शेगावची हुकलेली वारी, आझाद हिंद एक्स्प्रेस आणि ममता बॅनर्जी

Submitted by नितीनचंद्र on 30 June, 2010 - 05:36

शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणे म्हणजे माझ्या आवडीचा विषय. वर्षात किमान एकदा ह्या वारीत गेले २३ वर्षांपासुन सलगता आहे. रविवार २७ जुनला माझा मित्र म्हणाला मला सुट्टी आहे आठवडाभर. चल जाउया का शेगावला ? आस्मादिक उडाले.
तु कधीही यायला तयार आहेस ना आठवडाभरात ? मित्र हो म्हणाला.

सोमवारी २८ तारखेला ई बुकींगला हात घातला. अहो आश्चर्यम ? चक्क तात्काळ च्या कोट्यात एक दिवस उलटला तरी २५ बर्थ शिल्लक होते आझाद हिंद गाडीला. दुसर्‍या महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि नागपुर सुपर फास्ट मात्र फुल होत्या.

मी तात्काळ, तात्काळ कोट्यातुन २९.०६.२०१० ला संध्याकाळी ६.२५ ला सुटणार्‍या आझाद हिंद एक्स्प्रेस चे दोन बर्थ रिझर्व्ह केले. फोना फोनी होऊन परस्पर पुणे रेल्वे स्टेशनवर यायचे ठरले.

मी वेळेवर पोहोचलो. मित्रही भेटला पण चेहेर्‍याचा रंग मात्र फिका झाला होता. दिवसभर पोट बिघडल्यामुळे हैराण झालेला पण रेल्वेने जायचे म्हणजे अडचण नाही या भावनेने औषधे गोळ्या घेऊन प्रवासाला सज्ज झालेला. शहाणपणा म्हणुन मी इलेक्ट्रॉल पण बरोबर घ्यायला लावले.

संध्याकाळी ६.१५ झाले तरी गाडी लागली नाही म्हणुन चौकशी केल्यावर कळाले की ही गाडी रात्री २.२० मिनीटांनी सुटेल. असे का म्हणुन विचारले असता अ‍ॅक्सीडेंट झाला होता असे एक अधीकारी म्हणाला. एक हमाल हसत होता. त्याला बाजुला घेतल्यावर कळाले की प. बंगालमध्ये नझलवाद्यांनी बाँबस्फोट केल्यानंतर मा. रेल्वेमंत्री दिदी ममता बॅनर्जी यांनी उत्तर पुर्व भारतात रात्रीच्या गाड्या चालवु नयेत असा आदेश दिला याची अम्मलबजावणी अशी झाली.

लै भारी भारत देश. जसे काही नक्षलवाद्यांना सुर्याचा प्रकाश पडल्यावर जसे काही निशाचर आंधळे होतात तसे काहीसे घडत असावे असा समज करुन हा आदेश दिला असावा असे वाटते. दर्द से दवा खतरनाक असा हा अनुभव आहे.

लोकांना काहीही खबर नाही. रिझर्वेशनच्या विभागात असा कुठलाही बोर्ड नाही. इ तिकीटावर Departure time printed on the ERS is liable to change. New time table from 1st July 2010 असा शेरा नंतर दिसला जो मागच्या आठवड्यात केलेल्या अहमदाबादच्या प्रवासाच्या वेळी सर्वसाधारण सुचना म्हणुन होता. यातुन अस काही होईल असे वाटले नाही.

मग प्रवास रद्द केला. बसने जाणे मित्राला अश्या अवस्थेत घेऊन जाणे शक्यच नव्हते. वारी हुकली. विचार केला कॅलेंडर वर्ष संपायला अजुन पाच महिने आहेत पाहुया नंतर जाऊ.

गमतीचा भाग असा. आझाद हिंद या लांब पल्याच्या गाडीचे रिझर्वेशन एजंटांच्या विळख्यातुन सुटले याचे आश्चर्य वाटले पण ते ऑफ सिझनमुळे असेल अशी समजुत करुन घेतल्यामुळे फसगत झाली. रेल्वेने असे पेपरमधे जाहीर करावे अशी जबाबदारी रेल्वेने घेतली नाही. किमान पक्षी ई तिकीटावर असा स्पष्ट संदेश देण्यात यावा अशी खबरदारी घेण्याची भारतात प्रथा नसावी.

