ऑस्ट्रेलियात महिलाराज....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आजच्या ऐतिहासिक दिवशी ऑस्ट्रेलिया देशाच्या इतिहासात प्रथमच एक महिला पंतप्रधान झाली. गेल्या (कालपर्यंतच्या) सरकारात उप पंतप्रधान असलेल्या मा. ज्युलिया गिलार्ड आजपासुन पंतप्रधान झाल्या. तथाकथित पुढारलेल्या देशांत आजवर केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला देशाचे नेतृत्व करु शकल्या. http://www.terra.es/personal2/monolith/00women3.htm
पुढारलेल्या देशाच्या मानाने अविकसीत अन विकसनशील देशांमध्ये महिला राजकीय नेतृत्व नेहमीच आघाडीवर राहिले. भारत-पाक-बांगलादेश ह्यांनी तर कित्येक दशके अगोदरच महिला नेतृत्वाचा स्वीकर केला... नव्हे महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले!

जगातील एकमेव महासत्ता असे स्वयंघोषीत कमांडरांनी देखील महिलेला साधे 'उमेदवारी'पासुन वंचित ठेवले...

आज आमच्या लॅब मध्ये तर हाच विषय चर्चेला होता..... अनेकांनी ज्युलिया गिलार्ड यांचे अभिनंदन केलेच, पण त्यांच्या राजकीय कौशल्याने अनेक जन चकित झाले...

गेल्या महिन्यात एका टीव्ही मुलाखतीत बाईंनी पंतप्रधानपदात रस 'नसल्याचे' सांगितले तेंव्हाच आमच्या जागृत राजकीय घ्राणेंद्रीयांनी त्याची नोंद घेतली होती. पण बाई लै हुषार! Happy पत्ताच लागु दिला नाही......!

महिला सबलीकरणाच्या दिशेने हे एक पाउल आहे. ४९ वर्षे वयाच्या एका स्त्री ने हे उत्तुंग राजकीय यश संपादन केले आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्याने त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदासाठी संघर्ष/प्रयत्न केलाच पाहिजे, असे मला वाटते! अन असे सर्वोच्च पद मिळवणार्‍या गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन!

प्रकार: 

मा. ज्युलिया गिलार्ड यांचे बद्द्ल अजुन माहिती.

http://en.wikipedia.org/wiki/Julia_Gillard

Gillard is also the first foreign-born prime minister since Billy Hughes, who served from 1915 to 1923, and Australia's first prime minister who has never married.

अधिकृत माहिती:
http://www.aph.gov.au/house/members/member.asp?id=83L

पहिलीच कॅबिनेट गाजवलीय! Happy

चंपक सहीच रे.. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावर निवडून आल्या होत्या तेव्हा पण असाच आनंद झाला होता.

चंपक ते Big Australia आणि इमिग्रेशन चा काय संबंध आहे? त्या बिग ऑस्ट्रेलिया शब्दाचा काहीतरी स्थानिक संदर्भ असावा जो भारतात फक्त बातमी वाचताना कळत नाही.

फारएण्डः हे पहा http://news.smh.com.au/breaking-news-national/most-dont-want-bigger-aust...

ऑस्ट्रेलिया ची लोकसंख्या किती अन कशी वाढवावी ह्यावर नेहमीच चर्चा होत असतात. इथली नैसर्गिक वाढ अन बाहेरुन येणारे मायग्रंट अन बेकायदा घुसखोर ह्यांचा ताळमेळ कसा ठेवावा? हे मुळ विषय आहेत.

सर्वच विकसित (?) देशांना भेडसावणारा हा प्रश्न आहे.

एकुणात, इथले राज ठाकरे जागे होत आहेत, असे दिसतेय.