१२ जून , २०१० .. काळ्या मेघांचा गळका, फाटका रेनकोट घालत दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणेच मी ही सकाळी उठलो अन एक गोड आवाज ऐकण्यासाठी मोबाईलमधला नं रि-डायल केला, अन ऐकमेकांच अभिनंदन केलं. अभिनंदन ! कशाचं?? अहो आमच्या नातेसंबधाला तब्बल ५ वर्षे पुर्ण झाली. कसे गेले हे दिवस, कितीसे मंतरलेले , कितीसे सुखाचे अन कितीसे अंतरातल्या विरहात चिंब भिजलेले याची भराभर पाने डोळ्यासमोरून उलटून गेली अन प्रत्येक पानावरं लिहिल्याप्रमाणे क्रमश: हा शब्द मनाला आनंद देवून गेला. सकाळची तयारी करून घर सोडलं अन ६.५५ च्या लोकल मधे बसलो. संपुर्ण पिंपरी लोकल प्रवास, ५ वर्षातल्या गुलाबी आठवणी गोंजारण्यातच गेला. लोकलमधून स्टेशनवर पाय टाकणार तोच तीचा फोने आला. "व्यवस्थीत पोहचलास ना रे ? पाऊस जास्त नाहिये ना ? मी अजून कर्जत स्टेशनवरच आहे.. तू लवकर खोपोलीला ये.. की मी येऊ लोणावळ्यापर्यंत मग आपण तिथूनच अलिबाग ला जाऊयात का ? मी फक्त तीचा आवाज ऐकत होतो अगदी भान हरपून.. तेवढ्यात तीने विचारलं काय झालं रे, मूड नाहिये का तुझा, नको जाऊया का आपण कुठेच? तेवढ्यात मी जागा झालो, आसवांच्या धुक्याला पुसून मी येतोय २० मि. खोपोलीमधे तू पण पोहचं एवढं बोललो अन फोन ठेवला.
मी खोपोलीला पोहचलो, एस टी स्टँड वर ! पाऊस हलकाशा शिरकाव करत होता अन घरी परतणार्या पिल्लांची अन माय बापांची लगबग चालु होती स्टँडवर. चौकशीअंती मला कळालं की अलिबागला जायला २:३० तास लागतात. ९:३० ची एसटी आहे. फोनाफोनीवरून तीला कळवलं अन १५ मि. एकटाच वाट पाहत बसलो. आधी ती यावी अन मग एस टी.. या अपेक्षेत ! पण तिच्या आधी कधी नव्हे ते वेळेवर एस टीच आली. ९ वाजताच एस टी ?
तेवढ्यात रिक्षातून ती उतरली अन ओरडून म्हणाली एसटीत जाऊन जागा धर मी आलेच. मी जागा धरली पण माझ्या शेजारची जागा occupied होती अन तीच्या शेजारचीसुद्धा. पुन्हा जवळ बसता येत नाही म्हणून हूरहूर. ऐकमेकांकडे फुटभर अंतरात पाहणे सुद्धा कसे से होत होते. कारण ते अंतरही नकोसं झालं होतं पण काय करणार ! थोड्या वेळाने पेण जवळ दोघांना बसता येईल असं सीट मिळालं लगेच तिथे जाऊन बसलो. प्रवास चालूच होता एसटिचा अन आमच्या प्रेमाचा सुद्धा. एसटी एक एक झाड, नद्या नाले यांना हाय बाय करून चालत होती तर मी अन ती डोळ्यातल्या नजरेला आपल्याला हवे असे अर्थ लावून ओठांवर स्मिताचे कारंजे उसळत होतो. या सगळ्यात प्रवास कसा संपला ते कळलंच नाही. अन एसटी ने अलिबागमधे जो ब्रेक लावला तोच आमच्या २ तासांच्या date on whleels ला लगाम लागला. अलिबागमधे उतरल्यावर तीच्या चेहर्यावर कमालीची सुखे चमकत होती. अगदी भर दिवसा चांदण तिच्या चेहर्यावर पडल्यासारखं भासत होतं. ती उतरली तेव्हा हळूच म्हणाली , मला थोडीशी भूक लागलीये. मी ही म्हणालो मलाही लागली होती पण आता पोट भरल्यासारखं वाटतयं, बघ ना ढेरीवर तीचा हात ठेवून. ती हसली अन म्हणाली नाटकं करू नकोस, चल काहीतरी खाऊन घेवूया. अन मग नाश्त्यासाठी व्हेज हॉटेल शोधण्याचा आमचा प्रवास सुरू झाला. सगळी कडे मासांहाराचे बोर्ड वाचून तीला कसतरी होत होतं, तीची भूक मरणार तोच आम्हाला एक व्हेज हॉटेल मिळाल. नेहमी प्रमाणेच मिसळ पाव ! अन एखादी वेगळी अशी डिश म्हणून आम्ही ढोकळा पकोडा डिश वर ताव मारला, आंबा पन्ह ढोसलं अन किनार्याच्या रस्त्याकडे निघालो.


