हैद्राबाद

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:29

हैद्राबादेतले मायबोलीकर आणि त्यांच्या हैद्राबादबद्द्लच्या गप्पा.
हैद्राबादेतले मायबोलीकर आणि त्यांच्या हैद्राबादबद्द्लच्या गप्पा.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा, मी नेमका या वेळी नाहीये पण अनेक धन्यवाद . वाटेत दुतर्फा उभ्या नागरिकांनी दिलेले प्रोत्साहन हे इतके परिणामकारक ठरते की काय सांगावे.

अय्यो तुमच्या सारखे प्रेरणा दायी व्यक्तिमत्व एकतर पुन्यात नाहीतर हैद्राबादेत. प्रश्नच नाही हर्पेन. सो स्वीट गुणीले २.

हैद्राबाद आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आजच्याच दिवशी, ६८ वर्षांपुर्वी, जनरल चाैधरींनी संस्थानाचा ताबा घेतला. आॅपरेशन पोलो यशस्वी झाले. आपण स्वतंत्र झालो, भारतात एकरूप झालो व भारत परीपुर्ण झाला.
ह्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.

आताच परतलो चेन्नै वरुन. एअरपोर्ट ते सिकंदराबाद-डायमंड पॉइंट कुठे पाणी साचलेले नाही.
पण काही ठिकाणी रस्त्याची हाल खराब एकदम.
आता ऑफिस ते घर रस्त्याचे काय हाल आहेत बघावे लागेल. बुधवार पर्यंत दोन ठिकाणी रस्ता बंद केला होता प्रचंड खड्ड्यांमुळे. आता काय हाल असतील देव जाणे. आज खूप लोक ऑफिसला गेले नाहीत म्हणे. म्हणुन आता ऐन पीक अवरला पण ट्राफिक जाम नव्हते.

मी गेले ४-५ दिवस उत्तर भारतात केवळ बातम्या आणि व्हाट्स ऍप फोरवर्ड एवढीच माहिती उद्या संध्याकाळी परिस्थिती बरी असावी हि अपेक्षा.. त्यातून आमचा जरा सखल भाग..

उद्या सकाळीच हैद्राबाद एआरपोर्ट्ला पोचायचंय.
पाऊणेनऊची फ्लाईट आहे.
पण पुणे हैद्राबाद एक्सप्रेस हायवेचं काम आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साठलंय.
ड्रायवर म्हणतोय की पाच तास लागतील (एरवी अडीच तास पुरतात किंवा कमीच.)

आता मेन सिटीतून गावापर्यंत आला (दुसर्‍या कुणालातरी घेऊन) तर पाच तासांच्यावर लागले म्हणाला.

पण मी काय भल्यापहाटे तीनला निघणार नाही.
चार- सव्वाचारलाच निघेन.
फ्लाईटचं नशीब असेल तर मिळेल मला.
Happy

इंडिगो विमान असेल तर वेळेत पोहोचा. मला मंगळवारी दिल्ली जाण्यासाठी त्या विमानानाने विमानतळावर क्षण बसू दिले नाही चेक इन करून आत जात नाही तो बोर्डिंग सुरु केलेले.. तब्बल ५० मिन आधीच...

अय्यो,
इंडिगोचंच आहे.
पण उद्या पावसाने वेळेवर सुटेल की नाही असा विचार करत होते.

इंडिगोवाले वडाप गाड्यांसारखे प्यासिंजरा भरली की लगेच गाडी सोडतात याचा अनुभव आहे.
Happy

.....

कठिण..
पाणीच पाणी चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे!
३ते ७ ट्रॅफिक आमच्या रूटवर थांबलेलं.
मी अर्धा तास गाडीत बसून आणि नंतर एक तास गाडीत सरपटत होते.
सदाशिवपेठनंतर मोठ्ठा ब्लॉक होता.

... तर.. अ‍ॅज एक्सपेक्टेड , फ्लाईट मिस झाली.
आता पुढच्या खटार्‍याच्या प्रतिक्षेत!

कृष्णा, ऐअर पोर्ट / सिकंदराबाद स्टेशन ते तुमचा भाग, काहीच प्रॉब्लेम नाही.
तुम्हाला वाटेल टिव्ही वाले वगैरे थापा मारत होते की काय Wink
ऐअर पोर्टवरुन येताना व्हाया बंजारा हिल्सच या.

रिशेड्यूल वगैरे काही नाही.
पैसे मोजून पुढचं तिकीट काढलं.
ते पण जळ्ळं इंडिगोचंच मिळालं.

बंगळुरुत पाऊस नाही पण तितका.

पुढल्या रविवारी - २३ ऑक्टोबरला - रवींद्र भारतीला 'सूर निरागस हो' हा महेश काळेंचा लाइव्ह कॉन्सर्ट आहे.
सकाळी १०.०० ला.

https://in.bookmyshow.com/hyderabad/events/sura-niragasa-ho-mahesh-kale-...

हो का! छान होणारच हे वाटतच होते.
पण अैनवेळी तापाने फणफणल्याने जाता आले नाही Sad

माझा मित्र यतीन तिथे ऑडिओ सिस्टिम संभाळत होता.

पुढच्या महिन्यात 1 वर्ष वयाची 4 मुले आणि 8 मोठी माणसे हैद्राबाद ला जायचे ठरते आहे. तर कुठे राहावे, काय बघावे याबद्दल गाईड कराल का? राहण्या खाण्याच्या रिझनेबल पण चांगल्या सोयी सांगाल का?

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg