PMP/ITIL/PRINCE2 चा फायदा होतो का?

Submitted by हर्ट on 14 June, 2010 - 21:51

मित्रांनो, हल्ली बरेच जण PMP करत आहेत. करुन झाल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग झाला असे माझ्या पहाण्यात नाही आले. आजच्या स्पर्धेच्या युगात PMP चा किती उपयोग होतो? MBA केल्यानंतरही PMP करणारे आहेत. या विषयावर कृपया माहिती लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायदा जॉब / आदर मिळवण्यापुरताच मर्यादित अाहे. कामाच्या दृष्टीने अुपयोग शून्य. मी PMP आहे! काही माहिती हवी असल्यास कळवावे.

मी ६ वर्षांपूर्वी P.M.P. केले आहे. त्याचा एक सर्टिफिकेट म्हणून उपयोग होतोच, पण ती सगळी प्रिनसिपल्स प्रॉजेक्ट मॅनेजमेण्टला हमखास लागू पडतात. मी मॅनेज केलेल्या बर्‍याच प्रॉजे़क्टचा माझा अनुभव आहे.
M.B.A. हे सर्वसामान्य मॅनेजमेण्ट साठी उपयोगी आहे, पण P.M.P. प्रॉजेक्ट मॅनेजमेण्ट साठी उपयोगी आहे. प्रॉजेक्ट्मध्ये असणार्‍यास उपयोगी आहे. त्यामुळे प्रॉजेक्टवर काम करणारे लोक पुष्कळवेळा M.B.A. करूनसुद्धा P.M.P. करताना दिसतात.
मी बरीच वर्षे प्रॉजे़क्ट मॅनेजेमेन्ट करून आता P.M.P. साठी ट्रेनिंग घेते. काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारा.

नाही मला असे विचारायचे आहे की जर मी सध्या senior developer म्हणून काम करत असेल आणि मला जर मॅनेजर व्हायचे असेल तर मला PMP चा कितपत फायदा होईल? मी जर माझ्या सीव्हीवर लिहिले की मी PMP केले आहे तर कंपन्या त्याकडे बघतात का?

हो. बघतात असा माझा अनुभव आहे. पण interview मध्ये तुम्हाला संबधित अनुभव आणि मिळविलेले ज्ञान नीट सिद्ध करता आले पाहिजे. फक्त पेपर P.M.P. असून उपयोग नाही.

वैद्यांना अनुमोदन. कुठल्याही प्रोफेशनल सर्टीफिकेशन आणि प्रोफेशनल बॉडी चे सदस्यत्व असण्याचा आणि नेटवर्कचा उपयोग होतोच. किती ते करणार्‍यावर अवलंबुन आहे. Happy

बी,
मी आहे... pmp हे प्रचंड फायद्याचे सर्वच दृष्ट्या.. एक दर्जेदार प्रशिक्षण आहे ते. निव्वळ सर्टिफीकेट वा त्याकडे promotion ladder म्हणून न बघता व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून बघितलेस तर त्याचा कुठल्याही व्यवस्थापन क्षेत्रात तुला अतीशय ऊत्तम उपयोग होईल याची खात्री बाळग.
(बाकी भारतात ऊगाच पोस्ट ला महत्व आहे.. मोठ मोठ्या कंपन्यातून (अगदी सर्व क्षेत्रातल्या) ही पदे/पोस्ट्स खिरापतीगत वाटतात्..त्याचा कुशलता, शिक्षण, अनुभव, ई. शी काहीही संबंध नसतो. जवळ जवळ सहा वेगवेगळ्या देशातून काम करून तिथली व्यावसायिक संस्कृती पाहील्यावर मी या निश्कर्षाला आलो आहे. शेवटी तुमचे काम, त्याचा दर्जा, त्यातले कौशल्य अन सातत्त्य महत्वाचे!)

मी पण सध्या MBA (Prj. Mgmt ) last Sem करतोय तरी पण ITIL Certification नंतर मला PMP हाच पर्याय सगळ्यांनी सुचवलाय आणी मला सुंद्धा तोच योग्य वाटतोय कारण IT Infra Project Manage करण्यासाठी तसेच पुढ्च्या करीअर साठी तोच पर्याय योग्य वाटतो.
वैजयंती तुम्ही स्वतः क्लासेस कंड्क्ट करतात का ?

