sandarbha

Submitted by मधुरी on 27 June, 2010 - 04:49

मी आहे म्हणूनच ना
माझ्याभोवती हा गराडा आहे
नात्याचा मित्रांचा
आणखी कोण कोण त्यात आहेत...
वर्तमानात जगायचे
कालचे सारे विसरायचे
उद्याचा विचार नको
आज पुढे चालत राहायचे ...
पण मला शंका येते कसे जमेल
रोज जर सूर्य उगवल्यापासून
नसेल कालचा काही जुळलेला धागा
उद्याचा तसाही भरवसा नसतो .....
आजचा उद्याचा संदर्भ नसलेले
भिरभिरत आयुष्य पाचोळ्याचे
कस जगायचे असते ...
ती हृदयाची उलघाल
ती पापण्यानमधली स्वप्न
फक्त तुझे माझे असलेले क्षण
त्याचे काय करायचे असते....
आणि रक्तामधून वाहते
पेशिपेशिमधून वसती करते
ते kalahi होते कदाचित उद्या पण असेल
त्या चैतन्याचे काय करायचे ......
--माधुरी

गुलमोहर: