वर्षाविहार २०१० : दवंडीची दवंडी!

Submitted by ववि_संयोजक on 26 May, 2010 - 02:40

(मे महिन्याचे अखेरचे दिवस. वेळ संध्याकाळची. एकीकडे आभाळ भरून आलेलं, तर दुसरीकडे घामाच्या धारा लागलेल्या. अशातच ‘गोदी गार्डन’ टाळ्या पिटत, उड्या मारत येते.)

गोदी गार्डन : यस्स! यस्स! यंदा माझाच नंबर...

(पाठोपाठ ‘टेळवे बीच रिसॉर्ट’, ‘चांगुणा बाग’ आणि ‘मोहोळसृष्टी’ येतात.)

टेळवे बीच रिसॉर्ट : अगं, काय झालं? इतकी का चित्कारतीयेस? पडलीयेस का डोक्यावर?

गोदी गार्डन : मी चित्कारतीये कारण मी आत्ता खूप खूष आहे.

मोहोळसृष्टी : का गं? का?

गोदी गार्डन : कारण, मे महिना संपत आला, पावसाळा आला...

चांगुणा बाग : (कपाळावर हात मारून घेत) हॅत्तिच्या! त्यात काय मोठंसं?

गोदी गार्डन : आहे ना! पावसाळा आला, म्हणजे मायबोलीचा वर्षाविहार आला!

मोहोळसृष्टी : बरं, मग?

गोदी गार्डन : यंदा माबोकर वर्षाविहारासाठी माझ्याकडेच येणार!

टेळवे बीच रिसॉर्ट : आली मोठी! म्हणे माझ्याकडेच येणार! तुला इतकी पक्की खात्री कशी गं?

गोदी गार्डन : अरे रिसॉर्टा, लक्षात येत नाहीय का तुझ्या? माबोकर जुनी ठिकाणं पुन्हा नव्यानं धुंडाळतायत. गेल्या वर्षी मोहोळसृष्टीकडे नव्हते का गेले? म्हणजे आता माझाच नंबर... बस भरून माबोकर येणार, धमाल करणार, मज्जाच मज्जा!

मोहोळसृष्टी : (नाक मुरडत) असंच काही नाही काही!

गोदी गार्डन : (जराशी चिडून) ए, गप्प गं! गेल्या वर्षी तुझ्याकडे दुसर्‍यांदा ववि झाला तेव्हा किती मिरवत होतीस आमच्यासमोर... आता माझा नंबर आल्यावर मात्र मोडता घालतेस होय?

चांगुणा बाग : बरोबरच्चंय तिचं! ते कशावरून तुझ्याकडेच येतील? कदाचित माझीही निवड करतील...

गोदी गार्डन : तू यंदा नाही, पुढच्या वर्षी! (कॉलर ताठ करत) यंदा मीच...

टेळवे बीच रिसॉर्ट : का? का? मी पण आहे की!

मोहोळसृष्टी : चुप्प! तू तर पुणे, मुंबई दोघांपासून लांब आहेस...

टेळवे बीच रिसॉर्ट : मग? तू मुंबईपासून इतकी लांब असूनही गेल्या वर्षी आलेच ना सगळे तुझ्याकडे आनंदाने?

गोदी गार्डन : तुम्ही आपापसांत वाद घालून काहीही उपयोग नाही. यंदा माझाच नंबर असणार आहे!

रिसॉर्ट, चांगुणा बाग : (एकसुरात) नाहीऽ! नाहीऽऽ! आम्हाला हे मान्य नाही...

(इतक्यात ‘मायबोली ताई’ प्रवेश करते.)

मायबोली ताई : (भांडण सोडवण्याच्या आवेशात) ऐकाऽऽ, भांडू नका! वविसाठी संयोजन समितीच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. समितीच्या सदस्यांची नावं आणि यंदाचं वविचं ठिकाण थोड्याच दिवसांत सर्वांना समजेल. रिसॉर्टा, कदाचित ते तुला निवडतील; चांगुणे, गोदे, तुमच्यापैकीही एकीची निवड होऊ शकते. किंवा कुणी सांगावं, यंदा एखादी नवी जागाही शोधली जाईल!
तेव्हा, भांडू नका, वाट पहा...

थोड्याच दिवसांत येत आहे,

वविची दवंडी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण हुर्रे SSSSSSS, पण परिक्षेच्या तारखा पकडु नका Sad मग वविच्या कल्पनेने गार वाटायच्या ऐवजी गरम व्हायला लागेल परत Proud

टवळे :d

मोहोळसृष्टी Lol (मला बाकीची माहीत नाहीत. :()

पण परिक्षेच्या तारखा पकडु नका >>> स्मि, अगं यंदा युनिट टेस्ट्स रद्द केल्या जाणार आहेत ना? मग तुला कसली चिंता?

ह्यावेळी दवंडी जरा लवकरच झाली आहे. >>झक्या अरे लेका ही दवंडीची दवंडी आहे >>> विनय, त्या कविताचेही कान धर. ती पण यालाच दवंडी धरून चाल्लीये. Lol

वर्षा ऋतूचे आगमन तर होऊदे दोस्तलोक्स...

स्मि, अगं यंदा युनिट टेस्ट्स रद्द केल्या जाणार आहेत ना? मग तुला कसली चिंता?

मला वाटले मी चुकुन गेल्या वर्षीचे पान उघडले की काय?? गेल्या वर्षी स्वाईन फ्लु मुळे हाहाकार उडालेला, यंदा काय आहे? आणि इथे कसा काय आधीच सुगावा लागला??? Proud

विनय Lol

Pages