रायगड वारी ची गोष्ट (सचित्र: नीलवेद यांच्या सौजन्याने)
रायगड वारी ची गोष्ट
नीलने तारीख ठरवली बुकींग केलं आणि १९जुन ला "रायगडची वारी" ठरली
तुम्हाला कदाचीत वारी वारी हे वाचुन तुम्हांला कदाचीत वेगळ वाटेल पण भारतातल्या किमान महराष्ट्रातल्या प्रत्येकाने बघावं वाचाव, डोळ्यात आणि मनात साठवावं अशी ही महराष्ट्राची पुण्य भुमी,मर्मभुमी,कर्मभुमी ........
रायगड हे सहलीचं किंवा थंड हवेचे ठिकाण नाही ती आहे मराठ्यांच्या,हिंदुंच्या स्वतंत्र भुमीचा हुंकार आहे...
मी प्रत्येक वेळी निराळा रायगड पाहीलाय. तुम्ही ज्या उद्देशानी तो पहाल तसाच तो तुम्हाल दिसेल , कोणाला तिथली हिरवाई आवडेल तर कोणाला त्या रानावाटंवरच पक्षी सौंदर्य.काही जण त्या ताशीव मजबुत कडेकपारींना आव्हान देत चढाइचे धडे गिरवतात तर आमच्या सारखी काही जण तीथल्या आवशेषांमधील हरवलेला इतिहास शोधत फिरतात.
या वेळी थोडा वेगळा उद्देश घेउन तीन मायबोलीकर निघालो रायगडच्या डोगर उतारांवर बिजारोपण. ठाण्याच्या हरीयाली या संस्थेंकडुन १०० बियांच एक अशी ६ पाकीट घेतली. या बीया गडाच्या उतारावर लावायचा जेणेकरुन पावसांनी होणारी मातीची धुप कमी होउन दरडी कोसळंण्याच च प्रमाण कमी व्हावं.
शुक्रवारी रात्रीच्या पिंपळवाडी-महाड बसनी आम्ही ठाण्याहुन निघालो मी निल, आणी कट्ट्याचे मालक विनय.आमच्यासारखाच आणखीही एक ग्रुप होता झुंजार हायकर्सचा. त्या सगळ्या तरुणाइला लाजवेल अशा उत्साहात एक काकुही त्यांच्या बरोबर सामील झाल्या होत्या.गणपतीबाप्पा मोरया, आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय चा घोष झाला आणि कंडेक्टर मामांनी बेल दिली.आमचे ड्रायव्हर मामाही पायलट असल्याचा अंदाज गाडी बेलापुर पनवेल हायवेला लागल्यावर आलाच. आजुबाजुचे सहप्रवासी, चाकरमानी मोठ्या कुतुहलानी हे सर्व पहात होते.रायगड, आणि इतर केलेल्या ट्रेकच्या आठ्वणी वर गप्पा मारत मारत पनवेल कधी आले कळ्लेच नाही पनवेलला बस फुल्ल झाली. मग मात्र मालकांनी ८ तास झोपेचा नियम सांगत सरळ खिडकीवर डोके ठेउन ताणुन दीली.पहाटे ३ ला इंदापुर डेपोत बस पोहोचली. मी आणि नील खाली उतरुन चहा(कम गरम पाणी) कॉफी (कम पाणी घातलेलं दुध) मालकांची साखरझोप जरा मोडलीच होती. बरोबर चारच्या ठोकयाला बस महाड डेपोला पोहोचली. खाली उतरुन चहा(हा प्रत्येक ठिकाणचा वेगळा आसतो) झाला. तोपर्यंत झुंजार चा ग्रुप पुढे जाउन चौकशी करुन आला आणी रायगडची बस ५ ला आहे असं समजलं. मग एकमेकांशी ऒळख, गडाच्या वाटांची चौकशी, इतिहासाची(गडाच्या) देवाणघेवाण झाली. बस आली घाइत सर्वांनी जाग पकडली पण "ही बस खराब आहे डेपोतुन दुसरी येइल" अस सांगत परत महामंडळानी आपलं अस्तीत्व दाखवल. शेवटी ही नाही, ती करत बस मिळाली आणी आम्ही पाचाड पायथ्याशी पोहोचलो.
