हसं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काही वाचनीय विपू. विपू करणार्‍यांची नावं किंवा विपुचा संदर्भ माहिती नसताना सुद्धा हसु येइल अशा काही आहेत.

"बोलो महामांगा माता की जय!"

"सिंडे, वैद्यबुवांची बायको नाहीये का माबोवर ?"

"अरेरे सिंडी. "ती" बातमी आत्ता तुझ्या कानावर येवुन आदळली. विपु मधली बातमी कळायला इतका वेळ? कंपु मधुन हद्दपार कराव कि काय तुला?"

"लिहिलाय की प्रतिसाद.. आणि तू इतकी प्रथितयश, सिद्धहस्त लेखिका असताना विपूत रिक्षा का फिरवतियेस? शोनाहो."

"'रडं' हा लेख वाचला. चांगलाच आहे. पण एक भीति वाटते. मी अनवधानाने मागे तुमच्या बहिणीसमोर काहीतरी बरळलो होतो की तुम्ही तुमच्या मुलाला रागावता, त्यावरून तुमच्या बहिणीची बोलणी तुम्हाला खावी लागली. चुकी माझी पण नावे तुम्हाला ठेवल्या गेली. त्याबद्दल रडू आले असेल ना? ते नाही लिहीले?"

"सिंडे सापडल हा मला. स्वतःला टॉर्चर करायची संधी मी मुळीच सोडत नाही. आता कोल्हापुरवर लेख पाडणार आणि तुला टॉर्चर करणार."

"अ‍ॅडमिनने उत्कृष्ट वृत्तांत लिखाणावर गुप्त मतदान घेतले असते तर मी तुझ्याच वृत्तांताला मत दिले असते असं जर तुला वाटत असेल तर तू बरोबर आहेस, शिट्टीकर म्हणून तेवढी कंपूगिरी मी करणारच."

"सिंडे,सिंडे तुझ पोरग किती गुणी आहे. जरा तर गुण घे त्याचे."

"अतिशय दुष्ट आहेस तू. पण इतर आया जश्या आपल्या मुलांचा चमनगोटा करतात तसा न करता इशानचे केस लांब ठेवल्याबद्दल तुला सगळे गुन्हे माफ करण्यात येत आहेत."

"अकोल्यात फक्त डास आणि डुकरं."

"सिंडे, काल आयुष्यात पहिल्यांदा शेपुची भाजी केली.आणि खाल्ली... तुझ्या मेथड ने (खूप लसूण/मिरच्या/मुगडाळ) आणि खुपच आवडली.."

"बाकी तुझी विपू सॉल्लीड फनी आहे .. एकिकडे आप्पे पात्र, वाटली डाळ, गूळपोळी.. आणि एकदम 'पॉटी ट्रेनींग'"

"पॉटी ट्रेनिंग या विषयाबद्दल माझ्याकडेही भरपूर भांडार आहे ज्ञानाचं. मेलमधून खुलं करु का ?"

"असल्या "य" मांजरी तुल लखलाभ !"

"कुरकुर न करता एक दिवस गूळ किंवा पुरण ह्यापैकी एक पोळी खायला बोलवावे ही (नम्र) विनंती. आणि तूप थिजले असेल तर ते गरम करून वाढावे. न बोलावल्यास एक दिवस ऐनवेळी टपकण्यात येईल."

"खरं तर नानबाच्या विपुतली पाटवड्याची आमटी वाचून तुला कधी येऊ तिकडे असं विचारायला आले."

"तू गुप्तहेर आणि पोलिसच्या वरची आहेस सिंडे"

"डॉं.च्या विपुत वाचलं..तू आणि इशानने २२ राजमलया खाल्ल्या? "

"पग्या कोण आहे ? आणि त्याने मला लिहिलेल्या विचारपुशीचा अर्थ काय आहे ? या प्रश्नांची उत्तरे तुला माहित असूनही तू दिली नाहीस तर....."

"सिंडे- माल भेज दिया है लाल्वाक्का के साथ. पोहोचने पर खबर करना."

"पीजे होता गं तो. >>> हे काल का परवा अजून एका बीबी वर पण पाहिलं होतं... सारखं सारखं सांगावं लागतय का ह्ल्ली ? वि.सू : हो आता इथे लोकांना विनोदबुध्दी नाहिये असा अजून एक पि.जे. मारू नये.."

"सिंडे, मी तुला विपू लिहित होते आणि ती साजिर्‍याच्या विपूत गेली ग. आता तिथेच जाउन वाच काय लिहिलेल ते. आणि उत्तर दे."

