Submitted by जया एम on 18 June, 2010 - 06:22
ऋतूंचे रेशमी रावे
पुनः झाडांवरी यावे
फुलांची दूरची गावे
सांजता शोधण्या जावे
भुईने थोर पेलावे
श्वास जे मातीला ठावे
घनाने गर्द झाकावे
नभाचे गूढ सांगावे
थेंब निर्वेध नाचावे,
तुझे संदेश वाचावे
चंद्र जमिनीत रुजवावे
जीव मोहात भिजवावे
मागुती राहिली गावे
आता ओठांवरी नावे
दिवे पाण्यात सोडावे
आणखी हात जोडावे
.
गुलमोहर:
शेअर करा
चंद्र जमिनीत रुजवावे जीव
चंद्र जमिनीत रुजवावे
जीव मोहात भिजवावे
ओळी खास....!!
तथास्तू !
अप्रतिम कविता.
अप्रतिम कविता.
ही पण छान.
ही पण छान.
सुंदर.
सुंदर.
तुमच्या सगळ्याच कविता गुंगवून
तुमच्या सगळ्याच कविता गुंगवून ठेवतात. मला कळतात का? सुट्य सुट्या ओळी कळतात, पण पूर्ण चित्र दिसत नाही...भूमिका सांगाल तर बरे होईल.
मागुती राहिली गावे आता
मागुती राहिली गावे
आता ओठांवरी नावे
दिवे पाण्यात सोडावे
आणखी हात जोडा
जबर..!!
वा!
वा!
अर्थ लावण्याच्या भानगडीत पडलो
अर्थ लावण्याच्या भानगडीत पडलो नाही. जशी उलगडत गेली, तसा एक चित्रपट पाहीला. कदाचित कवयित्रीचा आणि एक सामान्य वाचक म्हणून माझा प्रतिमांचा अर्थ वेगवेगळा असेल..
क्या बात है ....
क्या बात है ....
>>>>>>मागुती राहिली गावे
>>>>>>मागुती राहिली गावे
आता ओठांवरी नावे
दिवे पाण्यात सोडावे
आणखी हात जोडावे
अशीच गावे मागे सोडत प्रत्येक दिवा नदीच्या पात्रात हेलकावत पुढे पुढे जात रहातो. हात हलवणार्या, हात जोडणार्या लोकांना मागे मागे टाकत.
मागे रहाणार्यांचं काय.
मागुती राहिली गावे
मागुती राहिली गावे
आता ओठांवरी नावे
दिवे पाण्यात सोडावे
आणखी हात जोडावे
>>> अप्रतिम
लोभस चित्रकविता
लोभस चित्रकविता