रायगड पाहायाची सुरवात ही नेहीमी पाचाड्च्या कोटातुन करावी जिजाउंची समाधी पाचाडचा कोट,ज्या ठीकाणी बसुन आउसाहेब रयतेचा निवाडाकरत ती लोडबाव किंवा तक्क्याची विहिर.
ज्या मातेनी हा राजा घडवला त्या राजमातेला मनोमन प्रणाम करावा आणि मग निघावं हिंदुपतपातशाहीच्या आजिंक्य अजोड बेलाग राजधानीकडे.
आम्ही ही निघालो वाटेत पाचाडला देशमुखांच्या हॉटेलात गरमागरम पोहे, चहा(!!)न्याहारी झाली.मग मात्र गडाकडे जाणा-या वाटा खुणावु लागल्या. केवळ गडावरच नाही तर गडाच्या पायथ्यापासुन पाहा-या जागा दिसु लागल्या. चित्याचे डोळे हे अशीच एक जागा. सरळ कातळ पहाडात दिसणारी गुहांची दोन भोकं दुरवर नजर ठेवता येइल अशी गस्तीची चौकी.
हीरवा पहाड, नागमोडी पाचाड खिंड पहातच रायगड पायथ्याला पोहोचलो.एकीकडे खुबलढयाचा बुरुज, तर दुसरी कडे दुरवर दिसणारी आंधारीचे गुहा, सहज नजरेच्याटप्प्यात येइल अशी तटबंदी, आणि महाद्वाराचे बुरुज.
पहील्या पायरीपाशी वाकुन महारांजाना, मुजरा घातला आणी गड चढायला सुरवात केली. एका हाताकडे डोंगर कातळ तर दुस-या बाजुला खोल खोल होत जाणारी धुक्यानी भरलेली दरी.
पहील्याच खुबलढा बुरुजाशी जायचा प्रयत्न केला तर २ वांदरांनी रस्त्यावर ठाणं मांडल होत.उत्साहात फार पुढे न सरकता आम्ही परत पाय-यांकडे वळलो.शासनाच्या क्रुपेनी आडनिडया का होइना पण ब-यापैकी पाय-या आहेत.तरीही दमछाक होतेच.
वाटेवरचे सुंदर धबधबे,हिरवीकचं झाडी, आणी यासगळ्यांना पुरुन उरणारी नीरव शांतता. मधेच कोणी उत्साही वीर अचानक महाराजांचा जयकार करतो आणी मग सगळ्या खो-यातुन त्याचे पडसाद घुमायला लागतात.
या वाटेवर एक जागा अशी आहे की त्याची मला नेहेमी भीती वाटत होती. "वाळुसरे खिंड". मागच्या वेळी भल्या पहाटे ५ वाजता ऎन जुलैच्या धो-धो पावसात मी एकटा ही वाट उतरताना याच ठीकाणी मी अड्कुन पडलो होतो.१५/२० फुटाचं अंतर मी चक्क रांगत रांगत पार केलं होत. आत्ताही मी नीलला सावध केलं माझ्या जवळच राहायला संगितल आणी एकदाची ती खिंड पार केली.जसे जसे पुढे जात होतो तसे टकमचे टोक खुणाउ लागले. आणी महा दरवाज्याचे तटबंदी दिसु लागली.जवळ-जवळ ११०० पाय-या चढुन गेलं की महादरवाजाची तट्बंदी लागते. जय-विजय नावाप्रमाणेच हे दोन बुरुज आणि त्यात बेमालुमपणे दडलेला महादरवाजा.गोमुखी रचना हे खास शिवकालीन द्वारांच वैशिष्ठ सरळ चाल करुन शत्रु दरवाज्यापर्यंत पोहोचु शकत नाही जो पोहोचेल तो तटातल्या जांगी मा-यातुन वाचु शकत नाही.आजही दरवाज्यातल्या आडसरांच्या जागा,सांडपाण्याची भोक व्य्वस्थीत दिसतात.
