बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow बरेच काही करण्यासारखे आहे. एव्हलिन अ‍ॅव्हेन्यू मध्ये घर आहे. बाजुला बरेच रेस्टॉरंट आहेत. आजुन त्या परिसरात गेलो नसल्याने नक्की कुठे घर आहे ते सांगता येत न्हवते. ( माय लेकी आधी गेल्या आहेत. मी पुढच्या आठवड्यात जाणार आहे)
टेक्नॉलॉजी मध्ये बराच interest आहे . आयुष्य सेमिकंड्क्टर मध्ये घालवल्यामुळे संटा क्लरा , सॅन होसे ह्या परिसराचे आकर्षण आहे . त्यामुळे टेक म्युझियम ला नक्कीच जाईन . पुर्ण मॅसेज नोट्स मध्ये ठेवला आहे. जसे जमेल तसे जाण्याचा विचार आहे.

मग तर तुम्हाला नक्की आवडेल. हाय टेक बूम च्या आधीही तेथे सेमीकंडक्टर इण्ड्स्ट्रीमुळे नाव होतेच, किंबहुना सिलिकॉन व्हॅली नावाचा संबंध सेमिकण्डक्टर कंपन्यांमुळेच आहे हे तुम्हाला नक्की माहीत असेल.. बे एरियात त्याच्या खाणाखुणा खूप होत्या पूर्वी. अजूनही अनेक असतील. एक उदाहरण म्हणजे सनीवेल मधले फ्राइज इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान. ते आता दुर्दैवाने बंद झाले. पण २००० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक्सची आवड असणार्‍यांकरता तेथे जाणे हा एक आवडता उद्योग होता. एखाद्या वॉलमार्टच्या पसार्‍याइतके मोठे दुकान पण पूर्ण इलेक्ट्रॉनिक्सला वाहिलेले. टीव्ही, कॉम्प्युटर्स पासून ते छोटे छोटे स्पेसिफिक इलेक्ट्रॉनिक पार्ट्स तेथे मिळत. पण ट्रान्झिस्टरचा शोध लागला त्याबद्दलची त्या दुकानातील भिंतींवर असलेली माहिती, तेव्हाचे बर्कली युनि. वगैरेमधले फोटो हे भव्य स्वरूपात होते. नुसते ते पाहायलाही छान वाटत असे. हे दुकान आता बंद झाले. पण बर्कलीच्या युनि. मधे अशी काहीतरी माहिती नक्की जतन केलेली असेल. बाकी टेक म्युझियम व कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियममधेही असेल.

एव्हलिन अ‍ॅव्हेन्यू असेल तर जनरली एरिया चांगला आहे.

