लॉस एंजल्स, कॅलिफोर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:44

लॉस एंजल्स मधले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेवा!! कॅमरिओ आमचे पूर्वीचे गाव. मस्त शांत आहे गाव. मला खूप आवडते. मला शाळांबद्दल माहित नाही पण अडोल्फो कॅमरिओ चांगली आहे असं तेव्हा ऐकून होते.

बायदवे, माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही घर घेतले. सिमि व्हॅलीला. मुव्ह होऊ आम्ही ह्या विकेंडला.

बस्के अभिनंदन! सिमी व्हॅली ला एकदाच गेलो होतो. सुंदर भाग वाटला होता. जास्त नॉर्थला आहे ना? सांता बार्बरा/बे एरिया वगैरे किमान एका तासाने अंतर कमी होते बहुधा.

सध्याचे टाउन कोणते होते? सिमी व्हॅली मधे एक लांबचे नातेवाईक राहतात. तुला लोकल कॉण्टॅक्ट्स हवे असतील तर शोधून देतो.

थॅंक्स फा.. सध्या एलए सिटीत होते मी. वेस्ट हॉलिवूड. फायनली एले ट्रॅफिक पासून सुटका. हो सिमि एलएपासून नॉर्थ वेस्टला. आधी मी कॅमरिओ मध्ये राहय्चे ते सिमिपासून अजुन वेस्टला.
कॉंटॅक्ट दे की. चालेल. पण आम्हाला सिमि काही नवीन नाही. खूप मित्रमंडळ आणि आत्तेबहिण राहते तिथे. खूपदा राहिलोय आम्ही तिकडे.

होना समीर. तेव्हढं एक छान होतं! Happy

धन्यवाद सर्वांना. सेटल झाले की एक गटग करूया घरी! Happy (हे पुणेरी किंवा लेकरी इन्व्हाइट नाही! Proud )