अतुल्य! भारत - भाग ५: पंजाब

Submitted by मार्को पोलो on 1 June, 2010 - 02:31

थोडीसी धूल मेरी, धरती की मेरे वतन की,
थोडीसी खुशबु बोहराईसी मस्त पवन की,
थोडीसी ढूंढने वाली धक-धक धक-धक धक-धक सांसे
जिन मे हो जुनूं जुनूं वोह बूंदे लाल लहू की...

पंजाब म्हटले मला ह्या गाणाच्या ओळी आठवतात. पंजाब म्हटले की आठवतात गुरु नानक, शहिद भगत सिंग, शहिद उधम सिंग, लाला लजपतराय, हिर रांझा...
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात जास्त क्रांतिकारक पंजाब, महाराष्ट्र आणी बंगाल ह्या तीन राज्यांनी दिले.
भारतीय पायदळातील सर्वात कडव्या मानल्या गेलेल्या तीन रेजिमेंटस् मधील सिख रेजिमेंट ही एक. भारतावरील बहुतेक सर्व आक्रमणे ही उत्तरेकडून झाली. त्याचा सर्वात मोठा परिणाम ईथल्या लोकांवर झाला. फाळणीची झळ ही पंजाब आणी पश्चिम बंगाल ह्या राज्यांना सर्वात जास्त बसली. त्यामूळे ईथल्या लोकांचा पिंडच मूळी थोडासा आक्रमक बनला. पण जेव्हढे पंजाबी देहाने विशाल तेव्हढेच ह्रदयाने ही विशाल. अशा या पंजाबला भेट देण्याचा योग मी दिल्लीत असताना आला.

रात्रिची रेल्वे पकडून सकाळी अमृतसर ला पोहोचलो. ऑक्टोबर चा महिना होता आणी थंडीची सुरुवात होती. सकाळी फ्रेश होण्यासाठी म्हणून हॉटेल घेतले व आवरून बाहेर पडलो. ईथे शहर फिरवायला आणी वाघा बॉर्डर दाखवायला मोठ्या ऑटो रिक्षा (५-६ सीटर) पूर्ण दिवस मिळतात. हे रिक्षा वाले ३०० ते ५०० रुपये घेतात. तशी एक रिक्षा घेतली. हे शहर तसे स्वस्त आहे. अमृतसर ला गेलात तर Brother's Dhabaa मध्ये नक्की जा. ह्यांच्या शहरात बर्‍याच शाखा आहेत. ह्याला "बडे भाई का ढाबा" किंवा""प्रा दा ढाबा" असेही म्हणतात. ईथे अस्सल पंजाबी नाश्ता आणी जेवण मिळते. नाश्ता करून अमृतसर शहर पहायला बाहेर पडलो. रिक्षावाल्याने आधी एक दोन दुसरी मंदीरे दाखविली. छान होती. तिथुन सुवर्णमंदिर पहायला गेलो.

सुवर्णमंदिर :
सुवर्णमंदिराचा परीसर अतिशय स्वच्छ आहे. ईथे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कोणीही पैसे मागत नाही. कोणी हार वाले नाहीत, नारळ वाले नाहीत , प्रसाद वाले नाहित, एक्स्ट्रा पैसे देऊन दर्शन लौकर करुन देतो म्हणून लूटणारे नाहीत. पादत्राणे सांभाळणारे लोक सुध्धा अतिशय स्वच्छ निटनेटके आणी चांगल्या घरातले वाटत होते. हे लोक फक्त पादत्राणे सांभाळत नाहीत तर पुसुन, पॉलिश करून स्वच्छ करुन देतात. हे सर्व पाहुन आपल्या ईथला पंढरपुर किंवा शिर्डी ला चालणारा प्रकार आठवला. पादत्राणे देऊन पाय धूवून मंदिराकडे निघालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एव्हढे मोठे आणी प्रसिध्ध मंदिर असूनही कुठल्याही प्रकरची तपासणी होत नव्हती. फक्त मेटल डिटेक्टर्स लावले होते. मंदिर एका तलावाच्या मध्य भागी आहे. मंदिराचा पहिल्या मजल्याचा बाहेरिल भाग सोन्याच्या पत्र्याने मढविलेला आहे. आतमध्ये गुरु ग्रंथ साहीब चा अखंडपाठ सुरु असतो. वरच्या मजल्यावर बसून तुम्ही तो ऐकू शकता. टेरेस वरून सुवर्णमंदिराच्या परीसराचे दर्शन होते. ईथे तलावात तुम्ही पवित्र स्नान करू शकता. सुवर्णमंदिर रात्रिही रोषणाईमध्ये फार छान दिसते.
मंदिराच्या बाहेर छान तलवारी, खंडा, कृपाण ईत्यादी भेटवस्तु मिळतात.