सगळ्याना पुन्हा एकदा धन्यवाद

इण्टेल म्युझियम छान आहेच. पण कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियम खुपच छान आहे. तिथे १९४० मधिल व्हॅक्युम ट्युब कंप्युटर पासुन ते आज पर्यन्त चे कॉम्प्युटर पार्ट्स आहेत. ( nvidia ची $३०,००० किमतीची कॉम्प्युटर IC पण आहे). १८९० साली अमेरिकन जनगणनेसाठी वापरलेले मशीन पण आहे जे त्याचा संशोधकाने १ मिलिन डॉलरला IBM ला संस्थापकाला विकले आणि Computing-Tabulating-Recording Company चा जन्म झाला. नंतर त्या कंपनीचे नामकरण IBM झाले . आजुन बर्याच गोष्टी आहेत. पुर्ण लिहले तर एक मोठा लेख होईल. दुपारी १२ वाजता आणि २ वाजता स्वंयसेवक २ तासाची Guided Tour घेतात. आमचा टुर गाईड तर एक्दम अफलातुन होता. त्याने ६० वर्ष कॉम्प्युटर ईडस्ट्री मध्ये काम केले होते. आणि त्या दालनातिल दोन तीन संशोधकाशी प्रत्यक्ष बोलला होता. ८० पेक्षा जास्त वय असले तरी त्याचा उस्ताह जबरदस्त होता. AI चे दालन जे ३ महिन्यापुर्वी चालु झाले आहे ते पण चांगले आहे. तिथे त्यानी अ‍ॅलेक्सा /सिरी टाईप पुतळा ठेवला आहे जी मान डोलवत ९ भाषा बोलु शकते त्यात हिंदी पण आहे. आमच्या काही सध्या प्रश्नाची उत्तरे दिली नाही तेव्हा म्युझियम्च्या माणसाने आमाच्याशी discuss करुन सगळे issue लिहुन घेतले आणि ते लवकरच फिक्स करु असे सांगितले.
Electronic/ Computer ईजिनियर ज्याना कंप्युटर हिस्टरी मध्ये रस आहे त्याना ४ -५ तास लागतील. बाकी लोकाना पण २-३ तासाची मेजवानी आहे.
मागच्या लाँग विकेंड मध्ये सांताक्रुझ्, रेडवुड ग्रुव्ह, लेक ताहो मध्ये भटकंती केली. लेक टाहो मध्ये डोंगरावर आजुनही बर्फ होता त्यामुळे खुप सुंदर दिसत होते. काश्मिरला गेल्याचा फिल येत होता. लेक टाहो बिच पण खुप सुंदर आहे.
सनीवेल मध्ये काही प्रमुख ग्रोसरी स्टॉअर मध्ये गरमागरम चहा फुकट मिळतो न्यु जर्सी , मिड वेस्ट, कॅनसास , अ‍ॅरिझोना मध्ये कुठेच फुकट चहा मिळाला नाही. एवढे करुनही मला सनीवेल मधील ग्रोसरी स्टॉअर अमेरिकेतल्या बाकीच्या ग्रोसरी स्टोअर पेक्षा स्वस्त वाटले.
डाउन टाउन आजुन नाही फिरलो ते पुढच्या आठवड्यात जेव्हा माझ्याकडे कार नसेल तेव्हा .

सनिवेल फिरायला एकदम सेफ आहे. आता तर तुम्ही गेलाच आहात.
लेक टाहो ला गेलात तर जाता येता एक दिवस सॅक्रमँटोला पण जा. तिकडचं रेल्वे म्युझिय, कॅपिटल बिल्डिंग टूर आम्ही दोन तीन वेळा केली आहे.
योसेमिटीला जालच
बिग बेसिन रेडवुड स्टेट पार्क मस्त आहे.
मिस्ट्री स्पॉट पण मजेदार आहे. तिकडे मात्र बुकिंग असेल तरच जा. वॉकइन घेत नाहीत.
किती वेळ आहे तसे अ‍ॅरिझोना/ युटा वगैरे साठी वेळ असेल तर सगळी कॅन्यन पार्क्स बघुन या आधी गेला नसाल तर.
बाकी सॅनफ्रान्सिस्कोला रोज गेलात आणि फिरलात तरी हुरहुर वाटेल की अरे, अजुन जायला हवं. प्रेमात पडू असं एसएफ आहे. न्युयॉर्क ओव्हरव्हेल्मिंग वाटतं मला. एसएफ आणि शिकागो वॉर्म/ इन्वायटिंग वाटतात कायम.