महादरवाज्याच्याआतील बाजुस अर्धवट शिल्ल्क असलेला शिलालेख दिसतो.सरकारी गलथानपणाचा संताप यावा असा हा प्रकार. कोणीतरी लिहीलेली नाव पुसण्याकरता चक्क रंगाचे थर त्यावर देउन त्या सुंदर वास्तुकलेची वाट लावलेली (आणी हे सगळं गड संवर्धनाच्या नावाखाली)
महाद्वार,तटबंदी,पार करत वर पोहोचल्यावर सर्वात पहील लागलं ते चांभार टाकं. त्यावर सुंदर (पण भग्न)अशी मारुतीची मुर्ती. सहसा मारुती हा पर्वत किंवा गदा धारी असतो पण रायगडचे सगळे मारुती हे पायाखाली आणि शेपटीत कोणला तरी(बहुदा राक्षस असावेत) पकडुन ठेवलेले असे आहेत.गडमाथ्यावर सगळीकडे धुकं पसरलेल आणी त्यातुन वाट काढत आम्ही होळीच्या माळावर पोहोचलो.दुरवर पसरलेलं पठार, एकीकडे नगरपेठ आणी जणु गडावर नाही तर स्वराज्यांवर पोहोचेल आशी भेदक नजर असलेला महाराजांचा पुतळा.
महाराजांना मुजरा करत जमलेल्या सर्वांनी जयकार केला. तसेच मागे जाउन नगारखान्यात(हेही नाव चुकीचं आहे) पहात राज्याभिषेक ठीकाणी मेघडंबरीपाशी पोहोचलो. हा सर्व सदरेचा भाग अतीशय सुंदर आहे. ध्व्नीचमत्काराचा अनोखा अनुभव ही घेतला.संपुर्ण सदरे वर कुठेही कुजबुजलं तरी मेघडंबरीपाशी ते स्वछ: आवाजात एकु जात, पण मेघडंबरीच्या चौथ-यावरचं बोलणं मात्र समोरुन सुद्धा एकु येत नाही. ही करामत त्या हिरोजींचीच. राजापर्यंत प्रजेची गार्हाणी पोहोचावीत पण प्रधानांबरोबर चाललेली राजकारण चर्चा सर्वांपर्यंत पोहोचता कामा नये. सदर, शिवसदन बघितलं. येवढी पायपीट झाल्यावर पोटात कावळे ओरडायला लागलेले होत. मग तडक सर्व जोगांकडे मुक्कामाकडे पोहोचलो.गरमा गरम मिसळ, बिस्किट,बाकरवडी असा भरपेट न्याहारी झाली.सकाळचे ११.३० वाजले होते उन पाउस धुकं असा खेळ चालुच होता. आम्ही जरुरीपुरतं सामान, खुरपण्या, बिया घेउन निघालो.
कुशावर्ताच्या बाजुनी डोंगर उतारावर थोडं खुरपायचं बिया टाकायच्या आणि माती सावडत पुढे चालायचं अस करत आम्ही परत होळीच्या माळाकडे आलो.
होळीचा माळ बाजार पेठेतुन चालत निघालो तर मालकांना काठी चालवायची तीव्र इच्छा झाली सहज म्हणुन मीही मग दंडाचे प्रकार करुन बघीतले तर मागे हटत मालक म्हणले, "ओ आण्णा फक्त फोटोसाठी पोझ घ्या हो..."
मग फोटो घेउन आम्ही टकमक कडे मोर्चा वळवला कच्चं उनं पडल होत. टकमकवरुन चहुकडे दरी कोकणदिव्याची दुरवर पसरलेली रांग पाहीली. तिथुन दिसणारा अंधारीचा रस्ता, मशीदमोर्चा,गोदावरीचे समाधी पाहीली. यासगळ्या भव्य निसर्गाच्या पसा-यात पहातानाच आपण कीती लहान आहोत हे जाणीव मनाला टोचत होती. दुपार होत आली होती नीलने सकाळीच रमेशकडे (ही सगळी अवकीरकर मंडळी नीलच्या खास परीचयातली) जेवण सांगुन ठेवलं होत. गरम गरम पिठ्लं, भात आणी तांदुळाच्या भाकरी. सगळं चुलीवर बनवलेलं, नेहेमीपेक्शा चारघास जास्तीच जेवलो.