टिप : ह्या ट्रिपला माझा स्वत: चा कॅमेरा बरोबर नसल्याने प्रकाशचित्रे एव्हडी चांगली नाही आली आहेत.

--
--
--

--
--
--

जालियनवाला बाग :
जालियनवाला बाग सुवर्णमंदिराच्या अगदी जवळच आहे.
ईथे १३ एप्रिल १९१९ साली जनरल डायर ह्या ईंग्लिश अधिकार्‍याने सभेसाठी जमलेल्या नि:शस्त्र, निष्पाप जमावावर गोळीबार करून ३७९ बळी घेतले. अनाधिकृतपणे हाच आकडा १५२६ असा आहे. ईथल्या भिंतींवर गोळीबाराच्या खूणा आपल्याला स्पष्टपणे दिसतात.
ह्या बागेत बळी गेलेल्यांचे एक स्मारक देखिल आहे.

गोळीबाराच्या खूणा

--
--
--
गोळीबारात बळी गेलेल्यांचे स्मारक

--
--
--

वाघा बॉर्डर :
वाघा बॉर्डर अमृतसर पासुन ३० किमी अंतरावर आहे. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंजाबमधील समृद्ध शेती लागते. वाघा बॉर्डर ला भारत - पाकिस्तान सिमेवर रोज संध्याकाळी "रिट्रिट सेरेमनी" हा कार्यक्रम चालतो. त्यात दोन्ही राष्ट्रांचे ध्वज सुर्यास्ताच्या वेळेला खाली ऊतरविले जातात, भारत - पाकिस्तान यांच्या रेंजर्स चे शक्ति प्रदर्शन होते, एकमेकांना चिथावणे असे कार्यक्रम चालतात.
ह्या कार्यक्रमाची वेळ सुर्यास्तानुसार बदलत असते. ईथे गर्दिही खूप असते म्हणून सुर्यास्ताच्या कमीत कमी दोन तास आधी तरी पोहोचावे. तासभर आधी रांगेतुन जवान तुम्हाला कडक तपासणी करून सिमेपाशी सोडतात. ईथे कार्यक्रम बघायला स्टँडस् केले आहेत. ईथे सिमेच्या मुख्य गेटपाशी फुल्ल जल्लोश सुरू असतो. लोक नाचत असतात, गात असतात, ध्वज घेऊन धावत असतात. मोठ्याने देशभक्तिपर गीते लावलेली असतात. लोकांचा ऊत्साह, जोश अफलातुन आणी बघण्यासारखा असतो.


--
--
--

वाघा बॉर्डर

--
--
--

पाकीस्तान

--
--
--


--
--
--

भारतीयांचा उत्साह, जल्लोष...

--
--
--


--
--
--


--
--
--

सोहळा पहाण्यासाठी झालेली भारतीयांची गर्दी

--
--
--


--
--
--


--
--
--


--
--
--

पाकीस्तानातील रीकामे स्टँड्स आणी उत्साहाने प्रवेशद्वारासमोर तिरंगा नाचविणारे भारतीय...

--
--
--

रीट्रीट सेरेमनी

--
--
--

स्वर्णजयंती द्वार

--
--
--

सुवर्णमंदिर रात्री...

-----------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत. क्रमशः

आगामी आकर्षणः कुतुबमिनार आणि लोह स्तंभ, दिल्ली.

मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

सुवर्णमंदिराचे फोटो एकदम झक्कास. अन हो पंजाब मधे कुठेतरी एक फेमस गार्डन आहे ना , नाव आठवत नाही मला त्याचं.

