तंबाखु घेते दर ६ सेकंदाला एक बळी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दर ६ सेकंदाला तंबाखु (यात सिगरेट,सिगार व इतर प्रकार येतात) एक बळी घेते. दर वर्षी धुम्रपानामुळे ५४ लाख लोक मरण पावतात. जर उपाययोजना केल्या नाहीत तर हा आकडा २०३० पर्यंत ८० लाखांपर्यंत जाउ शकतो. एकविसाव्या शतकात धुम्रपानामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या १ अब्जाहुन अधिक असेल. जे लोक १५ वर्षांहुन अधिक काळ धुम्रपान करतात त्यांच्यापैकी ३०-५०% लोकांचा मृत्यू धुम्रपानामुळे होतो.

no_smoking_sign.jpg

ही सर्व माहीती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नी प्रसिध्द केलीय. त्यात पुढे असेही म्हटलेय की अनेक लोकांना हे व्यसन सोडायच असत पण ते सोडू शकत नाहीत.तंबाखुच्या संसर्गाने(!!!) होणार्‍या मृत्यूची संख्या इतर कुठल्याही प्रकारच्या संसर्गजन्य (infections) रोगांपेक्षा जास्त आहे. WHO पुढे असेही म्हणते की जगातल्या एकाही देशाने २७फेब्रुवारी २००५ साली संमत केलेला ठराव पुर्णपणे अमलात आणलेला नाही. या ठरावाच्या अनुसार सिगारेट,तंबाखुयुक्त पदार्थांच्या जाहीरातींवर पुर्णपणे बंदी घालण्यात यावी, तंबाखुचे उत्पादन व विक्री कमी करण्यासाठी त्यावर भरपुर कर आकारला जावा, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास पुर्णपणे बंदी आणावी व जे धुम्रपान करत नाहीत त्यांनी ते करु नये यासाठी उपाययोजना करावी. सिगारेटच्या पॅकेटच्या अर्ध्या भागावर धुम्रपानाने होणारी हानीची माहीती दिलेली असावी.जगातील फक्त ५% देशांनी ठरावातील एकातरी कलमाचे पुर्णपणे पालन केलेले आहे. ४०% देश अजुनही दवाखाना,हॉस्पिटल्स व शाळांमधे धुम्रपानावर बंदी आणीत नाहीत.

धुम्रपानाच्या व्यसनाबद्दल एक घटना येथे सांगावीशी वाटते. 'जुन्या काळी जहाजांवरील लोकांना धुम्रपानाचे खुप व्यसन असे. कोलंबसच्या जहाजावरील लोकांनाही असेच व्यसन होते ज्याची कोलंबसला खुप काळजी वाटत असे. कोलंबस एकदा असाच सफरीवर निघाला. अनेक महिने त्याचे जहाज समुद्रातच होते. धुम्रपानाच्या व्यसनाधीन झालेल्या लोकांना याची फार काळजी वाटत होती कारण त्यांच्याकडील सिगारेट्,तंबाखु संपत आले होते. पण तरीही कुठेही बेट अथवा भुभाग दिसेना. जहाजावरील व्यसनाधीन लोकांच्या सिगारेटी जशा जशा संपु लागल्या तशा तशा चोर्‍या ,भांडण,मारामार्‍या जहाजावर वाढू लागल्या. कोलंबसला याची काळजी वाटत होती. आणि काही दिवसांनी सर्व सिगारेटी,तंबाखु वगैरे संपल्या. आणि या लोकांच जगण मुश्किल झालं. करायच तरी काय्???सारखी सारखी तलफ येत असे,काहीतरी फुंकायला हवय पण समुद्रही संपता संपत नव्हता. मग या लोकांनी वर्षानुवर्ष घाण असलेले दोर तोडायला सुरुवात केली आणि ते जाळून फुंकायला सुरुवात केली. काय करणार तलफ येतेय तर काहीतरी फुंकायला हवच ना. कोलंबसची काळजी तर आता अजुनच वाढली ,या व्यसनामुळे तर दोर्‍याही संपुन जायची वेळ येईल आणि तसे झाले तर अकारण सर्वांना मृत्यूही येउ शकतो. आता करायच तरी काय???'
वरील घटना एक चेन स्मोकर पुस्तकात वाचत होता. सिगारेटचे झुरके घेण्यासाठी तो इतका व्यसनी झाला होता की सिगारेटशिवाय जगणे असु शकते यावरही त्याचा विश्वास नव्हता. एका हातात हे पुस्तक आणि दुसर्‍या हातात सिगारेट ....शिलगावलेली!!!!जेंव्हा त्याने दोरखंडाबाबत वाचल तेंव्हा तो क्षणभर थांबला, त्याने सिगारेटकडे बघितलं आणि विचार केला की काय आपणही असेच होउ???वर्षानुवर्ष घाणीत,चिखलात टाकलेले दोरखंडाचे तुकडे करुन आपणही ही तलफ भागवण्याचा प्रयत्न करु???आपल्या मनावर आपला इतकाही ताबा नाही का???आणि त्याने त्याच क्षणी सिगारेट विझवली आणि ठरवलं की आता सिगारेटला तेंव्हाच हात लावायचा जेंव्हा इतकी तलफ येईल की आपण घाणेरडे दोरखंडही जाळुन आपली तलफ भागवायचा प्रयत्न करु. आणि या चेन स्मोकरने सिगारेटचे पाकीट नेहमी स्वतःजवळ बाळगले. न सांगो कधी तशी तलफ येईल. पहिले काही दिवस सतत तलफ येत असे. तो माणुस त्या सिगारेटच्या पाकीटाकडे बघे आणि विचार करे की घाणेरडे दोरखंड ओढण्याइतकी तलफ आलीय का???आणि तो सिगारेटच पाकीट उघडत नसे. दिवस जात होते ,काही दिवसांनी तलफ येणही कमी झालं आणि काही महीन्यांनी पुर्णपणे बंद झाल. आणि या चेन स्मोकरनी फारशे काहीही कष्ट न करता धुम्रपान सोडले.

तुमच्यापैकी कुणाला हे व्यसन असेल तर त्या माणसाप्रमाणेच विचार करु तुमचे व्यसन सोडवायचा प्रयत्न करा.

विषय: 
प्रकार: 

चिन्मय, मला काही हे व्यसन नाही. लेख छान लिहिला आहेस. आरोग्याच्या माहितीमध्ये कोलंबसची व चेन स्मोकरची गोष्टही समर्पक अशी दिली आहेस. ज्यांना हे व्यसन असेल त्यांना मी हा तुझा लेख जरुर वाचायला देईल. असेच रंगीबेरंगीचे पान रंगवत जा, हे व्यसन मात्र सोडु नकोस. तुझ्या पुढच्या लेखमालेला असाच बहर यावा ही सदिच्छा.

धन्यवाद्!!!!!लेख माहीती देण्यासाठी लिहिलेला असल्याने फारसा वाचनिय नसेलही पण मला हे मनापासुन सांगाव वाटल म्हणुन लिहिल