"काय बोलावं ते कळलं नाही की मी अशी (गोSSड) हसते."

"तु अशक्य आहेस. तु इम्पॉसिबल आहेस. तुल चॅट्स मिळत नाहीत, ते कळले. तुला मेल्स पण मिळत नाहीत, ते पण कळले. मला आता तुझ्याबद्दल प्रचन्ड संशय येऊ लागला आहे. तु स्वतःचीच ड्युआय आहेस असे वाटु लागले आहे. एवढेच नव्हे, तर तुझा ड्युआय पण ड्युप्लिकेट असल्याचा संशय आहे. एवढेच नव्हे, तर तु जी कोण आहेस, तिच्या एकूणच अस्तित्वाबद्दल संशय येऊ आला आहे. सगळाच गोंधळ आहे. तु नक्की भुत नाहीस की आहेस? तुला मोक्ष मिळो ही देवाकडे प्रार्थना."

"डुचका आहेस का ? >> किती हा भोचक पणा"

"संक्रांतीच्या शुभेच्छा सिंडे.. गूळपोळी करण्याइतकं धाडस जमा झालं की नाही?"

"स्वीट किसेस तरी मेलमध्ये कशाला द्यायचे? ठेवून द्यायचे ना प्रत्यक्ष भेटीकरता"

"मला ते वासु सपना सारखं हे पण मधुबाला ताकने न्हालेली माझ्या तोंडात जातानाचे चित्र दिसु लागेल आता"

"तू ज्या रेट ने पाकृ टाकतेआहेस आणि कृती विचारते आहेस त्या रेट नी काय खरं नाही स्त्री मुक्ती चं. मी लोणची घालते आहे, पुनश्व गुळपोळीचा ट्राय मारते आहे आणि तू धडाधड पाकृ करते आहेस. Et tu Brutus.."

"बापरे..! तिळाची चिक्की हा 'पहिला' पदार्थ तू शिकलेला? म्हणजे पहिली दुसरी वगैरे न करता एकदम दहावीलाच बसलीस की!"

"इथे देते की जाहीर कबुली ...मला भाकरी अजिबात जमत नाही ! ...हल्ली पार्ले बाफ सुस्तावल्याने आपल्या दोघींच्या विपूंचे टी आर पी भलतेच हाय राहतील अजून चोवीस तास तरी"

"आज्जी, जेवायला कधी बोलावताय? सामान हवे आहे ना?"

"हाहाहा, अग मी शपथ्पूर्वक सांगतो की मला थोडेही टक्कल नाही."

"अरे अरे काय हे माझ्या कंपूभगिनी माझ्याबद्दल असे बोलतात ते देखील व्हीपी मधे ... मग मी अ‍ॅडमिन असण्याचा काय उपेग"

"तुझ्या बाळाचं भविष्य खरंच उज्ज्वल आहे. त्याने बेसनलाडू ग्रेपज्युसात बुडवून खाल्ला तेव्हाच मी ओळखलं!"

"आहाहा, एक काळ असा होता. जेव्हा माझं वय झालेलं नव्हतं. खाईन तर तुपाशी असा बाणा असायचा. साधं केळं सुद्धा वाटीत कणीदार तूप काढून घेऊन खायचे. आता खूप विचार करावा लागतो. पण बेरी मात्र मी अजूनही कुणाला देत नाही."

"मागचा पावसाळा म्हणजे घरभर लंगोटींच्या पताका. येणा-यानी कपडे सरकवून जागा करुन घ्यावी."

"अरेरे. हमर मधले खरे हंक असतात ग. पण जीप मधले पण ठिक असतात."

"तु नक्की धडाडीची आहेस, की ढालगज? काचेच्या बुटाला यातलं काहीही म्याच होत नाही, सांगून ठेवतो."

"रच्याकने- तू इतक्यात एवढ्या रेसिप्या का द्यायला लागली आहेस? तू लवकरच आपली ढालगज महिला फ्रॅटरनिटी सोडून "अगंबाई, अहो जरा गाडीत पेट्रोल भरुन आणा ना" च्या कॅटेगिरीत सामिल होणारेस अशी अनाठायी भिती मला त्यामुळे वाटली."

"तू ये गं मार्चमध्ये. आपण शेपुच्या भाजीवर गॉसिप करुयात."

"या आधी पण तुला आमंत्रण दिलेले आहे पण तुला आठवत नाही ते. आता या गटगला ये तुला हळद कुंकु लावुन, ओटी भरून आमंत्रण देईन."