ललिता-प्रिति,
माझ्या माहिती प्रमाणे पंजाब मध्ये प्रामुख्याने ह्या तिनच गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. बाकी काही बगिचे आहे आणी काही गढी वजा किल्ले आहेत. पण ते पण काही खास नाही. ईंटरनेट वर पण प्रामुखाने ह्याच गोष्टींचा ऊल्लेख आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा ट्रिप प्लॅन केली तेव्हा ह्याच गोष्टी निवडल्या. आम्हालाही आणखिन काही चांगल्या गोष्टी असतील तर पहायच्या होत्या पण काही विशेष नाही सापडले... Sad
तुमच्या कडे अजुन काही माहिती असेल तर प्लिज सांगा...

सॅम,
म्हणूनच टिप टाकलीये,
>>>टिप : ह्या ट्रिपला माझा स्वत: चा कॅमेरा बरोबर नसल्याने प्रकाशचित्रे एव्हडी चांगली नाही आली आहेत.

Happy

चंदन, फोटोला वाईट म्हणवत नाही. अभिमानास्पद जागा आहेत या. जालियनवालाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. काहि सिनेमातले या घटनेचे चित्रीकरणही, अंगावर काटा आणते.
माझा कामाच्या निमित्ताने पंजाबी लोकांशी फार संबंध येतो. तसे दिलदार असतात ते.

लेख उत्तम झाला आहे रे चंदन. फोटोही मस्तच.
पण मलाही पंजाबातले तुझे फोटोग्राफीक एक्स्पेडीशन अपुरे वाटले. पंजाब म्हणले की शेतातले फोटो हवे होते थोडे...खास करुन सरसो के खेत...पाहीजेच पाहीजे !

धन्यवाद दिनेशदा...

धन्यवाद डॅफोडिल्स,
पुढचा भाग लवकरच टाकेल... एक महिना नाही लावणार ह्यावेळी...

धन्यवाद प्रकाश,
आम्ही ऑक्टोबर मध्ये गेलो होतो त्यावेळी "सरसों के खेत" फुलले नव्हते...
"सरसों के खेत" मी माझ्या "राजस्थान" ह्या भागात कव्हर करणार आहे...

चंदन, खुप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर बियास या नदीवर एक माहितीपट दाखवला होता. तिच्याबद्दल वाचायला मिळेल्, अशी अपेक्षा होती. काय आहे ना, आपल्याच कर्माने अपेक्षा वाढवून ठेवायच्या, मग हे असे वाचावे लागते !!
पुढच्या भागाची वाट बघतोय.

छान माहिती आणि फोटोसुद्धा.
पण खरंच रे तुझ्याकडुन फार अपेक्षा वाढल्या आहेत. (अर्थात हेही फोटो आवडलेच आहेत)
पुढचा भाग लवकरच टाकेल... एक महिना नाही लावणार ह्यावेळी... >>>>हां हे मात्र चांगलं केलेस आता महिनाभर वाट बघायला लागणार नाही. Happy (१५ दिवस ठिक आहे रे ;-))

जे आहेत ते फोटो मस्तच पण खूपच अपुरे.
सुवर्ण मंदिराच्या मागे ती आडवी पांढरी बिल्डींग कसली आहे?
तसंच जालियनवाला बागेतल्या स्मारकांची जागा मस्त स्वच्छ दिसतेय.

जे आहेत ते मस्त आहेत फोटोज.. पण फार कमी !! Sad
पंजाब म्हणजे खरोखर ती पिवळी शेते, ट्रॅक्टर, गेलाबाजार निदान ढाबा असे फोटोज हवे होते..
असो.. पुढचे फोटोज एका महिन्याच्या आत येणार ही चांगली गोष्ट !!

आडो आणि बस्केला अनुमोदन !
काहितरी कमी वाटलं.. पंजाब म्हंटलं की डोळ्यासामोर येणारी पिवळी शेतं, ढाबे, लस्सी :), असं काहीच दिसलं नाही फोटोंमधे..

माबोकर मंडळी,
तुमचा अपेक्षाभंग केल्याबद्दल क्षमस्व. पण माझ्याकडे ईतकीच प्रकाशचित्रे होती आणी ऑक्टोबर असल्यामूळे सरसों ची फुले पण नव्हती. Sad
असो. मी पुढच्या भागांत ती ऊणीव भरून काढण्याचा प्रयत्न करेन...

धन्यवाद सायो,
ती पांढरी बिल्डींग म्हणजे सुवर्णमंदिराचे प्रवेशद्वार, धर्मशाळा, व्यवस्थापन असे बरेच काही आहे. पुर्ण सुवर्णमंदिर आणी तळे ह्या पांढर्‍या बिल्डींगने वेढलेले आहे.

