भारतीय टपाल खात्यातर्फे आता नागरिकांसाठी पोस्टल ओळखपत्र

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 June, 2010 - 00:41

भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे.
अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्‍याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते. बँकेत खाते खोलण्यासाठी, टेलिफोन व गॅस कनेक्शनसाठी इत्यादी या ओळखपत्राचा उपयोग होतो.
ओळखपत्रात त्या त्या व्यक्तीचे इतर तपशील, त्याची स्वाक्षरी व त्याचा फोटो यांचा समावेश असेल. ते ओळखपत्र जारी केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षे कार्यान्वित राहील. त्यानंतर फ्रेश ओळखपत्रासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.

हे ओळखपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचा टपाल खात्याचा अर्ज भरुन द्यायला लागतो. एकूण खर्च रुपये २५०/ फक्त येतो. ( १० रुपये अर्जाची किंमत व २४० रुपये प्रोसेसिंग फी). अधिक माहितीसाठी आपण आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयात संपर्क साधू शकता. ही माहिती व ओळखपत्रासाठीचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहेत!

खालील लिंकवर अन्य माहिती व डाऊनलोड होऊ शकणारा फॉर्म मिळेल.

http://www.taxguru.in/general-info/address-proof-card-issued-by-india-po...

-- अरुंधती कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कोणाला देता येईल ह्याविषयी काही नियम आहेत का ? जे कोणी फॉर्म व प्रोसेसिंग फी भरेल त्याला इश्शु केलं जाईल.
तसं असेल तर घुसखोरांना तर मोकळ मैदानच सापडेल.

अर्ज पहा, त्यात भाडेकरु असल्यास घरमालकाविषयीची माहिती, नोकरदार असल्यास एम्प्लॉयरची माहिती - तपशील, नोकरदार असल्यास नोकरीच्या ठिकाणचे ओळखपत्राची कॉपी इ. हे द्यावे लागणार आहे. बाकी हे ओळखपत्र टूरिस्ट, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रवासी प्रतिनिधी आणि अन्य भारतीय जनतेसाठी असेल.

माहितीसाठी भारतीय टपाल खात्याच्या गाईडमधील ६३ वे कलम :

63. Identification Cards. – (1) A system of identity cards has been introduced by the Post
Office for the benefit of tourists, traveling representatives of firms and other members of the public
who experience difficulty in establishing their identity in connection with postal transactions, e.g.,
receipt of registered and insured articles and payment of money orders in the post town through
which they pass. These cards will be obtainable at any head post office by literate persons whose
identity is well established in the locality in which they reside or who can be vouched for by
substantial permanent residents known to the postmaster.
NOTE : Applications for issue of identification cards can also be made at Sub-Offices. The Sub-Postmaster
will, after making enquiries forward the application to the Head Office for issue of the cards.
(2) The card will contain a full description of its holder, his signature and photograph and
will be current for a period of three years from the date of issue. After the expiry of the period of
validity of the card, a fresh card will have to be applied for. The photograph to be affixed to the
identity card will have to be supplied by the applicant for the card and must be of the size 88
millimeters by 63 millimeters, or slightly smaller.
(3) The use of these cards is entirely optional. Holders will ordinarily receive delivery of
postal articles and payment of money orders on their presentation but in cases of doubt it will be
open to postmasters to make such further enquiry as they may consider necessary to establish the
identity of the applicants with the holders of the cards and to demand additional corroborative
evidence of such identity.
(4) In the event of the loss of a card, a duplicate will be issued to the holder on the conditions
laid down in sub-clause (2) above besides paying the prescribed fee and on his giving a written
declaration absolving the department from all responsibility in the event of the misuse of the
original.
POSTE RESTANTE
The Poste Restante is intended solely for the convenience of strangers and travelers and even
they may not use the Poste Restante for more than three months

अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यावाद अरुंधती Happy

एक शंका, याचा दुरुपयोग टाळण्यासाठी काही उपाययोजना आहे का टपाल खात्याकडे?

मंदार, माझ्या मते ओळखपत्र हे सर्व कागदपत्रांची व माहितीची छाननी केल्यावर, तसेच ती व्यक्ती त्या भागात व्यवस्थित ओळखली जात असेल किंवा त्या व्यक्तीला ओळखणार्‍या किमान दोन प्रस्थापित रहिवाशांनी त्या व्यक्तीची खात्री दिल्यावर मगच दिले जाते. अर्जातल्या भरलेल्या माहितीची शहानिशा करुन घेतली जाते. त्यामुळे बर्‍यापैकी काळजी घेतली जात असावी असे सकृतदर्शनी तरी वाटते! Proud अर्थात ह्या सुविधेचा गैरवापरच करायचा असल्यास सर्व अडसरांना ओलांडून इच्छुक लोक त्यातून मार्ग काढतातच! ते तर आपण नकली ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, नकली रेशन कार्डाच्या माध्यमातूनही पाहतो.

मस्त माहिती. Happy
>>अर्थात ह्या सुविधेचा गैरवापरच करायचा असल्यास सर्व अडसरांना ओलांडून इच्छुक लोक त्यातून मार्ग काढतातच! ते तर आपण नकली ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, नकली रेशन कार्डाच्या माध्यमातूनही पाहतो.<< Lol अशा लोकांनी पळवाट शोधायला पण सुरू केली असेल.

हे खातं विकायचं कसं काय सुटलंय नजरेतून?

पोस्ट अँड टेलेकॉम होतं ते. बीएसेनेल एम्टीएनेल विकुन चुकलेत रिलायन्सला. पोस्टाचं काय? त्याची बँक केली आहे, पण त्याची सिक्युरिटी काय? की खेड्यापाड्यातल्या गरीबाचे नोट बंदी स्कॅम मधून उरलेले पैसे लुटायचे वेगले धंदे येणारेत?

बघतांव मी.. बगतांव..