हो संदीप. www.effectivepmc.com ही माझी साईट आहे. तिकडे माहिती मिळू शकेल. तुम्हाला PMP बद्दल काही माहिती हवी आहे का? मला अवश्य संपर्क करा. इकडे रिक्षा नको!! नाही का? Happy
अश्विनी, काय म्हणे सध्या? ट्रेनिन्ग्ज, मुली, नाती यांच्यात बुडून गेलेय सध्या मी अगदी Happy .

धन्यवाद सर्वांचेच.

मी ITIL हा विषय घेतला होता पण ITIL Certification ची परिक्षा दिली नाही. याचा पण फायदा होतो का?

हो,
atleast IT खरच फायदा होतोच specially if you are in Large MNC's and working in Process Driven Environment.

Yog,
Your post really very good, rightly said about everything in professional life.

@ Vaijayanti,
"इकडे रिक्षा नको!! नाही का? " मागचे threads आठवले Happy मी सम्पर्क करेल तुम्हाला, धन्सं

मी स्वतः PMP आहे. माझ्या मते PMP चे दृश्य फायदे फारसे नाहीत. PMP BOK/Handbook हे खूपच आदर्शवत (ideal) आहे. ते वाचून project manage करणे practically अवधड असते.

परंतु Resume मध्ये तसेच E-Mail Signature मध्ये PMP लिहिलेले असल्यास Resume चे वजन थोडेसे वाढते. अनेक कंपन्या आपल्या कॉर्पोरेट प्रेझेंटेशन मध्ये आमच्या कंपनीत किती कर्मचारी पीएचडी आहेत, किती PMP आहेत, किती जणांनी वेगवेगळ्या प्रकारची सर्टिफिकेशन्स केलेली आहेत याची एक स्लाईड दाखवितात. आमच्याकडे मान्यताप्राप्त certifications मिळविलेला स्टाफ आहे ते त्यांना दाखवायचे असते. काही नवीन client, एखाद्या नवीन प्रोजेक्टची RFP/RFI float करताना, project team मध्ये certified PMP असावा अशी मागणी केलेली असते. अनेक कंपन्या project manager किंवा पुढील promotion साठी PMP ची अट घालतात. खरं तर PMP आहे म्हणून प्रमोशन देण्यापेक्षा PMP नाही म्हणून प्रमोशन देऊ शकत नाही हे excuse पुढे करता यावे म्हणून ही अट घालतात.

PMP training हे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे ज्ञान देण्यापेक्षा PMP ची ४ तासाची परीक्षा पास करण्याचे प्रशिक्षण देतात.

एकंदरीत PMP करण्याचे तोटे अजिबात नाहीत. झालाच तर थोडासा फायदाच होईल.

वावा.. माझ्या राज्यात आलात अगदी..

PMP/Prince2 आणी ITIL ह्या दोन वेगळ्या लायणी आहेत..
ITIL हे सेवा व्यवस्थापनासाठी (service management) असते आणी PMP/Prince2 हे प्रकल्प व्यवस्थापनासाठी (project management).
तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात काम करता त्यावरच अवलंबुन आहे काय करायचे ते, तुम्ही जर फक्त software development projects चाच विचार करत असाल तर ही सगळी प्रमाणपत्रे सोडुन तुम्हाला CMMI हे पण उपयोगी पडेल.
काही आस्थापनांमधे आजकाल ही सर्व/काही प्रमाणपत्रे सक्तीची सुधा असतात (अर्थात कामाचे स्वरूप लक्षात घेउनच)

PMP व .Prince2 ह्यामधे फारसा फरक नाहिये कि जसा PMP व ITIL मधे आहे कारण PMP/Prince2 हि दोन्ही प्रकल्प व्यवस्थापनासाठीच वापरतात .फक्त PMP अमेरीकाधर्जिणे आहे तर Prince2 ब्रिटनधार्जिणे

आणखी काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा..

(आयटीआयएल येक्ष्पर्ट) विशाल.

पहाटे उठुन करावा म्हणतात.. Happy

बरीच पुस्तके आहेत.. पण सगळ्यात खत्रिशीर अर्थात एकच.. PMBoK..

सल्ला ऐका.. चांगल्याशा गुरूगिरू चे पाय धरा..

मला युकेत नोकरी मिळावी यासाठी पीएमपी बरे की प्रिन्स २?

खरे तर मी ऑलरेडी ४ वर्षे मॅनेजर म्हणून काम करतेय. आणि ३२ तास पीएमपी प्रशिक्षण केलयं (आता धुळही बसली त्यावर), पण पीएम्बॉक बदललयं.

मी वैजूला संपर्क करेनच.. पण इतर कोणास ठाऊक असेल तर कळवा.

वैजयन्ती, योग, गुरुजी आणि अर्धवट तुमच्या पोष्ट्स चांगल्या आहेत.

PMP बद्दल माझी काही मते.
(PMP चुकून मराठित टाईप केले तर पंप झाले :))

PMP ची परीक्षा देण्याची तयारी आणि त्याचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे ह्या २ अतिशय भिन्न गोष्टी आहेत.
PMP चा ३ तासाचा पेपर देऊन ज्ञानात फारशी भर पडत नाही.
माझ्या मूळच्या अभ्यास पद्धतीप्रमाणे Text Book वाचून पास होता येत नाही. मी PMBOK 3.0 असताना परिक्षा दिली आहे. PMBOK 3 हे अतिशय रद्दड पुस्तक आहे. त्यातून परिक्षेसाठी उपयुक्त असे फक्त ९ knowledge Area & 5 process area एवढेच वाचण्यासारखे आहे.
परिक्षेत प्रश्न हे सगळे real life scenareos वरती असतात. अमूक एकाचे definition काय आहे असे नसतात.
त्यामुळे अवांतर वाचन आवश्यक.

मी १५ दिवस उडत उडत आणि परिक्षेच्या अगोदर ३ दिवस एवढे focussed लक्ष टाकून PMP मिळवली. मात्र तीच परिक्षा (अगदी तेच प्रश्न) मला आज विचारले तरी मी पास होईन ह्याची खात्री नाही Happy अर्थात प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट्चा अनुभव होता अगोदर. पण त्याने कधीकधी उलटा परिणाम होतो उत्तरावर!

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, रिता मुल्की चे पुस्तक (ती नुकतीच वारल्याचे कळले :() हेच यशाचे गमक आहे. मी Aileen Ellis चे प्रश्नसंच, रीता मुल्की आणि PMBOK 3.0 इतक्या भांडवलावरतीच वरील वेळेप्रमाणे परिक्षा दिली.

परीक्षेचा खर्च: अंदाजे २५००० रु / ५००$

जेवढा जास्त दिवस अभ्यास कराल तेवढे जास्त Confuse व्हायला होते, त्यामुळे १५-२० दिवसापेक्षा जास्त दिवस अभ्यास करु नये असे माझे मत आहे.

रीता मुल्की चे पुस्तक खरोखर वाचनीय आहे आणि त्यात बर्‍याच चांगल्या गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत ज्या नंतर उपयोगी पडु शकतील.

किरण ला अनुमोदन- PMP पास व्हायला फार डोकं / अभ्यास लागत नाही (बर्‍याच वर्षांपुर्वी मीही पास झालो होतो. खरं तर PMP/ITIL सारखी सर्टीफिकेशंस चांगली फ्रेमवर्क सजेस्ट करतात पण प्रत्यक्षात त्याचे इम्ल्पिमेंटेशन ओर्गनाय्झेशन कल्चर प्रमाणे बदलते.

>किरण ला अनुमोदन- PMP पास व्हायला फार डोकं / अभ्यास लागत नाही (बर्‍याच वर्षांपुर्वी मीही पास झालो होतो.
हे पूर्वी सत्त्य असेल (२००५ च्या आधी).. त्यानंतर ८२-८४% पासिंग मार्क्स ठेवल्याने बरेच जण गडगडले (कारण फार अभ्यास लागत नाही ही समजूत). pmbok हे फक्त मार्गदर्शक गाईड आहे, बायबल नव्हे. ८०% प्रश्ण त्यावर आधारीत असतातच. माझा मित्र २००० मध्ये झाला ७५% पास होवून. नविन ८४% पासिंग बद्दल अनेकांनी नापसंती दर्शविल्याने बहुदा त्यात पुन्हा सूट दिली आहे.
कीरण म्हणतो ते बरोबर आहे. आधी प्रॉ़जेक्ट मॅनेजमेंट चा अनुभव असेल तर थोडी मदत होते. पण काही प्रश्ण हे pmbok व ईतर संबंधीत वाचन नसेल तर नक्की चुकाल.
राहता राहीला प्रश्ण तो pmp/prince/ वगैरे व्यावसायिक जीवनात वापरण्याचा.. तर त्याचं असं आहे की "सब चलता है", "जुगाड कर लेंगे", "हो जायेगा", वगैरे दृष्टीकोन असणार्‍यांनी याच्या वाटेला जावू नये. mostly u will end up wasting everyones time and money. मोठ्या प्रॉजेक्ट्स मध्ये जिथे accountability, higher stakes, reputation चा प्रश्ण आहे तिथे याच्या वापराने बरेच फायदे होतील. शेवटी चांगली मार्गदर्शक तत्वे वापरायची आवड नव्हे कळकळ हवी तरच त्याबद्दल आपण अधिक जागरूक व ऊत्सूक असतो.

योग, तु़झ्याशी सहमत. मी पण तुझ्यासारखे लिहीणार होतो पण बायको म्हणाली उगीच स्वतःचे कौतुक कशाला सांगतोयस की बघा यवढी कठीण आहे नि मी कशी ३ दिवसात अभ्यास करुन पास झालो ते म्हणून आवरते घेतले Happy शिवाय म्हटले उगीच डिस्करेज कशाला करा कोणाला.

पण खरेच एकच पेपर, सगळे ऑब्जेक्टीव्ह प्रश्न म्हणजे हॅ आपण सहज पास होऊ असा विचार करुन परीक्षा देऊ नका. माझे काही कलीग्ज तयारी करुनसुद्धा फेल झालेले आहेत. मलासुद्धा थोडा (फाजील) आत्मविश्वास होता तो Button वर क्लिक करताना गळून पडतो Happy

PMBOK 4.0 बद्दल माहित नाही. पण निदान TextBook मोठे आहे म्हणजे त्यात जरा चांगला मजकूर असावा असे वाटते आहे.

रीता मुल्की चे पुस्तक खरोखर वाचनीय आहे >> मला स्वतःला तरी तिची लेखनशैली अजिबात आवडली नाही. पुस्तकात अतिशय उर्मट (मीच काय ती हुशार) स्वर जाणवतो. तसेच पुस्तकाची रचना आवडली नाही. नॉलेज एरीयानुसार पुस्तकाची विभागणी केल्याने पुस्तक वाचताना लय सापडत नाही.

त्यापेक्षा किम हेल्डमनचे पुस्तक मला जास्त आवडले. या पुस्तकाची रचना प्रॉसेस ग्रुप्सनुसार केली आहे. त्यामुळे पुस्तकात गोष्टी प्रत्यक्ष प्रॉजेक्ट फेजेसनुसार येतात.

अर्थात हे माझे मत.

बी
आयटी क्षेत्रात जर टेक्निकल लाइन मधे न रहाता प्रॉजेक्ट मॅनेजमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट अशा लाइनमधे जायचं असेल, प्रगती करायची असेल तर पीएमपी चा खूप फायदा होतो. त्यांचं जे कोर्सवर्क आहे त्याचा, पेम्बॉक चा पण खूप फायदा होतो. प्रत्येक कंपनीत, प्रत्येक प्रॉजेक्टमधे त्यातली प्रत्येक कल्पना वापरली जाईल, आचरणात आणता येईल असं नाही. तरिही काय काय वापरता येईल याचि माहिति असली तर प्रॉजेक्टचे साईझ व प्रकार यावरून तू वेगवेगळ्या गोष्टी वापरू शकतोस. पी एम पी ची शिकवण अगदी शिस्तीने जे पाळतात त्यांचे अधिकतर प्रॉजेक्ट्स यशस्वी होतात असा माझा अनुभव आहे .

मेधा आणि ईतर सर्वांना धन्यवाद. मी पी ऐम पी चा अभ्यास करायला सुरवात केली आहे शनवारपासून. बघू या.. कितपत यश मिळतं.

प्रिन्स २ केलेले कोणी आहेत काय? त्याचा खर्च, अभ्यासक्रम ह्याची कोणास माहिती आहे काय?
>>> माहिती असल्यास मलाही कळवा, मला ही प्रिन्स २ करायचे आहे

Pages