिलेले असोत. दिवसभरात आपल्याला कितीतरी चेहरे दिसतात. त्यांची आपल्याही नकळत आपल्या मनःपटलावर नोंद होत राहते. त्यांपैकीच चेहरे स्वप्नात येऊ शकतात. कुणाचा काय अनुभव आहे आणि मते आहेत या बाबतीत?
निंबुडा, देजा वू म्हणजे घडत
निंबुडा, देजा वू म्हणजे घडत असलेला प्रसंग/ दृश्य ह्या आधी घडून गेलेय/ आपण कोठेतरी पाहिले आहे असे वाटणे. त्याबद्दलची विकीची लिंक बघ इथे
दिवसभरात आपल्याला कितीतरी
दिवसभरात आपल्याला कितीतरी चेहरे दिसतात. त्यांची आपल्याही नकळत आपल्या मनःपटलावर नोंद होत राहते. त्यांपैकीच चेहरे स्वप्नात येऊ शकतात. >> नाही बॉ... माझ्या स्वप्नात खुप वेगवेगळे चेहरे येतात... (शक्यतो मला आजूबाजूला पाहीलेले चेहरे आठवतात... तेवढ्या(च) बाबतीत स्म.श. चांगलीय म्हणायची
आणि ते चेहरे मी कधीतरी दिसतील म्हणून शोधते... नाहीच सापडत बहुदा
दिवसभरात आपल्याला कितीतरी
दिवसभरात आपल्याला कितीतरी चेहरे दिसतात. त्यांची आपल्याही नकळत आपल्या मनःपटलावर नोंद होत राहते. त्यांपैकीच चेहरे स्वप्नात येऊ शकतात. >> नाही बॉ... माझ्या स्वप्नात खुप वेगवेगळे चेहरे येतात... (शक्यतो मला आजूबाजूला पाहीलेले चेहरे (जागेपणी) आठवतात... तेवढ्या(च) बाबतीत स्म.श. चांगलीय म्हणायची :फिदी:)
आणि ते चेहरे मी कधीतरी दिसतील म्हणून शोधते... नाहीच सापडत बहुदा
निंबुडा, प्रसाद, अरुंधती आणि
निंबुडा, प्रसाद, अरुंधती आणि अमित - तुमच्या पोस्ट आवडल्या.
>>''झोप आता,'' म्हटल्यावर आज्ञाधारकपणे पुन्हा झोपून जातो"
परीक्शेची स्वप्न मलाही बरेचदा
परीक्शेची स्वप्न मलाही बरेचदा पडतात.ईतिहास किंवा भुगोलाचा पेपर असतो. घरात काही कार्यक्रमनिमीत्त भरपुर पाहुणे आलेले असतात आणि माझा अभ्यास झाला नाहीये.
जेव्हा खरच परीक्शा चालु असायची तेव्हा हा प्रकार हमखास व्हायचा- आज मराठीचा पेपर देउन घरी आले,उद्याच्या फिजीक्सचा अभ्यास करुन झोपले की रात्री स्वप्नात सर्व मराठीची उजळणी करणार. सकाळी उठल्यावर ह्या सततच्या अभ्यासाने डोकं शिणुन जायचे. काही विश्रांती नाही मिळाली असे वाटुन चिड्चिड व्हायची.
असं म्हणतात की प्रत्येकालाच
असं म्हणतात की प्रत्येकालाच स्वप्नं पडतात. काहीजणांना ती आठवतात आणि काहींना आठवत नाहीत ( म्हणून त्यांना असं वाटतं की त्यांना स्वप्नं पडतच नाहीत. )
अंतर्मनात खोल काहीतरी असतं ते सूचकपणे स्वप्नात दिसतं.
मला काहीकाही स्वप्नं वारंवार पडतात. उदा. मी ट्रेनमधून प्रवास करते आहे. मधल्या एखाद्या स्टेशनवर कशाकरितातरी उतरते आणि माझ्या डोळ्यासमोरून ट्रेन निघून जाते. गाडीत माझे नातेवाईक आणि सामान असते. मी हतबल होऊन पहात रहाते. आता यांना गाठायचं तरी कसं आणि कुठे?
असंच आणखी एक नेहमी पडणारं स्वप्नं - माझी आज / उद्या परीक्षा आहे पण मला पोर्शनच माहीत नाहीये मग मी अभ्यास करणार तरी कसा.