"मला वयोवृद्ध संबोधून काहीही साध्य होणार नाही. तुम्हाला वारंवार सूचना देऊन सुद्धा तुमच्यामधे काडीमात्रही फरक नाही. माझ्या डोक्यावरचे विरळ होत चाललेले माझे केस, हा माझा खाजगी मामला आहे. ह्या विषयाला सार्वजनीक स्वरूप दिल्या बद्दल तुमचा जाहीर निषेध."

"तिकडे अपमान आणि अनुल्लेख होईल, म्हणून इकडेच (चाचरत, खुर्चीचा आधार घेत, न घाबरल्याचा आव आणून)सांगत्ये- मला शेपू अजिबात आवडत नाही!"

"पण सँटी (चक्रम) म्हणाला बिर्याणी आहे का फोडणीचा भात... :अओ:"

"आपणांस आज संध्याकाळी दूरध्वनी करण्याचे योजिले आहे. तेव्हा त्यांसी उत्तर देयावे. बदफैली केल्यास अंजाम बुरा होईल.."

"मी इतकी जातिवंत खवय्यी आहे की एखादा पदार्थ बनवला की त्याचा फोटोच काढायला विसरते. खायचीच घाई भारी"

"मांजरांइतका 'अपने मर्जी का मालिक' प्राणी मी पाहिला नाही. म्हणजे हे लांबून लांबून केलेलं निरीक्षण. नाहीतर मला मनुष्यप्राणी सोडून जगातल्या यच्चयावत प्राण्यांची भिती वाटते"

"मी त्याच्या 'भरकटलेल्या' लेखनाची पंखी? खि खि.. जाऊन सांग त्याला मी हसले खो खो ते. आणि हेही सांग सो सो वगैरे शब्द वापरु नकोस. जळतोस ते सांग स्पष्ट त्याची रिअ‍ॅक्शनही सांग मला."

"अगं बाई, मी विवाहित भारतीय नारी आहे ह्याचा अर्थ असा नाही की मी क्युट देसी आणि परदेसी न्याहाळत नाही"

"परदेशात सिंडरेला अन भारतात सिंड्रेला म्हणतात असं मल वाटलं होतं. जाऊदे. बुटं हर्विण्याची सवय कंटिन्यु कर म्हंजी झालं."

"फसलेय घरी वैदर्भियांच्यात, माझ्या पुणेरीपणाचा उद्धार करतात :अओ:"

"अती शेंगदाणे प्रेम आहे इकडे.. दाण्याच्याच चिवड्यातही 'अजून थोडे दाणे चालले असते' म्हणायला कमी करणार नाहीत"

"अगं बखर माझ्याकडे आहे. पण माझं अजून मन भरलं नाहीये ते वाचून. साडेतेवीसवेळाच ( फक्त) वाचून झालंय! मो यांना पत्ता कळवायला सांग. पुढच्या आठवड्यात जड अंतःकरणाने पाठवीन : पदराच्या शेल्याने डोळे पुसणारी बाहुली:"

"इशानने सँटीचे केस कापले? हा सॅंट्या इतका 'हा' आहे की काय?"

"जगातली प्रत्येक व्यक्ती हे एक 'पात्र'च नाही का? आपण 'जगावेगळी' पात्रे शोधायला जातो, पण ते सुद्धा लौकिकार्थातले, सरळसोट मापदंड घेऊन. खरे तर याहीपेक्षा अजब पात्रे अस्तित्वात असू शकतात, असतात हे नक्की. आपले त्यांच्याकडे लक्ष नसते, एवढेच. याबद्दल लिहावे तेवढे थोडे, त्यामुळे असोच."

"ह्म्म्म. त्यांनी स्वतःच्या बायकोच्या बाबतीत असेच काहीहे फालतू लिहिले होते मागे त्याचा संताप आहे मात अजुन. आजही त्यांनी तिथे आपण काय केले ते लिहिलेय. हे स्वघोषित पंडीत म्हआण्जे मुर्खपणा असतो ... जौ दे."

"ह्म्म. कदाचित हसशील.. पण आजही 'दसरा' वाचून रडायला आलं मला! घराचं, आई-बाबांचं, भावंडांचं कौतुक, चेष्टा असं काही 'माहेर' रीलेटेड वाचलं की ईमोशनल होते मी असं दिसतंय- हे मी मुद्दाम विचार करून काढलेलं तात्पर्य आहे- कारण मलाही हे नवीनच आहे!! तुझ्या शैलीचंही श्रेय आहे हे- वरवर मापं काढत फार मनापासून प्रेमाने लिहितेस तू या गोष्टी! Keep it up!"