पुढचा रस्ता भवानी टोकाकडे जाणारा. या रस्त्यावर सहसा कोणी येत नाहीत.वाटेत काही ठीकाणी तळी आहेत यात जगदीश्वर(वाडॆश्वर)मंदीराचं, शिवसमाधीच सुंदर प्रतीबिंब पहायला मिळालं. भवानी टोकाकडे जाताना वाटेत मलाही जरा चक्करल्यासारख झालं मग तीथुन परत फिरुन मागे दारु कोठारापाशी आलो.या ठीकाणचे उध्वस्त झालेली जोती -दगड जरावेगळे वाटले म्हणुन तसेच दगड पहात पुढे सरकलो, याप्रकारचा दगड गडावर इतरत्र:दिसत नव्हता, परत खात्री केली आणी बहुदा इंग्रजांनी (किंवा घातपाताने) दारुकोठार फुटल्यामुळे या दगडांचा वरचा भाग वितळला आसावा.
हे दगड प्रयोगशाळेत तपासण्याकरता बरोबर घेतले आणी परत वाडेश्वरच्या दिशेला निघालो. शिवसमाधीपाशी पोहोचलो. इथे परत झुंजारचा ग्रुप भेटला. इतरही अनेक जण आले होते.सगळी तरुणाई दिसत होती, पण खेद वाटला त्याना राजाच्या समाधीचा आब कसा राखावा हे कळत न्हवत.काही जणांना समजावल्यावर त्यांनी एकलं .
गडावर गेल्यावर, समाधीस्थान,मेघड्म्बरी,होळीच्या माळावरचा महाराजांचा पुतळा या पवित्र जागा आहेत त्या ठिकाणि वर चढुन फोटो काढणे चुकीचे आहे.
शिवसमाधी,वाडेश्वमंदीर,पाहुन होळीच्या माळाकडे निघालो सुर्यास्ताची वेळ होत आली होती इथुन सुर्यास्त खुपच छान दिसत होता. मी पटकन दंड घेउन शिर्काइच्या चौथ-यावर आलो. सहज दंड हातात धरुन उभा होतो तर नीलनी आणि मालकांनी तसच उभ राहयला सांगितल फोटो काढ्ले. मी पाहीलं तर खरोखरीच एखाद्या एकांड्या जागल्या सारखी पोझ होती ती ..
शिरकाई देवळाच्या कळसावरचे ही फोटो सुंदर आले होते.आता पाय बोलायला लागले होते,पोटात कावळेही. सरळ देशमुखांकडे गेलो मिसळ चहा घेतला. तितक्यात बाहेर नील नी सुर्यास्ताचे काही फोटो घेतले ते इतके खास होते की सुर्योदय म्हणुन दाखवली तरीही खोटे वाट्णार नाहीत.हा निसर्गाचा चमत्कारच होता .परत मुक्कामाच्या वाटेला लागलो.शनिवारचा दिवस संपला होता. उद्या खरा सुर्योदय बघायचा होता.
गरम खिचडी,कांदा, कांद्याची भजी आणी ठेचा रात्रीच्या जेवणानंतर झोप कधी लागली ते कळलंच नाही.भल्या पहाटे जाग आली, नील मालक यांना उठवलं.सकाळची आन्हीक आवरुन शिवसदन बघायला निघालो सगळी कडे दाट धुके,आणि पाउस नसुनही केवळ धुक्यानी ओले चिंब झालो होतो.बहुदा काल सुर्यस्ताचं दर्शन झालेलं असल्यामुळेच कि काय आज सुर्योदय काही पहायला मिळत नव्हता संपुर्ण धुक्याच्या पडदयाआडुन उन्हाचे कवडसेही मोठ्या मुश्कीलीनेच दिसत होते राणीवसा (की भांडारग्रुह??), टांकसाळ (पाणि तापवण्याची जागा) हे सर्व पहात देशमुखांकडे न्याहारीला पोहोचलो.पोहे, ऒम्लेट, चहा बिस्कीट आणि देशमुखांबरोबर गप्पा, (मुळंच जगदिश्वराचं स्फाटीकांच शिवलिंग त्यांच्या घरात आहे.त्यांच्या पुर्वजांपैकी कोणीतरी फेट्यातुन लपवुन घरी नेलं आणी मोंगल हल्ल्यातुन वाचवलं ही नवीन माहीती ही मिळाली) न्याहारी आट्पुन आम्ही हिरकणी कडे निघालो. पाउस रिपरिपत होता. धुक्याची दुलाई दुर झालेली नव्हती,या वाटेवर ब-याच ठिकाणी डोंगर उतारावरची माती धुपली होती. ठिकठिकाणी मोठे दगड निसटलेले होते काही ठिकाणी तर पायवाट ही अरुंद झाली होती. आम्ही तीघही मग उतारावर बिया लावायच्या कामाला लागलो. दंडाच्यामदतीने उतारावर बसकण मारायची जमिनीचा अंदाज घ्यायचा आणि खुर्पायची बिया पेरायच्या पुढे सरकायचं काल आणि आज मिळुन जवळ जवळ सर्व बिया या रायगड उतरणीवर संपवत होतो. थोड्या अंतरावर उतरण संपली आणि एक २५ फुटाचा खडकपट्टा लागला. त्यात जेमतेम पावलं मावतील अशा पाय-या खोदलेल्या आहेत.थोड्या मारामरीनंतर आंम्ही तीघे हिरकणीच्या वरच्या बाजुस पोहोचलो.आता खरी कसोटी होती कारण धुक्यामुळे वाट नीट दिसत नव्हती आणी जी दिसत होती तीही मातीमुळे निसरडी होती.
खालुन गडावर येताना दिसलेल्या इलेकट्रीक पोलच्या अंदाजाने आम्ही पुढे सरकलो.दोन वेळा रस्ता चुकला आणि अगदी दरीच्या टोकाशीच पोहोचलो होतो. सगळी कसरत करत एकदाची हिरकणीची तट्बंदी दिसली आणि मनातल्या मनात प्रत्येकानी त्या हिरकणीला सलाम केला इथे दिवसाढ्वळ्या तीघातीघांना नीट अंदाज येत नव्हता ती मात्र ऎन पोर्णिमेच्या रात्री सगळे पहारे चुकवत एकटीच या वाटेनी उतरली.हिरकणीच्या या बुरुजात ३ तोफा आहेत,
आणी मा-याच्या जागेजवळ परत तोच खास रायगड मारुती.
आम्ही बुरुजावरुन सभोवती पहात होतो अक्शरश:चारी बाजुला नुसतं धुकं फोटो काढ्ले आणी पाहील तर नुस्ता पांढरा-पारव्या रंगाचा पड्दा मागे लावल्यासारखा वाटत होता.
थोडा वेळ थांबुन परतीच्या वाटेला लागलो.सकाळचे १२ वाजले होते तीनची परतीची बस होती.परत येताना, महाद्वाराची तट्बंदी शेवटच्या टोकाला जाउन पहायची होती.जोगांकडचे सामान आवरलं आणी निघालो. सदरेवर परत महारांजाच्या समोर नतमस्तक झालो झुंजारचा ग्रुपही बरोबरच होता, परत तोच अंगावर रोमांच उभे कराणारा महारांजाचा जय कार.शिर्काईच दर्शन घेतल आणि पाय-या उतरायला सुरवात केली.येताना आणखी दोन जण बरोबर आले ते गिरिविराज हायकर्सचे शिलेदार होते. तट्बंदीतुन उजवीकडे गेलेल्या पायवाटेनी चालायला सुरवात केली.शेवटच्या दोन बुरुजांपाशी ३ तोफा दिसल्या.
