दुबई-शारजाह- गटग
दुबई-शारजाह गटग
आज-करु उद्या करु म्हणून गेले अनेक महिने पुढे पुढे जाणारा दुबई गटग, एके दिवशी वर्षा आणि मी फेसबुकवर एकेमेकींना भेटल्यामुळे अचानक शुक्रवारी म्हणजे ११ जूनला करायच ठरलं लगेचच फोनाफोनीही झाली. वर्षानी शृतीला, राधिकाला, मुकुंदकाकांना फोन केले ....पण...पण नेमक वर्षा आणि कंपनीला ११ तारखेच्या शुक्रवारी संध्याकाळी एका बर्थडे पार्टीला जायचं असल्यामुळे त्याच दिवशी दुपारी करु या असं ठरवण्यात आलं. पुढील चर्चा मेलवर करु या असा श्रीमंतांचा हुकूम आला. मग पुढील चर्चा मेल वर चालली होती, कोणी काय आणायच? कोणी कोणाला आणायच? याचीही ठरवा-ठरवी झाली.
सगळ्यात लांब मी आणि मुकुंदकाका रहात असल्यामुळे मी मुकुंदकाकांना सोबत घेऊन जाऊ शकेन असं कळवल होत. (ऐनवेळी त्यांच येणं रहीत झालं ) याहीवेळा बनुताईला प्रत्यक्ष ऐकायची संधी गेली.
तर....पुढे; मग गिरीशना फोन करायची जबाबदारी आपसुकच माझ्यावर आली , मी फोन केला वेळ सांगितली त्यांना काय काय आणायचय तेही हळूच सांगून टाकलं ( गिरिश म्हणाले असतील काय लोक आहेत पहिल्यांदाच भेटतोय तरी टीटीएमएम करतायत लोक) पण नियम म्हणजे नियम सांगितलच त्यांनाही ज्युस आणायला.
सगळं काही व्यवस्थीत ठरलेलं, गुरुवार दुपार......फोन वाजला, "हॅलो, अग मी बोलत्ये, श्रुती, ऐक ना! काय झालय माहीती का?( मी म्हटल झालं, आता ही मागच्यावेळसारखी येत नाही म्हणत्ये की काय? )
तर... वर्षा ज्यांच्याकडे जाणार होती ना त्यांना तिने कळवलय ती येऊ शकत नाही म्हणून; आपण सगळे संध्याकाळीच भेटतोय. मी हुश्श्य! केलं' म्हटल हं, हरकत नाही, आम्ही मोकळे आहोत येऊ शकतो.
शुक्रवार, दुपारी चार वाजता गिरीशना फोन करुन सांगितल की आम्ही त्यांना घ्यायला साधारण पावणे सहा ते सहाच्या दरम्यान हॉटेलजवळ येऊ.....निघालो वेळेवर आणि आता हा एक्झीट घेतला की हॉटेल शांग्रीलाचा बोर्ड दिसणार....पण आमचा एक्झीट चुकला होता आणि आम्ही पुन्हा गोल गोल फिरत भलत्याच रस्त्याला लागलो होतो.
शेवटी एकदाचे हॉटेल शांग्रीला सापडलं, गिरीश भेटले, गाडीत बसले आणि आम्ही शारजाहकडे जायला निघालो.
वर्षाच्या घरी पोचल्यावर, दोन मुलं (हो मुलंच आम्हा सगळ्यांसमोर अगदीच लहान दिसले बिचारे ) बसलेली दिसली त्यातला एक सुमेध असेल असा अंदाज लावला दुसरा कोण कळेना. (सुमेधचा मित्र महेश होता हे बरच नंतर कळलं)
एवढ्यात जेके आणि राधीका विथ गुलाबजाम डबा आणि ज्युनिअर असे आले...आता ह्याला ज्युनीअर म्हणत्ये कारण नाव आठवत नाहिये. तसं बघायला गेलं तर सुमेध...महेश आणि हा असा ग्रूप झाला असता.
योग सारिका आणि लिटील चँप दीया आधीच आलेले होते; कोणीच तिच्या वयाच नसल्यामुळे दीया थोडंस छळत होती बहुतेक सगळ्यांना.
सगळे जमले होते पण कार्याध्यक्षीणबाईंचा पत्ता नव्हता वाटल मारली टांग हिने परत. पण तेवढ्यात वर्षाच्या फोनवर ती पोचत्ये म्हणून निरोप ऐकला.
शृती आली(एकदाची) आणि साहजिकच आमची सगळ्यांची कलकल सुरु झाली . कार्यक्रम ठरवल्याप्रमाणे कविता वाचन सुरु करायला हवं होतं वेळ चालला होता आणि शृती काहीच बोलायला तयार नव्हती...मीच आपलं तिच्या मागे लागून आता सुरु करु या ग! म्हणत कविता वाचूनपण टाकली माझ्यानंतर वर्षा मग सुमेध, गिरिश, आपआपल्या तर शृतीनी, प्रकाश काळेल यांची योध्दा वाचली आणि धूंद रविची एक
विशाल आणि कौतुक यांच्या कविता (प्रत्येकाची एक) वाचल्या अश्या कविता वाचल्या. राधीकानी सुद्धा एक सुंदर कविता वाचली. (राधीकाचं सादरीकरण खूप आवडलं मला.)
गिरीश, कविता घेऊन आले नव्हते....त्यांच्या कित्येक सुंदर कविता ऐकायला आवडल्या असत्या पुढच्या वेळेला फाईल/लॅप-टॉप सहीत यायला हवं. हुकमावरून! तरी त्यांनी काही तुझ्या कवितांमधल्या काही ओळी ऐकवल्या.....कोणतीही कविता प्रत्यक्ष कविच्या तोंडून ऐकायला मजा येते.... मस्त वाटल.
वर्षानी ऐकवलेल्या तिच्या कविता प्रेमबन आणि दुसरी अजून एक त्याही ऐकायला मजा आली, वर्षाच्या आईची कविता ग्रेट. आई आणि वडील असा दोघांकडचा लिखाणाचा वारसा आहे वर्षा तुला, लिहीत रहा ग!
हे काव्यवाचन प्रकरण सुरु करायच्या आधीच माझ्या लेकीला भूक लागल्यानी मी वर्षाला खायला काय केलयसं/आणलयस ते देऊ या का विचारलं ...आणि तिने तिच्या मेडला साबुदाणेवडे तळायची ऑर्डर सोडली. ते वडे एवढे मस्त झालेले की ते खाण्याच्या आणि ज्युसच्या नादात रॅगींग राहिलचं तरी सुमेधकडे बोट दाखवत हा योग म्हणून योगनी शृतीला ओळख करुन दिलीच. (मुरलेला मायबोलीकर हे! असा बर सोडेल )
शृती थोडीशी गडबडली पण सारिकाशी आत बोलण झाल्यामुळे तिने योगला लगेचच ओळखल.
आठ ते साडे दहा तर कविता वाचनच चाललं होतं, मग गाण्यासाठी मांडामांड सुरु झाली....माईक वगैरे लावून झाले...आणि वर्षाच्या लेकानी एका माईकचा आणि दीयानी दुस-या माईकचा ताबा घेतला.
आदित्यनी रॉक यू एकदम जमके म्हटल दुसरही म्हणत होता पण आईनी दम दिल्यावर बिचा-यानी माईक अनिलच्या हातात देऊन टाकला....इकडे दुस-या माईक वर दीया मॅडम नी सारे के सारे गम को लेकर, आणि लकडी की काठी उरकुन घेतलं....तिला रिमझीम गिरे सावन सगळ कसं पाठ आहे? आणि एवढं ताला-सुरात कसं गाते? कसली समज आहे गाण्याची...जस्ट ग्रेट.
लक्षात राहिलेली काही गाणी....
अनीलनी गायलेली सगळीच गाणी अप्रतिम.
योग सारिका, सलामेइश्क, मजा आ गया
वर्षा. आज जाने की जिद ना करो
सुमेध, मेरे रंग मे....
श्रुती तू पण चांगल गाऊ शकतेस पुढच्या वेळी गाण अक्ख हवं
गिरिश कडून पण पुढल्या वेळी अक्ख गाणं हवं
सगळ्यात आवडल्या त्या मोहननी गायलेल्या गझल्स.
मंडळी गाणी संपवायला तयारच नव्हती घड्याळाचा काटा बाराच्या पुढे चाललेला.....कितीतरी वेळा जेवायला चला सांगितल्यावर एकेकानी जेवण घ्यायला सुरवात केली.
मेन्यु असा होता,
ज्युस- गिरिश
स्टार्टरः साबुदाणा वडा- वर्षा
मिक्स व्हेज ( बाय सारिका सौ. योग)
व्हेज भुना(हॉटेल कामत)
पोळ्या- श्यामली/शृती
बुंदी रायतं-श्यामली
टॉमेटो राईस- वर्षा
गुलाबजाम_ राधिका
कामतच्या व्हेज भूना तसच पडलं होतं सगळ्यांनी सारिकानी आणलेल्या भाजीवर ताव मारला(पोरांनीसुद्धा)
टॉमेटो राईस सही झालेला (डब्ब्यातपण भरून मिळाला. सगळ्यानाच खूप आवडला.