एखादं जहाज कसं लाटेचा हात धरून खवळलेल्या सागरात किनारा शोधतं तसं आम्ही सागर किनारा शोधत होतो. फरक फक्त एवढाच कि त्याचा प्रवास पाण्यातला असतो अन आमचा मात्र जमिनीवरचा होता. किनार्यावर पोहचतात, अलिबाग समुद्र किनार्यावर एक गर्दी दिसत होती. सगळे लोक कट्यावर उभे होते. सागर किनारा कुठेच दिसत नव्ह्ता. मला तर एका क्षणी आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाहीये ना असचं वाटलं. पण समोरचा किल्ला पाहून आपणचं बरोबर आहे, कदाचित समुद्रचं चुकतोय अस वाटलं. तिथे फुटपाथवर उभे राहीलो तेव्हा ऐकमेकांकडे पाहिलं अन वाटलं ह्या सागरासारखंच आपण एकत्र जगायचं. कधी शांत राहून तर कधी आलेल्या वादळाला प्रयत्नांनी शमवून. नंतर तिथे आम्हाला बसायला एक बाकडं मिळालं. त्या बाकडयावर बसून उधाण आलेल्या सागराला न्याहळत होतो. ३ फुट उंचीच्या लाटा उसळत होत्या. अन कधी त्या लाटा ऐकमेकांना बिलगून पुन्हा क्षणात विलग व्हायच्या कोणीतरी पाहतयं या लाजेनचं असावं बहूतेक त्यांच ते वागणं. आम्ही मात्र त्यांच बिलगण अगदी घट्ट हातात हात घालून पाहत होतो. अता , अलिबाग सारख्या गर्दिच्या किनार्यावर बसून एवढचं करणार ना आम्ही
नाहीतर मग मोबाईलवर हा सागरी किनारा, ओला सुंगध वार, ओल्या मिठित येतो अंगावरी शहारा असं काहीसं झालं असतं. तिला थोडीशी पाण्याची भीती वाटत होती म्हणून ती उसळणार्या लाटांजवळ यायला घाबरत होती, पण मी आहे ना या माझ्या एका वाक्यानेच ती माझ्याबरोबर त्या पायर्यांवर बसायला तयार झाली जिथे एवढ्या मोठ्या लाटा सुद्धा खुज्या ठरून गेल्या. लाटांच्या उसळत्या कारंजांमधे आम्ही भिजलो. काही फोटोही काढले अगदी योगेश२४ ने काढलेले हा सागरी किनारा थिम सारखे आम्हीही फोटो काढले. बालवयातले दोघे बहीण भावंडे अन उतारवयातले आजी अजोबा पण तरूण वयातलं कोणी सापडेच ना तेव्हा आम्ही दोघांनीच तिथे उभा राहून फोटो काढून घेतला.:फिदी:

मागे वळून पाहीलं तर तीचं लगेच सुरू झालं, मला पानीपुरी खायची, नारळ पाणी अन त्याची मलाई खायची. कणीस खायचं. तेव्हा मी मनातल्या मनात म्हणालो ५ वर्षात मी असले खाण्याबाबतीचे हिचे हट्ट कधीच अनुभवले नव्ह्ते. तेव्हा त्या गाड्याकडे चालत असताना तीला माझ्या दोन मैत्रिणींची आठवण झाली ज्यांच्याबद्दल एक वर्षापुर्वीच तीला कळालं होतं. जेव्हा तीला कळालं मी लपवलेलं काही तेव्हा फक्त तिच्या सुखासाठी माझ्या आयुष्यातल्या दोन पानांना मी अक्षरशः फाडून माझ्या डायरीच्या कव्हर मधे लपवलेलं होतं. वर्षभर प्रेमाच्यातर सोडाचं पण औपचारिकतेचं सुद्धा साधं भाष्य केलं नव्ह्त त्यांच्या सोबतं. आपल्याच काळजाच्या तुकड्यांशी इतकं कठोर वागतं का हो कोणी, पण माझ्या आयुष्यात माझ्या अन तिच्या अखंड सौख्यसाठी मी हे दु:ख पत्करलं अन वर्षभर ते पाळलं सुद्धा. ती सरळ सरळ फोन हातात देवून फोन लाव म्हणाली, मला तर काही कळेचना मी फोन लावला ऐका मैत्रीणीला तेव्हा ती सुद्धा कुठेतरी फिरायला गेली होती, रोमिंग मधे असूनही मी बोलतोय तो ही तब्बल एक वर्षानंतर हे ऐकून बोल म्हणाली अन माझ्याशी अबोला, भांडन ह्या सगळ्यांना वाव देण्याआधी माझं नव्याने वसलेल्या गावाविषयी तिने कुतूहलाने विचारलं.
