आज

Submitted by coolKetan on 10 April, 2008 - 01:43

आज सुचले जग नवे
दीस चांदण्यांचे थवे
मी हरवलो
मी बरसलो
मी गवसलो माझ्यासवे
आज मजला काय हवे

आज दीधले दान नवे
मागतो ते न मागवे
मी कफल्लक
मीच तल्लख
मीपण मजला दिले
आज मजला काय हवे

आज प्राशिले घाव नवे
का कुणास हे हवे हवे
मी चिरडलो
मी रगडलो
मीच घडलो हे मीपण नवे
आज मजला काय हवे

गुलमोहर: 

कुल रे...सुंदर.