|| मरण ||

Submitted by विजयकुमार on 4 June, 2010 - 04:56

भय दाटुनी येते प्रत्येक रात्रीला
पणतीचा उजेड पुरेसा, भिवविण्यास मला,
काय घडेल ऊद्या, मन शंकाकुल,
कुठे निखळला तारा, मन जाहले व्याकुळ |

जगण्याचे सत्य, एकदाच उमगले मला,
मरण इतुके निकट, जीव कातावला,
शंका कुशंकाच्या सावल्या भिववती,
भुतकाळाच्या आठवणी, भुतासम नाचती |

आत उरले रडणे अन जगण्याचा अट्टहास,
आपुले माणुस परके, लाभणार ना सहवास,
तरीही मना रिझवतो, दाखवुनी खोटी आस,
डोगराएवढे दु:ख गाडण्या किती करु प्रयास |

जाणिला मी हा प्रवास, कधीतरी थांबणारा,
न थाबणारा काळ, माझ्याच माणसास घेऊनी जाणारा
तरिही बांधतो मी आशेचे खोटे इमले,
कोणी पोकळी निर्माण करुन जाणार, मनास उमगले |

एक्ट्याची वाट माझी, किती मरणे पाहणार?
किती गोळा करु सरपण, माझ्या सरणास काय पुरणार?
किती धाय मोकलु, सत्य उमगले मला,
मरण सर्व चिरंतन, निश्चित लाभणार सकला |

विजयकुमार.....................

९८२०२९७५०८

गुलमोहर: 

आत उरले रडणे अन जगण्याचा अट्टहास,
आपुले माणुस परके, लाभणार ना सहवास,
तरीही मना रिझवतो, दाखवुनी खोटी आस,
डोगराएवढे दु:ख गाडण्या किती करु प्रयास |

खूप आवडल्या ह्या ओळी ...

:हहगलो:... विजयकूमार.. सांगा ना का लिहिलाय तो फोन नं. Biggrin

जुनी सवय आहे कविता पोस्त केल्यावर खाली फोन नं. लिहिण्याची. हि कविता जुनी आहे त्यामुळे त्याखाली फोन नं आहे तो हि कविता इथे पोस्ट करताना तसाच राहुन गेला. और्कुट वर कविता पोस्ट करत असताणा तिथे फोन नं. देत असे.