इण्टेल म्युझियमची माहिती मस्त. जायला हवे कधीतरी. तेथे असताना कधी गेलो नाही Happy

तिकडचं रेल्वे म्युझिय, कॅपिटल बिल्डिंग टूर >>> हो मस्त आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा अर्नॉल्ड गव्हर्नर होता. त्या दिवशी सुट्टी होती नाहीतर "आमचा फोटो काढला तेव्हा ते ही होते तेथे" म्हणता आले असते. रेल्वे म्युझियम तर मस्त आहेच. तेथे एक "कॅब फॉरवर्ड" इंजिन आहे (म्हणजे कोळशाच्या इंजिनाचे ते बॉयलर/नळकांडे मागे व ड्रायव्हरची कॅब पुढे). ते आवर्जून बघण्यासारखे आहे. अजस्त्र इंजिन आहे - फोटोतील बाजूची माणसे पाहिली की स्केल कळेल. ते १०० मैलाच्या वेगाने गाडी न्यायचे. सिएरा-नेवाडा माउण्टन्स मधे आपल्या बाजूने हे धूड आजूबाजूचा बर्फ उडवत त्या वेगाने फ्रेट घेउन चालले आहे ही कल्पना सुद्धा इंटरेस्टिंग वाटते तेथे बाजूला उभे राहून.

एक मम आठवण. बॅक ऑफ अमेरिकेच्या कार्डवर इंटेल म्युझियम महिन्याच्या कुठल्यातरी दिवशी फुकट असते. तिकडे गूगलची सेल्फ ड्रायव्हिंग कार आणि घरे प्रिंट करणारा प्रिंटर काम करताना बघणे तेव्हा फार मजेदार वाटायचं. दोन चारदा तरी गेलो आहे मी.

फा, ही माहिती कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियमची आहे. बे एरियात आला तर नक्की जा. guided tour is must. गूगलची सेल्फ ड्रायव्हिंग कार हल्ली कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियम मध्ये आहे.
ईटेल म्युझियम रोजच फुकट असते. इंटेल म्युझियम मध्ये फक्त इंटेल च्या IC, त्याचे शोध कसे लागले, फॅब चे मॉक अप , त्याचा पहिल्या काही वर्षाच्या बॅलेन्स शीट, पहिल्या CEO चा जीवन प्रवास याबद्दल माहिती आहे. इंटेल म्युझियत अर्ध्या एक तासात बघुन होते. इंटेल कंपनीचा १९७३ मधील निव्वळ नफा फक्त ९ हजार डॉलर होता.
लेक टाहोला मागच्याच आठवद्यात जाउन आलो. योसिमिटी ला ह्या weekend. तरीपण सॅक्रमँटोचा प्लॅन करीन. परत ह्या भागात येणे नाही.
अ‍ॅरिझोना पुढच्या वर्षी , मुलीची तिथेच ग्रॅजुअशन सेरिमनी आहे.

सॉरी मला कॉम्युटर हिस्ट्री म्युझियमच म्हणायचे होते. माउंटन व्ह्यु. एटीफाय -वनओवन ला मिळतो तिथे आहे ते.

फा, ही माहिती कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियमची आहे >>> ओह ओके. समजले.

सॉरी मला कॉम्युटर हिस्ट्री म्युझियमच म्हणायचे होते >>> Happy मला वाटले तू क्रेडिट कार्डचे डील बघून अगदी वेळ काढून त्या दिवशी जाऊन आलास, आणि आज तुला समजले एरव्ही कधीही गेला असतास तरी चालले असते Happy

भारी आहे. बालीमध्ये ठीकठीकाणी नैवेद्य म्हणुन ठेवलेल्या करंडीत सिगारेट आणि क्वचित दारु ठेवलेली बघितली होती. आपण मजा करतो त्यात देवांनाही सामील करु या असा हेतु असावा. त्याच्या पुढची स्टेप ह्या दोघांनी घेतलेली दिसते. रोमॅंस मध्ये स्वामी समर्थांना आणुन. बिचारे स्वामी!

रमड तुझ्या साठी पुढची सुपारी "सासुरवाशीण". यशवंत दत्त, रंजना, आशा काळे अशी तगडी फौज आणि आशा काळे ला सतत रडत ठेवण्यासाठी ललिता पवार आणि निळु फुले ही दुक्कल.