गुलाबजाम का नाही आणले म्हणून माझी खरडपट्टी झाली
हे सगळं आवरून अगदी आता निघायलाच ह्वं म्हटल्यावर आम्ही रात्री दीड्च्या सुमारास घरी जायला निघालो, वाटेत गिरिशना सोडून घरी पोचलो तर सव्वा दोन झाले होते.
धमाल जीटीजी झाला, मजा आली,मंडळींची लवकरच पुढचा ठरवा अशी फर्माईश आलीये
गुलाबजाम खाल्ल्यावर पानाची प्रचंड आठवण झाली
पुढच्या वेळी मुकुंदकाका, अनिता आणि अजून दुबईकर असतील अशी आशा आहे.
फोटो सगळ्यांना मेल केले आहेत
>क्या बात है! याला म्हणतात
>क्या बात है! याला म्हणतात हाडाचा कवि....
>हाडाचे कवी आहात
गिरीश आजपासून अधिकृत नामकरणः ऑर्थोकवी
श्यामलीतै, 'कुठंही' कविता
शामली आणि गिरीशजी आपण सुशोभित
शामली आणि गिरीशजी आपण सुशोभित करून लिहिलेला वृतांत फारच छान आहे डोळ्यासमोर अगदी ते प्रत्येक क्षण लगेचच येऊन गेले.......... मस्तच
तर लोक्स, सगळ्यांनीच मनापासुन
तर लोक्स,
सगळ्यांनीच मनापासुन भाग घेतल्यामुळे खुप मजा आली. सुमेध बाळा एरवी रॅगिंग विसरले होते पण मी साबुदाणा वडे खाण्यात बिझी असल्याचं जाहीर सांगितल्याबद्दल तुझं रॅगिंग नक्की!
त्यांच्या कविता खरंतर माबोवर वाचलेल्या. पण प्रत्यक्ष श्यामली, गिकु, योग, वर्षा यांच्याकडुन ऐकतांना वेगळाच फील आला. आदीत्य आणि कौशल ची गाणी सुपर्ब! दीयाच्या फॅन्समधे आणखी २ फॅन्सची भरती ! भलतीच ग्गोड पोग्गी! देविकाला पटव गं श्यामली.
ज्या स्वतः ज्ञानदानाच काम करतात- मला पुन्हा त्यांच्याकडे येऊ देतील की नाही याबद्दल शंका आहे स्मित>>>> गिकु
अरे राधिका आणि जयंत आपलेच्चेत. काळजी नको.
गिरीश, सुमेध,महेश कुणीच पहिल्यांदा आलय असं जाणवलं नाही. नेहमीप्रमाणेच सगळे माबोकर जुनी मैत्री असल्यासारखे भेटले, वागले. योग, सारीका, अनिल, वर्षा, श्यामली, सुमेध, महेश, मोहन सगळ्यांची गाणी सुरेख झाली. योग, सारीकाचं ड्युएट अप्रतिम! वर्षा अनिल तुम्ही पण एकतरी ड्युएट गायला हवं पुढच्यावेळी.
पुणेकर, ठाणेकर काय भानगड आहे?आपण सगळे माबोकर आहेत तेव्हा ते सोडुन सोडा हो! काहीतरी गाण्यागिण्याचं बोला की.
एक सुरेल संध्याकाळ जमवुन आणल्याबद्दल सगळ्यांना धन्स!
श्यामले..... आत्ताच वाचतेय
श्यामले..... आत्ताच वाचतेय तुझा वृत्तांत. सही धमाल केली राव तुम्ही लोकांनी !! सगळं वाचूनच इतकं छान वाटलं ना....!!
आता तर काय तिथे योग आहे म्हणजे गाणी , बजावणी असणारच........मज्जा करो
जयु, वाचलास एक्दाचा अग
जयु, वाचलास एक्दाचा
अग परवापण अनिताच्या घरी गट्ग झाला, गाणी नव्हती फारशी पण तरिही जामच धमाल आली.मी आत्ताच दुबईवर थोडक्यात वृत्तांत लिहिलाय.
wa khupaach chaan ....vaachun
wa khupaach chaan ....vaachun khup ch majja vatali .... amhi luvkarach Bahrain varun dubai la yenar aahot ...teva tumha sarvana bhetu ashi aasha aahe ......
Pages