अजून एक ... मी नाटकात काम करत्ये, थोड्या वेळात नाटक सुरू होणार आहे आणि मला माझे संवादच आठवत नाहीयेत. मी ब्लँक झाल्येय. आता मी स्टेजवर जाऊन काय बोलू मला कळत नाहीये. .... कधी कधी मात्र असं दिसतं की माझं काम चांगलं झालंय आणि लोक टाळ्या वाजवताहेत.
खूप वेळा मला स्वप्नात वाघ, सिंह दिसतात तर कधी साप दिसतात. मला या सर्वांची भीती वाटते.
या सर्व वेळी प्रत्यक्षात मला कसलं ना कसलं टेन्शन असतं असं माझ्या लक्षात आलं आहे.
असो.
प्रसाद, खुप धन्यवाद,या गहन
प्रसाद,
खुप धन्यवाद,या गहन विषयावर लेखन केल्या बद्दल (या विषयास वाचा फोडल्याबद्दल )
सगळीच स्वप्ने ही अर्थ हीन,जोक नसतात,
माझ तर काही अनुभवानंतर अस मत आहे की "काही स्वप्न" तरी (जी अगदी वेगळीच) ही नक्कीच पुढे घडणार्या गोष्टीबद्दल काहीतरी सांगण्यासाठी पडतात,फक्त त्याचा संदर्भ लावणे ,अर्थ काढणे जमले पाहिजे.
मी तर काल एक खुपच भयानक (खुप महिन्यांनतर) अगदी स्पष्टपणे एक स्वप्न पाहिलं,स्वप्नात भयानक कोसळणारा पाऊस पाहीला,त्याच्या (शुद्ध पांढर्या) धारा/सरी पाहिल्या,उंचावरुन्/डोंगरावरुन जोराने येणारे मोठे प्रवाह पाहिले,ते मी थांबलेल्या घरात जोरात शिरताना पाहिलं..
बघु आता पुढे स्वप्नात नेमक काय होत ते !
पुर्वी राजे लोक आपल्या
पुर्वी राजे लोक आपल्या दरबारात राजाला पडणार्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी खास लोक ठेवायचे, बर्याचदा या स्वप्नावरुन राजाला शत्रुच्या आक्रमणाची माहिती मिळायची ...
स्वप्नांचा अर्थ>>> यावर एक
स्वप्नांचा अर्थ>>>
यावर एक पुस्तक आहे Interpritation of dreams : sigmond froid !!!
एक संस्क्रुत पुस्तकही आहे नाव विसरलो !!!
मी तर काल एक खुपच भयानक (खुप
मी तर काल एक खुपच भयानक (खुप महिन्यांनतर) अगदी स्पष्टपणे एक स्वप्न पाहिलं,स्वप्नात भयानक कोसळणारा पाऊस पाहीला,त्याच्या (शुद्ध पांढर्या) धारा/सरी पाहिल्या,उंचावरुन्/डोंगरावरुन जोराने येणारे मोठे प्रवाह पाहिले,ते मी थांबलेल्या घरात जोरात शिरताना पाहिलं..
बघु आता पुढे स्वप्नात नेमक काय होत ते !
या वरील स्वप्नात तर मी पाहिलेल्या संदर्भ हे गुरुवार ,५ -ऑगस्ट ला रात्री झालेल्या लेहच्या ढगफुटी आणि पाऊस याबरोबर जुळण्यासारखे आहेत ...
मला आता पर्यंन्त पडलेली बरीच स्वप्ने ही वैयक्तिक,कौटुंबिक,मित्रांविषयी नंतर घडलेल्या घटना यासंदर्भात होती ,तर काही स्वप्ने ही राज्यात्/देशात पुढे घडलेल्या घटने संदर्भात होती ..
स्वप्न,वास्तव,योगायोग यात मला
स्वप्न,वास्तव,योगायोग यात मला शिरायचे नाही. पण
आजपर्यंत किमान ५-६ तरी मला अशी स्वप्न पडलीत की जी अक्षरशः खरी झालीत.
या सर्व स्वप्न पडण्याच्या वेळेत मात्र साम्य आहे. मंगळवार-पहाटे.
या व्यतिरिक्त मजेदार, विचित्र, अनाकलनिय स्वप्नांची संख्याही बरीच आहे.
पण मला नियमित स्वप्नं पडत नाहीत, क्वचितच पडतात.
