बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येथे कशावरूनही भापो करून मिळेल >>> Lol
चावट संदर्भ >>> तो सापशिडीचा आहे. थांबा, पावपॅटीस ला ठेवली आहे का पोस्ट पाहते.

-येथे कशावरूनही भापो करून मिळेल >>> Lol

तेथे माझीच ही कॉमेण्टही सापडली Happy
आता कोणी बेकरी वर हे ९८ काय विचारले तर कठोरपणे या बाफवर बोट दाखवा.

धमाल आहे ते , सगळंच वाचलं. रारचे प्रापंचिक मनाचे श्लोक पण Lol

कठोरपणे >>> बरं. नोंद घेतली आहे. पुढे मागे व्याजासहित..... Wink Lol

पाहिले ते मै आया थोडेफार. एक दोन मिनिटांनी प्रत्येक स्टेप सारखीच वाटायला लागते. र्म्द म्हणते तसे सर्कस आहे की आदिवासी नृत्य कळत नाही. कॅनडा ते आफ्रिका मधल्या ८-१० वेगवेगळ्या जमातींच्या पद्धतीची घरे मागे आहेत. "ओ मामा" वाले नाचणारे एकाच जमातीचे दिसतात. ओ मामा हे मराठी/हिंदीत आहे, इंग्रजीत आहे की त्या जमातीमधे त्याचा आणखी तिसराच अर्थ आहे माहीत नाही. अनिता राजचा झिरमिळ्यावाला ड्रेस त्या "चौदहवी की रात" वाल्याशी स्पर्धा करतोय प्रकाश परावर्तित करण्यात. त्या दोघांना एकत्र घेऊन लखलख चंदेरी तेजाची सारी दुनिया गाणे बसवायला हवे कोणीतरी. तर गोविंदाचा ड्रेस जनरल पर्पज बंजारा आहे. अखिल जगातील नोमॅडिक टोळ्यांचे संमेलन दिसते.

आप्पा लो आणि ओ मामा हे एपिक आहे. एकाच वेळेस आप्पा आणि मामाला का बोलावत असतील काय माहिती. कदाचीत आमचा वेडा नाच पाहायला या असे म्हणत असतील Lol

Happy परवा आणखी कोठेतरी ती बाजरीच्या पिकावरची कीड आली होती ना? त्यातला पुलंच्या लेखाचा संदर्भ किती लोकांना माहीत आहे कल्पना नाही.

बाय द वे, ती कविता चांगली आहे.

डबल बाय द वे, बेकरी वरच्या कोणी कधी कविता माबोवर लिहील्या आहेत का?

बेकरी वरच्या कोणी कधी कविता माबोवर लिहील्या आहेत का? >>> मी Proud
रारच्या आहेत का माबोवर? आठवत नाही. बहुधा धनिने पण १-२ लिहिल्या आहेत.
का रे?

काही खास कारण नाही. इथे पूर्वी कवितांबद्दल कधी चर्चा झाल्याचे आठवत नाही म्हणून विचारले.

त्यात कविता असतील तर खपेल Happy पण त्या माबोवर आहेत का? इथल्या लोकांचे माबोबाह्य कवितासंबंध आहेत याची कल्पना आहे Happy मला माबोवर फार आठवत नाही Happy

माझी ४० पानी वही >>> ही वाचायला हवी कधी तरी Wink

इथे पूर्वी कवितांबद्दल कधी चर्चा झाल्याचे आठवत नाही म्हणून विचारले. >>> अरे पावपॅटिस वाच की. आपण सगळ्यांनी कविता केल्यात त्यात Proud म्हणजे इथलीच चर्चा झाली किनई?

डबल बाय द वे, बेकरी वरच्या कोणी कधी कविता माबोवर लिहील्या आहेत का? >> ह्या ला गोणपाटात घालून बडवा रे ! Wink

पावपॅटिस >>> ते अधूनमधून वाचतच असतो Happy पण त्या कविता मनोरंजनाकरता. "कवितेकरता कविता" विचारत होतो मी (इथे "ही कविता कोण" हा जोक माबोवरच्या बालवाडी बीबींवरही जुना झाला आहे. तेव्हा सध्या त्याला रिटायर करावे ही विनंती)

असाम्याने किती वेगवेगळ्या बाफवर ते गोणपाट आणले आहे याचे काउण्ट ठेवत आहे मी Happy

चाळीस पानी वही पुपुवर अनेकदा चर्चेत आली. अरूण बरोबर २-३ वेळा गटगही झाले (बुधवार गटग मधे कोणी वही आणायचे व वाचायचे चान्सेस कमी होते, पण ती गटगे वगळूनही २-३ वेळा भेटलोय) पण ती वही कधी बघितली नाही. कॉलेज मधे इतर लोक पाठीला बॅग्ज लावून व काही सुबोध लोक अवघडलेल्या अवस्थेत पिशव्या घेउन फिरत असताना काही पोरे जसे आपला कूल फॅक्टर दाखवायला हातात फक्त एक वही घेऊन फिरत तसेही तो कधी करताना दिसलेला नाही. फेबुवर त्याचे विविध (म्हणजे नॉर्मलच) फोटो येतात त्यातही वही कधी दिसत नाही.

त्यामुळे ती चाळीस पानी वही ही नाटकात एखाद्या गोष्टीचा नुस्ता उल्लेखच येतो व ती गोष्ट प्रत्यक्षात दिसत नाही तशी असावी. साजिर्‍याचा डुलकळा ज्यातून आला ती वही निदान मी पाहिली आहे. त्यात "लोग इश्क करते है बडे शोक के साथ" असे शब्दशः लिहीलेला व त्यामुळेच बहुधा रिअ‍ॅलिटीच्या जवळ गेलेला शेर वाचल्याचे आठवते. त्या "शोक" वर लोल झाल्याने पुढचे वाक्य आठवत नाही.

ह्या ला गोणपाटात घालून बडवा रे ! >>> Lol तुलाच सोपं पडेल ते बहुतेक >>> र्म्द, इथे "तुलाच" म्हणजे असाम्यालाच गोणपाटात घालायला ना? टोटली सहमत Happy

हायला हे राहूनच गेलं होतं.

फा: किती मोठा निबंध लिहिला आहेस ४० पानी वर? निवांतपणे भेट एकदा, ऐकवतो तुला माझी ४० पानी वहितली कविता .... (आतारेच पुणेकर म्हणतील की ही धमकी आहे, पण तू मनावर घेऊ नकोस पुणेकरांच मत ) .... Lol

आता बरेच पुणेकर म्हणतील की ही धमकी आहे, पण तू मनावर घेऊ नकोस पुणेकरांच मत >>> Lol

ते वेगळे सांगायलाच नको. मतभेद हे व्यवच्छेदक लक्षण ई Happy

"सर्वात प्रथम म्हणजे कोणत्याही गोष्टीवर मतभेद व्यक्त करायला शिका" - पु. लं. ( 'तुम्हाला कोण व्हायचे आहे? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' )