या मात्र हिरकणी/मशीद मोर्च्या पेक्शा चांगल्या स्थीतीत होत्या.त्यावरच्या आक्रुत्या,आकडे यांचे फोटो घेतले.
परताना वाटेत सहज पहीले तर आणखी एक छोटासा दरवाजा खाली बुरुजात उतरताना दिसत होता. थोडं खाली उतरलो आणी लक्शात आंल तटातुनच तो बुरुज वेगळा झाला होता. वास्तुकलेचा सुंदर नमुना, शेवट्चा तट अखेर पर्यंत झुंजत ठेवता यावा आशी ही रचना.
महादर्वाजातुन परतीचा प्रवास सुरु झाला होता.वाटेत अनेक जण भेटत होते जय कार होत होते.परतीच्या वेळेस मात्र खुबल्ढा पाहीला लश्करीद्रुष्टया फारच मोक्याची जागा. समोरच्या पाचाड खिंडीतला शत्रु सहज नजरेस पडावा आणी गडावर पार टकमक, हिरकणीवर पर्यंत वर्दी देता यावी अशी ही जागा.
खिंडीत उतरलो, रस्त्यातच मालकांना ६ फुटी साप मेलेला दिसला. लगेच त्याला रस्त्याच्या कडेला धरुन फोटो सेशन ही करुन घेतल.
जेवणाची वेळ झाल्याचे पोटाने वर्दी दिलीच होती,गावात नील नी जेवण सांगितलं होत आज रविवार असल्याने चिकन, भाकरी .... भरपेट जेउन कोंबडीला मोक्श मिळाल्याची खात्री देत आम्ही बसची चौकशी केली सुदैवानी ३ ची बस आलीच नव्हती शेवट शेअर सुमो ने महाड गाठलं आणी तीतुन पनवेल मार्गे ठाणा.
आज बरोबर आठ्वडा झाला हा व्रुतांत लिहिताना पण ही आजही या आठ्वणी ताज्या आहेत आणी हीच पुढ्च्या वारीची तारीख ठरवण्याची प्रेरणा तारीख ठरलेय.. २ ओक्टोबर २०१० ...
अण्णा कल्लास एकदम , फोटू अन
अण्णा कल्लास एकदम , फोटू अन वृ पण
सेवेकरी, दिनेशदा, झाडाच्या
सेवेकरी, दिनेशदा,
झाडाच्या बिया लावण्यामागे एक उद्देश होता की जमिनिची होणारी धुप थांबावी. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही लावलेल्या बिया या कोणत्याही नव्या वा जुन्या बांधकामांपासुन लांब आहेत. त्या पायवटांपासुनही लांब ठेवण्याची काळजी आम्ही घेतली आहे. तसेच टकमकटोक, वाघदरवाजा या भागात वार्याचा जोर जास्त असतो आम्ही तिथे बियाणे न लावता ते कुशावर्त, हिरकणी टोक, महादरवाजाकडे येणार्या पायर्या या भागात ते लावले आहे.
गडावर कोणातेही खोद्काम करायची परवानगी नाहीये त्यामुळे बिया न्यायचे आम्ही ठरवले. त्यातुनही त्या बिया शोधायला आम्हाला खुप कष्ट घ्यावे लागले... ठाणे, कल्याण, कर्जत परिसरातल्या नर्सरींमध्ये बियाणे मिळु शकले नाही. मी कर्नाळ्यापलीकडील नर्सरींमध्येही जाऊन आलो. त्यामुळे हरियाली यासंस्थेकडुन घारुअण्णांनी जी मिळतील ती बियाणि मिळवली.
मायबोलीवरील कोणासही जंगली झाडांची बियाणी कुठे मिळतील याची माहीती असल्यास ती आम्हाला कळवावी.
धन्यवाद.
नील, माहिमच्या निसर्ग
नील, माहिमच्या निसर्ग उद्यानात मिळतील बहुतेक जंगली झाडांची बियाणं.
आण्णा.. तुमच्या या मस्त
आण्णा.. तुमच्या या मस्त उपक्रमाचा वृ नि फोटूही मस्तच..
Pages