मला बरं वाटलं , तिची खुशाली ऐकून. अन तिला बरं वाटलं आमच्या दोघाची खुशाली ऐकून. मला मात्र जरासं वेगळचं वाटत होतं. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली, नारळपाणी अन मलाई सुद्धा खाल्ली, काही मलाई तिच्या नकाला लागलेली पाहून हसलो सुद्धा ! पुन्हा परतीचा प्रवास , स्टॅंडकडे चालत जाऊ लागलो अन पुन्हा एक धक्का फोन घे अन तुझ्या दुसर्या अन सगळ्यात जवळच्या मैत्रीणीला फोन लावं. मी थरथरत फोन हातात घेतला अन पटकन तिचा फोन नं पुटपुटत डायल केला तेव्हा म्हणाली , माझे नं सुद्धा असेल ना रे तुझ्या लक्षात की रिडायल करूनच लावतो नेहमी. अन उगाच हसली. मी त्या मैत्रीणीला फोन लावला तेव्हा ती व्यस्त, फोनची रेंज व्यस्त. निटसं बोलण झालं नाही किंवा माझ्यावरच्या रागाने तीने ते होऊच दिलं नसावं बहूतेक. पण ती सुखात आहे हे कळल्यावरही माझं समाधान झालं नाही तिने फोन कट केला. थोडं गप्प बसून आम्ही पुन्हा चालू लागलो , अन मीच तिच्या हातून फोन घेतला अन पुन्हा मैत्रिणीला फोन लावला तर तिचा फोन बंद आहे अस समजलं. तेव्हा मला जाणवलं की तिला सुद्धा आमच्या सुखातलं पुन्हा एकदा सतावणारं अंतर पहायचं नव्हतं म्हणूनच बंद केला असेल फोन तिने कदाचित ! चालत चालत थोडासा रस्ता हरवत आम्ही एस टी स्टँडवर पोहचलो. तिथे अलिबाग सातार एस्टी लागलेली. आम्ही त्या बस मधे चढलो तर पुन्हा घोळ १८ ते २० अशी तीन सीट्स पोयनाड पासून रिझर्व केली आहेत तेव्हा तुम्ही बसा पण तिथून पुढे तुम्हाला उभ राहून प्रवास करावा लागेल अस वाहकाने नम्रतेनं सांगितलं तरिही आम्ही तिथेच बसलो नशिबाचं कौल आजमवयाचा असं ठरवून.
