Submitted by गणेश भुते on 10 April, 2008 - 04:34
पुन्हा एकदा नेहमीसारखी
एक आठवण व्याकुळ करते
आज या एकांती
नैराश्याचे रंग भरते
माझ्या बोटांचा तुझ्या गालांना
पहिलाच तो स्पर्श होता
तुला रंग लावताना
उरात अनोखा हर्श होता
दवातल्या पाकळीसारखी
तू थरथरलीस लाजुन
गोर्या गालावर राहिला होता
तो गुलाबी रंग सजुन
त्या दिवशी बराच वेळ
'तो' रंग तू जपलास गाली
ती एकच 'रंगपंचमी'
आयुष्यात अविस्मरणीय झाली
-गणेश भुते
(माझ्या 'अलगद' या काव्यसंग्रहातुन)
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे
छान आहे आवडली