अतिशय छान पण खरंच भुक भागली नाही पंजाब असं म्हणुन जे हटके अपेक्षित होतं ते नसल्यासारखे वाटतेय.:अरेरे: बाकी फोटोज विशेषतः सुवर्णमंदिराचे छान आहेत.:स्मित:

सुवर्णमंदीराचे फोटो क्लासच!!! फोटोंनी पोट भरलं नाही हे मात्र खरं...पुढच्या भागात सगळी कसर पुरी करा म्हणजे झालं Happy

पंजाब बद्दलचा लेख चांगलाच आहे.. Happy
तुमचा लेख आरामात वाचायला घेतला , थोड मन खट्टु झाल , पण टिप वाचल्यावर म्हटल जाऊ देत..
पण खर सांगू का...पंजाब म्हटल तर मला वाटल मस्त हिरवेगार शेत , मध्येच मस्त टुमदार घर , लस्सी , ढाबा ..... असू देत... होत अस कधी कधी

मित्र आणी मैत्रिणींनो,
आपण सर्वांनी पंजाब आणी मागील सर्व भागांबद्दल जे प्रतिसाद दिले त्याबद्दल मनःपुर्वक आभार. Happy
आणी पंजाब ह्या भागाची माझ्याकडुन आपली अपेक्षापुर्ती झाली नाही त्याबद्दल परत एकदा क्षमस्व. Sad
मलाही मान्य आहे की पंजाब भागात जेव्हढी प्रकाशचित्रे यायला पाहिजे तेव्हढी ईथे दिसत नाहीयेत. पण मी फक्त ह्याच भागांना भेट दिल्यामूळे तेव्हढिच प्रकाशचित्रे टाकू शकलो.
माझे पुढेही असे काही भाग असतील जिथे अपेक्षित प्रकाशचित्रे न पाहता आल्यामूळे आपला असा अपेक्षाभंग होऊ शकतो. पण आपल्याला विनंती आहे की आपण प्रतिसाद देत रहा. आपल्या सूचना, समिक्षा, अभिप्राय असेच कळवत रहा. उत्तरोत्तर सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करत राहीन.
कळावे,
लोभ असावा,
आपलाच,
चंदन.

Chandanji tumhi aamchya apekshya far unchivar nelya aahet tyamule asel kadachit punjabche photo pahun man atrupt rahile.

मस्तच रे चन्दन........ जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
आम्ही पण गेलो होतो... आणि माझी आई झेन्डा घेऊन धावली होती वाघा बोर्डरवर.....
आज तिलापण दाखवले हे फोटो, तर ती पण भुतकाळात गेली क्शणभर.....
मग तिथे असलेल्या एका ऊन्च सैनिकाबरोबर (मिश्या खूप मोठ्या होत्या त्याच्या) फोटोपण काढला होता......
मग मधल्या गेट्वर (थोडावेळ ऊघडल जात ते) एकमेकान्च्या डोक्यापर्यन्त बूट जाईल ईतका वर पाय नेऊन, (म्हणजेच त्यान्ना आपले जोडे (त्यान्ची लायकी) दाखवून) गेट बन्द करणारे आपले सैनिक.....
एक वेगळच थ्रिल अनुभवायला मिळत तिथे......
तसच, सुवर्णमन्दिरात प्रवेश घेतन्ना पायरीवरून वाहणारे पाणी (जेणेकरून येणार्‍याचे पाय आपोआप धूऊन निघतात), डोके झाकून (रूमाल वगैरे, तत्सम कापडाने डोके झाकून) दर्शन घेणारे भाविक......, मन्दिराच्या जवळपास फिरणारे मासे..... आणि ते पाणी (शुभ मानून) ग्रहण करणारे भाविक......... वेगळाच अनुभव....
एकदम तिकडे नेलस मला.... Happy
परत एकदा आभारी आहे मित्रा, जुन्या आठवणी चाळवल्यास तू.... Happy

खरच तुम्ही लेख खूपच मस्त लिहिता.
आम्ही पण अमृतसर आणि वाघा बोर्डर वर गेलो होतो.
त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.सर्व फोटो पण सुरेख आले आहेत.