आम्ही पहिल्यांदा पेण पर्यंतची तिकीटे काढली, अन जायचं होतं खोपोलीला:फिदी: कारण प्लॅन बी वापरला. रिझर्वेशन वाले आले तर पेणला उतरून दुसर्या एसटीत बसायचं नाहीतर पेण पर्यंत कोणी नाही आलं तर पुढच्या प्रवासाचं तिकीट काढायचं. प्रवास सरु झाला, कुठेही एस टी थांबली कि वाटायच आले रिझरवेशनवाले ! नशिब आमच्या सोबत होतं म्हणून पेण पर्यंत कोणीच आलं नाही. पेण मधे तिला एक फ्रूटी घेवून दिली तेव्हा ती फ्रूटीचे फुरके घेत म्हणाली कसं होतं माझं गिफ्ट मी गप्प बसून तिच्या डोळ्यात एकसंथ पाहून फक्त डोळे पाणवले अन खोपोली ऐवजी मी खंडाळ्याचं तिकीट काढलं. अन खंडाळ्यापर्यंत फक्त तिच्याकडे बघत बसलो होतो. खंडाला आला तेव्हा शुटींग पाँईटवर काळ्या नभाच्या गर्दित दाट धुक्याच्या सानिध्यात एक भेट घडली अन मी कधी न व्यक्त झालो होता असा व्यक्त झालो. न शेवटी डोळे पुसत म्हणालो , मला अशीच प्रेयसी हवी होती.. जी बायको झाल्यावरही शेवटपर्यंत प्रेयसी म्हणूनच राहील. तीने डोळे पुसले अन आम्ही खंडाळा स्टेशनवर जाऊन दोन विरुदध दिशेला जाणार्या गाड्यांची वाटं पाहू लागलो. मला ह्या विरुद्ध दिशेची भयंकर चिड येते ती अश्याच वेळी. एवढं मिठीतून एकत्र आलेली दोन शरीरे ह्या यंत्राच्या गाड्या विरुद्ध् दिशेला घेवून जातात. मला बाय करून ती डेक्कन एक्सप्रेस मधे बसली अन मी सुद्धा फ्लाईंग किस देवून सिंहगड एक्स्प्रेस ज्या फलाटावर येते तिथे आजच्या दिवसाची उजळणी करत बसलो..
आत तुम्हीच सांगा, कसं होतं तिच गिफ्ट अन माझं गिफ्ट. पण एवढचं सांगेल आयुष्यभर लक्षात राहील असंच गिफ्ट तिने मला दिलं. अन त्या गिफ्ट बद्दल मला उघडपणे सांगताना मला जराही संकोच वाटला नाही. वपुर्झांनी लिहिल्याप्रमाणेच बायकोने प्रेयसी म्हणून जगाव आपल्या संसारात ! याचा मला लग्नाआधीच साक्षात्कार झाला.
ह्म्म्म
ह्म्म्म
धन्यवाद सगळ्यांनाच ! तुमच्या
धन्यवाद सगळ्यांनाच ! तुमच्या प्रत्येक प्रतिसादाला माझे नमन ! शिव्या शापात तही आशिर्वाद शोधावे ...
शाब्बास सुर्या
शाब्बास सुर्या
सगळं काही लपवून आत्मचरित्रात
सगळं काही लपवून आत्मचरित्रात खाजगी आयुष्याचं पितळ उघडं करणं आवडतं लोकांना मग चालू घडामोडीनां मी वाटेतचं मांडलं म्हणून काय बिघडलं .. याचं उत्तर मिळेल का मला ?
अरे सोड रे सुर्या, आप लगे
अरे सोड रे सुर्या, आप लगे रहो.
हिंदीत एक म्हण आहे XX XX, हाथी चाले.
मंदार, हा हसण्याचा विषय नाही
मंदार, हा हसण्याचा विषय नाही रे मित्रा, ते सर्वतोपरी चूक आहे असं म्हणारचं नाही ! कारण प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. जसं मी मांडलं तसंच त्यांनी मांडलं. देवाणघेवाण हा संवादाचा कणा आहे. फक्त देणारा असेल तर मुका संवाद अन फक्त घेणारा असेल तर तो स्वार्थी संवाद ! मी देवाणघेवाण केली. याचा मला आनंद आहे.
हसलो नाही रे, स्मित केलं तुझं
हसलो नाही रे, स्मित केलं
हे असं
तुझं बरोबर आहे म्हटलं मी
मस्त! मन हळवं झालं
मस्त!
मन हळवं झालं वाचून!
अतिशय सुरेख लिहीलत!
इतकं छान, स्पष्ट, निर्व्याज्य
इतकं छान, स्पष्ट, निर्व्याज्य खुप दिवसांनी वाचलं.
खुप छान वाटलं.
अभिनंदन ! तुम्हा दोघांचं.
कारण अशा तरल जाणीवा असण, त्या एकमेकांना समजणं, भावणं फार मौल्यवान चीज आहे ही!
दोघांनीही जपून ठेवा हा ठेवा ! पुढच्या सर्व वाटचालीला मनापासून खुप खुप शुभेच्छा !