"सिंडे- तुच एकटी हुशार आहेस हो."

"सिंडे तू एकंदरितच कधी अभ्यास केला असशील असं वाटत नाही मला..."

"सिंडे तू आनंदी हो की दु:खी हो पण ललित पाडच, म्हणजे मग मी लगेच त्याचे विडंबन करणार आहे"

"आमची सद्ध्या तोंडाला खळ आहे."

"एका फोनवर मेसेज ठेवला बहुतेक तो तुझाच फोन होता. नसेल तर मौजा ही मौजा."

"भाय, एक क्षणभर कळ्याच नाय क्या बोल रहा है... फिर समझा ! चाय बोले तो यहां पे एकदम आरडीएक्स के माफीक हो गयेला है"

"तू काय म्हणतेयस?
(ता.क. : तमाम स्त्रीवर्गाच्या आवडीप्रमाणे तुला अहो-जाहो, तुम्ही, काकू वगैरे वापरत नाहिये.. हरकत नसावी, काय?)"

"सिंडे, माझ्या नवर्‍याच्या रेसिपीज नॉन रिप्रोड्युसिबल असतात. काय टाकलं ते त्यालाच आठवत नाही."

"अग आपल्यावेळी एवढे चॉईस होते का नी आया द्यायच्या कां? आत्ताची पोरंच तशी आहेत."

"एक काळ होता जेव्हा मी पानाचा रंग बघुन म्हणायचो, 'हं गोविन्दा, १०० लिटर पाण्यात, २०० मिली एन्डोसल्फान मिसळून सकाळी एक फवारणी आणि संध्याकाळी एक फवारणी घे'"

"वाहून गेलं तर परत लिही... माबोकरांना पिडायची संधी इतक्या लहान सहान कारणा वरून सोडू नये.."

"सगळ्या ठिकाणी बायकांचा हा असा अग्यावेताळपणा :अओ:"

"हे म्हणजे ते- ल गा ल गा असेल, तर हात टेकले.
तिथे एक दिवस गेलो, तर भंजाळून लगालगा बाहेर पडलो.."

"सिंड्रेला, "ती" चर्चा वाचून मला एक अ. आणि आ. प्रश्न पडलाय... तिकडे पोस्टणाऐवजी म्हंटलं जाणकाराला विचारावं... जरा उत्तर दे बरं...समजा कुमारी अ.ब.क. ही एक अविवाहित मुलगी आहे.. तिचे लग्न झाल्यावर जर तिने नाव बद्लले नाही तर तिने मिस लिहिणेच चालू ठेवावे की मिसेस लिहावे?
मिसेस लिहिते तर मिसेस अ.ब.क चूकीचे नाही का? कारण ब हे तिच्या वडिलांचे नाव आहे.. व ती त्यांची मिसेस नाहिये...आणि मिस लिहीले तर ते ही अयोग्य हाए कारण तिचे लग्न झालेले आहे…"

"९८ सालची बिस्कीटं तुला आज कुठुन आठवली मावशीबाई"

"O Miss,
That post is completely in English and not mixed one...so you may want to have a relook.."

"जॉईन द क्लब सिंडरेला...भेळेचा कागद वाचण्याचा क्लब Happy मीही वाण्याकडून आलेल्या सगळ्या पुडया सरळ करून वाचायचो"

क्रमश: Happy

विषय: 
प्रकार: 

Lol !!!

आपली विपू अशा पध्दतीने अ‍ॅडमिनची नजर चुकवून सुरक्षित ठेवायची तुझी आयडिया भन्नाट आहे.

Rofl __/\__

Biggrin

मी च सगळ्यात जास्त तुला विपु करते कि काय.
>>
सीमा, सिंड्रेलाच्या नादी लागू नकोस जास्त.. ती स्वतः नीट कामं करत नाही आणि दुसर्‍यांनाही करु देत नाही. Proud

डेंजर आहे.. Happy
सगळं चांगलंच आहे, <नॉन रिप्रोद्युसिबल रेसिपी><पाककृती आणि पॉटी><लंगोट्पताका> हे सर्वात भारी...
चिमणराव ना अनुमोदन. हे सदर मासिक व्हावे ही इच्छा! Wink पार्ले बाफ लय फेमस दिसतोय..

Lol
_/\_

आपली विपू अशा पध्दतीने अ‍ॅडमिनची नजर चुकवून सुरक्षित ठेवायची तुझी आयडिया भन्नाट आहे >>

अगदी अगदी........... मला पण हेच सुचलं..........

छानच की......... Happy

Pages