अनिल, सहमत. मलाही अशी स्वप्न
अनिल, सहमत. मलाही अशी स्वप्न पडतात, आणि त्यात दिसणार्या घटना मी पुढे अनुभवतो देखील, पण त्या घटना काहि महत्वाच्या नसतात. उदा मला एका रस्त्याचे स्वप्न पडले, दोन्ही बाजूने मेंदीसारख्या झाडाचे कुंपण, त्यात मधेच एक गॅप. तिथून आता जाणारा एक कच्चा रस्ता. त्या वळणावर मी क्षणभर थांबतो आणि त्या रस्त्याने आत जातो.
आता हा रस्ता आणि वळण माझ्या आयूष्यात येणार हे नक्की, पण कधी, कुठे ते सांगता येणार नाही. आणि ज्यावेळी ते प्रत्यक्षात घडेल, त्यावेळी ते स्वन्प आठवेलही.
मला अनिल, आणि गंगाधर (आणि बाकिच्यांना देखील) असे सुचवावेसे वाटते, कि जे स्वप्न पडेल, ते इथे लिहून ठेवा. मायबोली कायम राहीलच, जर कधी ते प्रत्यक्षात घडले, तर पुरावा देता येईल..
प्रसाद..छानै रे हा धागा..
प्रसाद..छानै रे हा धागा.. अगदी हटके विषय आहे पण प्रत्येकाला काही मिळेलच शेअर करायला.. निन्बुडाचा अनुभव वाचताना काटे आले..
माझ्या नवर्याला गेल्या २० वर्षापासून एकच स्वप्न नेहमी पडायचे. बिलासपुरला असलेल्या त्याच्या बालमित्राकडे तो पत्ता काढत पोचायचा आणी त्याची भेट मात्र कधीच व्ह्यायची नाही.२०,२५ वर्षापासून भारतात राहात नसल्यानेलहाणनपणीचे धागे ही हरवले होते. एकदा नेट वरून त्या बाल मित्राच्या चुलत भावाचा पत्ता लागला जो अमेरिकेला स्थायिक झाला होता.. त्याच्याकडून सर्व फोन नम्बर वगैरे मिळाले.. फोन करण्यात महिना गेला.. महिन्याभरानन्तर त्याने एकदाचा फोन केला तर त्या मित्राच्या बायकोनेच फोन उचलला व सान्गितले कि तो मित्र महिन्यापूर्वीच हे जग सोडून निघून गेलाय.. त्या दिवसापासून आजतागायत नवर्याला ते स्वप्न कधीच पडले नाही.
मला स्वताला डेजा वू चा खूप अनुभव येतो..तोच तोच प्रसन्ग जागेपणीही दिसत राहतो..आणी मग काही
अवधीनन्तर तो प्रसन्ग खरा होतो.हे बहुतेक स्वप्नाऐवजी इन्ट्यूशन सदरात मोडेल
काही वर्षा आधीची ची एक घटना
काही वर्षा आधीची ची एक घटना आठवली. माझा भाऊ एस एस सी ला होता. पाहते उठून अभ्यास करायला त्याला कधीच जमायचे नाही. तो रात्रीच अभ्यास करीत असे. रात्रीचे दीड-दोन वाजले असतील त्याचे मन पूर्ण पणे अभ्यासात एकाग्र झालेले(अर्थात त्याच्या सांगण्यावरून). आणि अचानक धान्दरलेली मी त्याच्यापुढे प्रगट होऊन जोरात ओरडू लागते "अरे जा ना त्याला आत घे, त्याला लागलंय बघ किती.त्याला आत घे दार उघड." माझे डोळे आणि एकंदरीत माझे रूप बघून त्याला कळेच ना मी अस का वागतेय. तो जोरात ओरडला 'ए बये,वेड लागलंय का. चल जा जाऊन झोप.' मी पलटले अन तशीच जाऊन झोपले.
अभ्यास तर जाऊच दे जाऊन रजई तोंडावर ओढून असा झोपला...त्यानंतर त्याला म्हणे पुढच्या तीन रात्री पर्यंत माझ्या येऊन बोंबा मारण्याचा भास होत होता. विशेष म्हणजे दुसरया दिवशी सकाळी मला यातले काहीही आठवत नव्हते.
ते स्वप्न कुठले असेल त्याचा शोध मी अजूनही कधी कधी घेण्याचा प्रयत्न करते.
Pages