Submitted by अरुण मनोहर on 31 May, 2010 - 01:49
गझल सम्राट सुरेश भट ह्यांची एक अतिसुंदर गझल. ''हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही"
http://sureshbhat.blogspot.com/2007/04/blog-post_6552.html
त्यांच्या स्मृतीस स्मरून व क्षमा मागून थोडा हास्य रस निर्माण करण्याचे ढाडस करतो.
हे तुझे अशावेळी चरणे रे बरे नाही
तोबरा कबाबाने मारणे बरे नाही
जी तुला दिली होती तीच प्लेट रे तुझी
मागून पुन्हा घेणे अन टाकणे बरे नाही
केक तू पुरा सोड, मोह नको चॉक्लेटचा
अशा वयी चॉक्लेटचे चापणे बरे नाही
घेतली कितीदा रे बशीमधे पुरणपोळी
आपुलीच पोळी आपण पिकवणे बरे नाही
आज टोकरे बोल आज रोकते बोल
घेर तुझ्या पोटाचा वाढवणे बरे नाही
कालची तुझी माझी फ़िगर वेगळी होती
हे विजारीत कोंबलेले ढेरके बरे नाही
पंगतीत पाहण्या लावतोस का खाली
हाय... निर्लजा तुझे ढेकरणे बरे नाही
गुलमोहर:
शेअर करा
कालची तुझी माझी फ़िगर वेगळी
कालची तुझी माझी फ़िगर वेगळी होती
हे पॅन्टीत कोंबलेले ढेरके बरे नाही
मला माझ्या जुन्या सिंधी बॉसची आठवण झाली
(No subject)
पॅन्टीत कोंबलेले ढेरके तुझे
पॅन्टीत कोंबलेले ढेरके
तुझे ढेकरणे बरे नाही
(No subject)
अशक्य
अशक्य
एव्ह्ढया चांगल्या विडंबनावर
एव्ह्ढया चांगल्या विडंबनावर चांगला प्रतिसाद देणे बरे नाही.
तरीही दिल्याशिवाय राहवत नाही हेही काही खरे नाही.
छान!!
छान
छान
कालची तुझी माझी फ़िगर वेगळी
कालची तुझी माझी फ़िगर वेगळी होती
हे विजारीत कोंबलेले ढेरके बरे नाही