चुंबन

Submitted by ट्यागो on 10 June, 2010 - 11:18

छे !!!
हे कसलं चुंबन?????
घिसाडघाई ओठ शिवले की झालं???
काय डब्बा ऐस पैस खेळतोय की
अप्पारप्पी ???
नाय नाय.. नाय...

ओठांनी ओठांना विलग करत
एक श्वास द्यायचा... उष्ण...
गच्च मिटालेल्या डोळ्यांनी
हृदयातलं सगळं म्हणनं हळूवार सोडत न्यायचं....
अन मग रस्सीखेच सुरू करायची
हाड नसलेल्या अवयवाची ...

तो काही फक्त उन्माद नसतो...
तीही एक भाषा आहे...प्रेम व्यक्त करण्याची...

संवादाचे परिमाण जेव्हा...
तोकडे पडू लागतात...
तेव्हाच उपसायचं हे म्यानबंद हत्यार..

अन मग बघ सगळ्याच गोष्टींची परिमाणे बदलू लागतात...

मयूरेश चव्हाण, मुंबई.
२२.०१.१०, ०२.४५

गुलमोहर: 

दोन्ही कविता सुरेख.. !!

ती माध्यमं आहेत गं..
संवादाची, ऐलतीरी पसरलेली!
आपण अजुनही त्यांवरच जगायचं?
वाटलं पैलतीरी आलोय...>>>> ग्रेट !!!

हे कसलं चुंबन?????
घिसाडघाई ओठ शिवले की झालं???
---------------------------
चुंबन कोणी कधी घिसाडघाईने करतं का ?
काय राव
माणूस कितीही बिझी असला तरी यासाठी नक्कीच वेळ काढेन

छान कविता

ती माध्यमं आहेत गं..
संवादाची, ऐलतीरी पसरलेली!
आपण अजुनही त्यांवरच जगायचं?
वाटलं पैलतीरी आलोय...>>>>>
अप्रतिम.

मयुरेश , आज तुझ्या कवितांवरचे प्रतिसाद वाचुन मला एक सुभाषित आठवले ...

||ये नामकेचिदिह प्रथयन्त्यवज्ञा जानन्तु ते किमपि तान्प्रतिनैशयत्नः |
उत्पस्यते हि मम कोपि समानधर्मा कालोह्यं निरवधिर्विपुला च पृथ्वी: || .
...................( उत्तररामचरिताचा कवि कोण रे तो ...भवभुती बहुतेक !)

प्रतिसादात कुणीतरी विरोध करायचा आणि कुणीतरी योग्य असो वा नसो पाठिंबा द्यायचाच हा नेहमीचा खेळ वाचणीय वाटला. माझे वयक्तिक मत- कविता अश्लीलच आहे.

( अवांतर : बरे झालेत हबा आपण विशय काढलात :कविता अश्लीलच आहे. >>>> यावर एक चर्चा होवुन जाउदेतच .......श्लील..अश्लील ....नेहमीची ड्युअल स्टॅन्डर्ड हिप्पोक्रसी ...यावर बोलुयात एकदा सविस्तर ....पण इथे नको . नवीन धागा काढुयात

कविता आणि कवितेवरची कविता दोन्ही छान आहे. दुसरी कविता जास्त आवडली.
>>अन मग रस्सीखेच सुरू करायची
हाड नसलेल्या अवयवाची ...<<
हे थोडे उगाच वाटले (अश्लीलतेच्या दृष्टीने नव्हे!) कवितेच्या बाकी मूडला/ टेक्श्चरला न साजेसे असे.
संवादाचे माध्यम ही कल्पना मात्र मस्त.

अश्लील - श्लील बद्दल एक खूप मोठी चर्चा इथेच झाली होती. नवीन चर्चा सुरू न करता तिच पुढे न्यायची असल्यास हरकत नाही.

चर्चा..??
प्रगो, निधप कुणाकडून अपेक्षा करताहात?
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!

प्रगो,
मी तयार आहे यानिमीत्ताने हा विषयही योग्य रित्या हाताळला जाईल. विषय नाजूक आहे थोड सांभाळून. कुणावरही वयक्तिक टीका नको. सर्वांनी वैचारीक पातळीवर मते मांडावीत. कोण चुकतो आहे हे सांगण्यापेक्षा फक्त काय बरोबर आहे तेच सांगीतले जावे. आपण धागा सुरू करावा हि विनंती. उद्या सकाळी आरंभ करू.

-हबा

मयुरेशा साल्या असं पण काहीतरी लिहीलं होतंस बोल्ला नाहीस कधी?

कविता आवडली... रस्सीखेचीबद्दल नीधप यांचं मतही पटलंच! Happy

श्लील अश्लील जाऊ दे डब्यात

पहिले चुंबन

( पहिले फूल, पहिले मूल,- सर्व काही पहिले म्हणजे पहिलेच ! तसेच पहिले चुंबन ! पहिल्याची अजब जादू दुसर्‍यात नाही !)
(चाल : श्रवणात पेरणि केली इ.)

जें मनास शिवले नाही । ठावे न कल्पनेलाही। सुख असे।
जे दिसे न कवण्या जागी। जे अवर्ण्य वाणीलागी। सुख असे।
कविताही प्रतिभाशाली। कल्पितां जयातें थकली। सुख असे।
एकदा । कष्टता सदा । पुढति नच कदा- ।
अनुभवा येई । ते पहिले चुंबन देई । सुख असे॥1॥

चित्रासह रमणी बसली। नवयौवन शोभा ठसली। तन्मुखी।
करि ठेवुनी कोमल गाला । करि विचार न कळे कसला। सारखी।
डोले न अथवा हाले । मग कुठले बोले चाले। चित्र ते।
रंजना। मुग्धयौवना। करित कल्पना।
भावी कालाची । (तुज ठावे) त्या दिवसाची। दिवस तो॥2॥

चित्र हे पाहुनी असले । नेत्रांचे सार्थक झाले। वाटले।
परि तरंग अद्भुत उठले। अनुभवा न पूर्वी आले। जे कधी।
जाउनी चोरटया चाली । झाकिले नयन करजाली। न कळता।
संभ्रमे । दचकली गमे। त्वरित विभ्रमे।
श्रमवि कर दोन्ही। काढाया नयनावरुनी । मम करा॥3॥

तो बघुनी उघडया गाला। उन्माद मानसी भरला। स्वैरसा।
संमोह पडे नयनांला। मज विसर जगाचा पडला। क्षणभरी।
ठेवुनी मुख सखीच्या गाली। आणिली गुलाबी लाली। त्यावरी।
हासली। फार लाजली। दूर जाहली।
एक निमिषांत। झिडकारुनी माझा हात। हसतची॥4॥

हा खेळ एक निमिषांचा। एकदाच अनुभव त्याचा । नच पुन्हा ।
ते वारे आले गेले। जन्माचे सार्थक झाले। परि गमे।
ते निमिष, स्थिती ती, सुख ते। चित्ताच्या दृष्टिस दिसते॥ सारखें! ॥
स्वानंद - कमलमकरंद। सुधानिस्यंद।
भूवरी आणी। जे वर्णावे ते कोणी । सुख तसे॥5॥

एकदाच अनुभव त्याचा । आरंभ अंत सौख्याचा। एकदां।
आयुष्य न त्याला क्षणही। जन्मही पुन्हां त्या नाहीं । एकदा ।
मनि चटका लावायासी। पाठवी दैव जणु त्यासी। एकदा।
निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी।
मरण सोसावे । परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥

एप्रिल, १९१२. राम गणेश गडकरी

आंतरजालावरुन सुखासुखी नक्कल व चिकटवल्याममुळे आभार

च्या मारी "मरण सोसावे । परि पहिले चुंबन घ्यावें"" इतक सोप वाक्य लिहण्यापुर्वी किती खटपट करावी लागली त्या काळी राम गणेश गडकरींना.

हीच प्रेरणा काय रे मयुरेशा तुझ्या कवितेची ?

Pages