बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणवीर आणि अर्शदचा अभिनय अनुक्रमे बघावा >> अगदी अगदी. रणवीर चांगला असला तरी अर्शद लै भारी आहे !! त्याचे एक्सप्रेशन्स खत्रा आहेत एकदम

मीही विचार करतोय की सोहा कोठून आली मधेच. संतूर च्या जाहिरातीसारखे असावे का? सोहालाच असामी सारा समजतोय. आणि तिकडून "मम्मी!" करत सारा पळत येते आणि सोहा म्हणजे "मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता"

गड्डा झब्बू >>> हा काय प्रकार आहे
केदारनाथ मध्ये चांगलं काम केलयं साराने.

सुप्रभात बेकर्स !!

तिसर्या पानावरून खणून काढतो बेकरी.

आम्ही काल स्त्री पाहिला. मस्त जमला आहे पिक्चर - हॉरर कॉमेडी.

ध - हॅलोवीन बॅकलॉग? Happy

नार्कोज मेक्सिको - मूळ नार्कोज इतकी थरारक नाही. तरी बघणेबल आहे.

हॅलोवीन बॅकलॉग >> Lol तसे काही नाही पण मागच्याच आठवड्यात तुंबाड पण पाहिला. तो काही हॉरर आहे असे मी म्हणणार नाही पण तो हॉरर आहेही Proud

ह्रितिक नव्या सिनेमात म्हणे "मॅथेमॅटीशियन" आहे. सुभेदाराच्या सुनेला पाहून महाराजांनी म्हणले तस्से अगदी माझ्या मनात आले: असे आमुचे "मॅथेमॅटीशियन" असते तर आम्हीही बारावीला गणित सोडले नसते.

वॉल्वो ची ही कमर्शिअल ऐकलीत का? (हेड्फोन लाऊन ऐका)
https://www.youtube.com/watch?v=OPN7ljSg9DI
ह्या ३० सेकंदाच्या आवाजासाठी वॉल्वो घ्यावीशी वाटत आहे... पहिल्यांदाच एखादी कमर्शिअल बघून असे काही वाटले.

वीराना, तेहेखाना, पुराना मंदीर यांसारख्या प्रेक्षकोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक आणि झी हॉरर शो चे कर्ते तुलसी रामसे यांचे निधन झाले. त्यांना आदरांजली. Sad