मग पुन्हा पैसे परत मिळतात का हे पहाण्यासाठी इंटरनेवर पाहीले असता आरक्षण चार्ट तयार झाल्यामुळे इ तिकीट रद्द करता येत नाही असा संदेश मिळाला. साधारण पणे २ ते ४ तास आधी आरक्षणाचा तक्ता तयार होतो. इथे मात्र तो जुन्या वेळेला म्हणजे दुपारी २ वाजल्या पासुन ४ वाजेपर्यत केलेला असावा म्हणजे बदललेल्या वेळेच्या चक्क १० ते १२ तास आधी. इकदा इ तिकीटावर आरक्षण चार्ट तयार होईपर्यतच रद्द करण्याची सोय आहे असे लिहीले की कोण जातो पैसे परत मागायला ? टी डी आर प्रोसेस मधे पैसे परत मिळवण्याचा अर्ज करा हा संदेश नव्हता.

एक धमकीचा इमेल केला. बॉब्म स्फोट करीन असा नाही तर ग्राहक न्यायलयात जाईन असा. लगेच आज सकाळी उत्तर आले की टी डी आर मधे अर्ज करा. कसा करा. कुठे करा काहीही माहिती नव्हती. मी त्याच इमेल ला उत्तर लिहीले व हाच अर्ज असे गृहीत धरुन पोच द्या असे सांगीतले.

थोड्यावेळाने उत्तर आले की ज्या तिकीट बुकींगच्या साईटवर बुकींग करता येते तिथेच हा प्रर्याय उपलब्ध आहे. ३० दिवसांनी पैसे पर मिळणार की ९० दिवसांनी याबाबत रेल्वेच्या अधिकार्‍यांची दोन मते आहेत पण पैसे परत मिंळु शकतात याबाबत एक वाक्यता आहे. लै उपकार झाले देवा किमान अर्जाचा पर्याय ठेवला. भारत हा महासत्ता होण्याच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांपैकी हे एक धाडसी पाउलच आहे.भारतात लवकरच ईक्रांती घडणार यात शंकाच नाही.

मिळालेच पैसे तर लिहीन बापडा विपु मधे. तुम्ही मात्र इ तिकीट घेणार असाल तर जरा जास्त जागरुक रहा येव्ह्ड्यासाठी हा लेखनप्रपंच.

गुलमोहर: 

लै भारी. अजब तुझे सरकार! उद्या युआयडी कार्ड आल्यावर सुधा रेशनकार्ड आणि पॅनकार्ड ची कॉपी जवळ बाळगा म्हणणारे अधिकारी असतील. खरंच ई बुकींग ची भीतीच वाटते.

करुया शेगावला गटग. आनंदसागरच्या साक्षीने पण हिवाळ्यात, उन्हाळ्यात नको.

माझ्या निस्सीम शेगावभक्त मित्राचं नेहमी सांगणं असायचं कीं महाराजांच्या ईच्छेशिवाय त्यांच दर्शन होणं नाहीच !
नागपूरहून मुंबईला येताना एकदां आमची गाडी शेगाव स्टेशनला अडकली कारण पुढच्या स्टेशनजवळ एक मालगाडी रुळावरून घसरली होती. पाय मोकळे करायला स्टेशनबाहेर आलो, तर टांगेवाले आग्रहाने अर्ध्या तासात दर्शन घडवून परत आणतो म्हणून मागे लागलेले. म्हटलं, हा दर्शनाचा योगच जुळून आला आहे. इतक्यांत स्टेशनचा लाऊडस्पीकर गरजला " मुंबईकडे जाणार्‍या पॅसेंजर्सनी तयारीत रहावं; त्याना एसटीच्या गाड्यांमधून पुढच्या स्टेशनवर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे व तेथून रेल्वेने मुंबईला जाण्याचीही ". आम्ही जवळ जवळ तीन तास एसटीच्या गाड्यांची वाट पहात शेगाव स्टेशनवर होतो, पंधरा वेळा जावून "चौकशी" केली कीं आम्ही अर्ध्या तासात दर्शन करून आलो तर चालेल का ? "एसटीच्या गाड्या आत्ता येतील व त्या तुम्हाला चुकल्या तर आम्ही जबाबदार नाही" या धमकीशिवाय उत्तर नाही ! तीन-साडेतीन तास माशा मारत बसलो होतो पण इतक्या जवळ जाऊन दर्शन नाहीच ! अजूनही तो योग आलेला नाही. मित्राचं म्हणणं आठवलं व पटलंही.
नितीनजी, महाराजांच्या इच्छेशिवाय कुणालाही दर्शन मिळणार नाही याची तर रेल्वे खबरदारी घेत नसेल ना !

चांगला लेख...मा़झ्या आईवडीलांना मावशी-काकांसोबत शेगावला जाणार्‍या लोकांपैकी २ जणं ऐन वेळेस रद्द झाल्याने अचानक तिथे जायचा योग आला होता. मला काही अजुन जाता आलंय नाही. महाराजांच्या ईच्छेशिवाय दर्शन नाही, हे अगदी पटलं. साईबाबांचं पण अगदी अस्सच आहे, गेल्या ३ वर्षांपासुन शिर्डीची वारी मनात आहे..पण.. Sad