या आठवणी तुम्हाला सगळ्यांशी शेअर करव्याश्या वाटल्या अन तिलाही हे आवडले; हे दोन्ही तुम्हा दोघांच्या नात्यातली पक्की वीण दाखवणारे आहे. तेव्हा 'किप इट अप '.
या अशा निर्व्याज्य आठवणी आपल्या पुढ्च्या जीवनात खुप काही देऊन जातात, खुप काही सावरून जातात अन खुप काही साठवूनही जातात, तेव्हा जपून ठेवा ही आठवण, अन अशाच खुप खुप नव्या आठवणी तुमच्या आठवणींत जमा होवोत
आरती२१, अनुमोदन
आरती२१, अनुमोदन
किरणा मस्तच रे गुडलक टु यु
किरणा मस्तच रे

गुडलक टु यु बोथ
सुकि, चांगलं लिहिलयं! ज्यांनी
सुकि, चांगलं लिहिलयं!
ज्यांनी इथे लिहिताना संभाळा म्हटलय ते तुम्हाला (खर तर तिला) प्रत्यक्षात काही त्रास होऊ नये म्हणून हो. तुम्ही काही लिहूच नये म्हणून नाही. लिहिलेलं वाचून धारणा/मत बनवतात लोकं आणि त्याचा मानसिक त्रास होतो.
प्रगो, अरे एका मुलीच्या दृष्टीकोनातून लिहिलय रे ते, पोलिसिंग नव्हे. मंद्या, नाजूक नाती कसल्याही ताणाने विरतात म्हणून सांगितलयं.
सूकि, जर तिला माहीत झालं असेल नि चालणार असेल तर कोणाची काय हरकत असं समरसून काही लिहीलं तर वाचायला?
तुम्हाला वैयक्तिक आयुष्यासाठी शुभेच्छा!
आरती२१ ला अनुमोदन
आरती२१ ला अनुमोदन
जाजु, संभाळा म्हटलय ते आणि
जाजु, संभाळा म्हटलय ते आणि तोपर्यंतच पटलं
आणखी वाद वाढावा ही ईच्छा नाही म्हणुन पुढे बोलत नाही, पण माझ्यामते सुर्यकिरण काही लहान मूल नाही. त्याला कळतं काय योग्य आणि काय अयोग्य ते.
एकदम सहि.: शुभेच्च्छा तुम्हा
एकदम सहि.::)
शुभेच्च्छा तुम्हा दोघांना.
>>>>"पण आपल दुध आपल्याच घरात
>>>>"पण आपल दुध आपल्याच घरात ऊतू जात दुसर्याच्या नाही..."
सुकीने हे सर्व आपल्यासमोर मांडल कारण तो "आपला" आहे... त्याला इथे आपल्या भावनांना वाट करुन देणे सोपे वाटते
चिमण्या तुझ्या मताशी अगदी सहमत.......
बाकी सुर्या फोटो मात्र मस्त काढलेत बरं का...
अतिशय सुरेख आठवण आहे
अतिशय सुरेख आठवण आहे सु.की...खुपच मस्त लिहीलंय...
सगळे प्रतिसादही वाचले, प्रत्येकाचा concern आपापल्या जागी थोड्या फार प्रमाणात योग्य आहे असं मला वाटतं..पण मुद्दा काय..की हे सगळे तुम्हाला सगळ्यांशी शेअर करावंसं वाटलं आणि तुम्ही ते केलंत..moreover तिलाही ह्यात काही प्रॉब्लेम नाही..तिथेच विषय संपतो..बाकीचे प्रश्न,वाद सगळंच गौण (माझ्या मते)
आणि आरती२१ ला पुर्ण अनुमोदन!! हा अनमोल ठेवा असाच जपुन ठेवा..नशीब लागतं असा जोडीदार भेटायला. खुप खुप शुभेच्छा दोघांना
सुमेधा, चंपी धन्यवाद. अगदी
सुमेधा, चंपी धन्यवाद. अगदी मनापासून..रोज हेच पान वाचून पुढची पाने उलगडायचीच राहून जातात
ह्या दिवसाचा आनंद आयुष्यभर आबादित राहील.
क्या बात है!!! खूप छान लिहीले
क्या बात है!!!
खूप छान लिहीले आहेस!
<< मला ह्या विरुद्ध दिशेची भयंकर चिड येते ती अश्याच वेळी >>
Pages