Up close and personal at click of mouse DNA Pune Edition Sunday, May 30, 2010

Submitted by Admin-team on 2 June, 2010 - 00:25

डीएनए या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीत रविवार, ३० मे २०१० रोजी मराठी वेबसाईटबद्दल एक लेख आला आहे त्यात मायबोलीचा प्रामुख्याने उल्लेख आहे.

आम्ही इमेलने योग्य माहिती कळवली होती पण छापण्यात एक चूक झाली आहे. मायबोलीवर महिन्याला
सरासरी १,४२, ९८ हीटस असे छापले आहे. ते महिन्याला सरासरी १, ४२,१९८ व्हीझीट्स असे हवे होते.

या लेखात मायबोलीकर नलिनी यांचा उल्लेख आहे. त्यांनी यशस्वीरित्या बांधलेल्या शाळेबद्दल जुन्या मायबोलीवर वृत्तांत आहे.

संपूर्ण पीडीएफ
dna_pune_20100530.pdf (197.77 KB)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेबवर लिंक नाही त्यामुळे वर पीडीएफ दिली आहे त्यात संपूर्ण बातमीचे पान पाहता येईल.

आणि इथे जुन्या मायबोलीवर शाळेबद्दल असलेला वृत्तांत आहे.

अरे वा इथे पण बातमी Happy अभिनंदन
गुरुजी जबरा काम केलत Happy मी पण इ-पेपर ची लिंक शोधत बसलो होतो आत्ता.

अ‍ॅडमिन टीम खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा मायबोलीची, आशाची, बक्षी कुटूंबाची शतशः आभारी.

मित्रहो, धन्यवाद या बातमीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल.
थोडी अवांतर माहीती विशाखा अवचट माझी डीएनए मधली सहकारी. तिला ज्यावेळी हा लेख लिहायचा होता तेव्हा तिने मला विचारले कारण ती माझ्या बाजूलाच बसत असल्यामुळे माझ्या कॉम्पुटरवर सतत उघडलेली माबोची साईट तिलाही दिसायची.
याच लेखात दर्शन खर्शिकर नावाने दिलेला कोट माझाच आहे. मी माबोचा जबरदस्त फॅन आहे हेच यामागचे कारण. माझ्या मते माबोवर जितके सकस, वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार लेखन उपलब्ध आहे तेवढे कुठेही नाही.
(जर कुणाला यात गर्वोक्ती किंवा आत्मप्रौढीचा वास आल्यास क्षमा करावी. मला नम्रपणे ही माहीती द्यायची आहे. यात कुठेही मी भारी असा आव आणण्याचा प्रयत्न नाही)

मायबोलीवरच्या लिखाणाबद्दल काही शंकाच नाही. जवळपास ३ ते ४ वर्षापासून मायबोलीवर वावर आहे. सध्या तो वावर चांगलाच वाढलाय कारण नवे लेखक, नव्या कल्पना, नवी माहिती याचं योग्य लेखन संकलन फक्त मायबोलीवरचं आढळून येते. अभिनंदन मायबोलीचं असं वैभव अखंड अबादीत राहो हीच प्रार्थना!