कथा किंवा कथेचा अभाव फार भारी आहे. रंजना ला एक दिवस अचानक सासरी जाऊन ललिता पवार कडुन छळ करुन घेण्याचा झटका येतो. आपल्या आईचे पोटेन्शियल ओळखुन यशवंत दत्त साफ नकार देतो पण ती हट्टाने गावी जाऊन अल्टीमेटली आशा काळे च्या रडारडीतुन प्रेक्षकांची सुटका करते. ह्यात अशोक सराफ पण आहे यशवंत दत्त चा साईडकिक म्हणुन. बंदिवान मी... लाल फुल टक्कर आहे हा पिक्चर म्हणजे.

एक नविन सजेशन दिले युट्युब ने. पाहून आवाज कुठला आहे त्याचा सर्च मारला तर एक नविनच माहित नसलेला गायक सापडला - अँड्र्यु किशोर !

हा गायक म्हणे बांग्लादेशात एकदम सुपरहिट होता. तसा किशोर सारखा गायचा प्रयत्न करतो आहे तो. या पिक्चर मध्ये किशोरचे एक गाणे असताना सुद्धा याला कशाला घेतले असेल आर डी ने काय माहिती. इथे ते गाणे ऐका - https://www.youtube.com/watch?v=doC1Tyyjem4&list=RDdoC1Tyyjem4&start_rad...

शत्रू पिक्चर कही तरी ड्यांजर दिसतो आहे. मूळ हिरो राजेश खन्ना आहे. वर खलनायकांची भडिमार आहे. त्या गाण्यातला राज किरण सुद्धा खलनायक आहे. वर साईड हिरो म्हणून अरूण गोविल सुद्धा आहे. हा पिक्चर बघायची काही हिंमत होत नाही. पण गाणे बघताच रमडने अरे ही तर कोमल महुवाकर आहे असे म्हटले. तिला कोमल बालकलाकार म्हणून, हिंदीत मोठी, तमिळ मध्ये हिरॉईन आणि म्हातारी अशा प्रत्येक अवतारात ओळखू येते. अडगळसाम्राज्ञी उगीच नाही Lol

Lol

अडगळसाम्राज्ञी उगीच नाही >> _/\_

गाण्यातली कोमल महुवाकर म्हणजे चमेली की शादीमधली अमृता सिंगची मैत्रीण आहे.

यात बरेच बांगला/बांगलादेशी इंडस्ट्रीतील लोक दिसत आहेत. मेन हिरोईन शबाना फेमस बांगलादेशी हिरोईन आहे. पण तुम्ही तर आपल्या शॉटगन शत्रुची फिल्मोग्राफी कव्हर करत होता ना? हा शत्रु कसा सापडला? Happy
बरीच जंजाळ स्टोरीलाईन दिसते आहे तरी या सिनेमाचा लेखक-दिग्दर्शक कॅपजेमिनी-फेम जागीरचा दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती आहे एवढीच नोंद सध्या करत आहे Proud

बांगलादेशी लोक आहेत म्हटल्यावर सर्चमध्ये दीपजोल हा महत्त्वाचा कीवर्ड इनक्ल्यूड केलाच पाहिजे. अँड्र्यू किशोर + दीपजोल शोधताच हे गाणे सजेस्ट झाले Happy - https://youtu.be/xRAec2hS5Nc

चमेली की शादीमधली अमृता सिंगची मैत्रीण आहे >>> बरोब्बर. किंवा खुबसुरत मधली ती घरातली छोटी मुलगी.

पायसने दिलेल्या गाण्याच्या चालीत २-३ हिंदी गाण्यांच्या चाली सापडतायत असं वाटलं. त्यातलं एक मस्तीभरा है समां. म्युझिक आरडी ने दिलंय, भप्पी ने का लक्ष्मी प्यारेने अशी शंका यावी इतकं सरमिसळ आहे. हिरोने गिटार गन सारखं धरलंय. अजून थोडं वर धरलं तर तिथल्या तिथे त्याला थोबडवायला उपयोगी पडेल. स्ट्रोक करताना स्वतःलाच त्या पिक ने जखमा करून घेत असावा.