इथेच का नको.....
काही वर्षांपूर्वीची मायबोलीवरची सत्य घटना
एका मायबोलीकराची इच्छा होती मायबोलीवरती उर्दू गझला असाव्यात, म्हणून त्याने इथे एक छान उर्दू मधली (पण देवनागरीत) गझल लिहिली. त्याला काही जाणकारांचा प्रतिसादही मिळाला. त्याला पुढे उर्दू कवितांचा संग्रह (रसग्रहण नाही) मायबोलीवर करायचा होता. अॅडमीन टीम ने त्याला सुचवलं दुसरीकडे लिही मायबोलीवर नको. तेंव्हा त्याचं म्हणणं होतं पण इथंच का नको? तिकडे लिहिलं तर कुणी वाचणार नाही. इथे भरपूर वाचणारे आहेत. आणि कधी कधी इतक्या भारंभार मराठी कविता असतात तर चांगल्या उर्दू मधल्या गझला का नको?
वेगवेगळ्या रुपात "इथे का नको" हा प्रश्न पुन्हा पुन्हा मायबोलीवर येत असतो.
- इथेच हिंदीतली गाणी का नको?
- मला फेसबुकवरून्/व्हॉट्सअॅपवरून आलेली छान छान चित्रे इथे मायबोलीवर टाकली तर काय बिघडलं?
- प्रवासवर्णन गुलमोहरात टाकलं तर काय बिघडलं? "प्रवासाचे अनुभव" मधे कशाला टाकायचं?
- मला पुस्तकाचं परिक्षण ललितमधे लिहायचंय. "वाचू आनंदे ग्रूप" मधे फक्त ३८३ सभासद आहेत.
- पाककृती मी इथेच प्रतिक्रियेत लिहतेय. वेगळी कुठे टाकत बसू. नाहितर तुझ्या विचारपूशीत टाकते.
- अरे या साईटवर भरपुर लोक दिसताहेत. चला एका दिवसात १५ धागे/लेख्/कविता उघडून टाकू.
- वेगळा धागा वेगळ्या विषयावर कशाला काढू? सगळं याच धाग्यावर लिहणं मला सोपं वाटतं. आणि माझ्या मते हा विषय याच्याशीच संबंधित आहे
- मला जुन्याच मायबोलीवर लिहायचंय. नवीन मायबोलीवर कुणी फिरकत नाही.
आणि मदतसमितीला/अॅडमीनटीमला आलेले हे संदेश
- हे सगळं गुलमोहरात कशाला, वेगवेगळे भाग करा आणि काही भाग नजरेआड करा
- "पाककृती हवी आहे का" या पानावर एक मस्त पाककृती टाकली होती कुणीतरी प्रतिक्रिया म्हणून पण आता सापडत नाहीये.
- लोकांना प्रत्येक पुस्तकासाठी वेगळं पान उघडायला सांगा ना. "मी वाचलेलं पुस्तक" मधे काही सापडत नाहिये. सगळी चांगली पुस्तकं प्रतिक्रियांमधे हरवली आहेत
- अहो या उत्साही लेखकांना आवरा. किती ठिकाणी रिक्षा फिरवतायत. कंटाळा आला त्याचा.
- तिकडे फेसबुकवर जी चित्रं दिसतात तीच इकडे परत कशाला? आणि त्याचा मायबोलीशी काय संबंध?
प्रत्येक वेळी प्रश्नाचं रुप वेगळं असलं तरी मुख्य कारणं या पैकी असतात.
१. आपल्याला जे सांगायचंय, विचारायचंय ते नक्की खूप जणांना आवडेल याची खात्री.
२. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आपलं लेखन पोहोचावं.
३. जी पद्धत सोपी आहे/माहितीची आहे ती वापरावीशी वाटणे.
थोडक्यात लेखक ज्याच्यासाठी लिहायचंय त्या वाचकाचा विचार नेहमीच करतात असं नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यत जायचं या हेतूमुळे नकळत आपण वाचकांपासून दूर जात आहोत याची त्यांना कदाचीत कल्पनाच नाहीये.
प्रत्येक लेखकाने स्वत:ला हे प्रश्न विचारून पहावे असं सुचवावसं वाटतं.
- मायबोली या संकेतस्थळावर हे लेखन योग्य/सुसंगत आहे का?
-आज जर मायबोलीवर इतके वाचक नसते तरी मी हे लिहिलं असतं का? की फक्त खूप लोक बघतील म्हणून आपण लिहितो आहोत?
-मला आज जरी हे लिहायला सोपे वाटत असले तरी वाचकाला शोधायला हे सोपे आहे का?
-ज्या वाचकवर्गाच्या ओढीने मी लिहतो/लिहिते आहे तो वाचकवर्ग माझ्या लेखनामुळे माझ्यापासून दूर जातो आहे का?
हे लिहायचं आणखी एक कारण म्हणजे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या पानावर काही मायबोलीबाहेरच्या दुव्यांचे संकलन सुरु होते. वर काही दिलेले मुद्दे या बाबतही लागू होतात. पण दुव्यांच्या संकलनाबद्दल आणखी काही नवीन मुद्दे उपस्थित होतात. (या पानांना मुद्दाम वेगळे काढून टिका करणे हा या लेखाचा उद्देश नाही. हे मुद्दे गेले काही दिवसापासून लिहायचे होते. आज मुहुर्त लागला असे म्हणूया)
मुळात मायबोलीसारख्या संकेतस्थळाचे यश जास्तीत जास्त वाचकांनी इथे यावे, इथे शक्य तितके रेंगाळावे यावर अवलंबून असते. या उलट कुठल्याही दुव्याचे संकलन असणार्या साईटचे/विभागाचे यश नेमके उलटे म्हणजे लवकरात लवकर वाचकाला बाहेर पाठवावे यावर असते. म्हणून मायबोलीचा सूची विभाग वेगळा आहे. कानोकानी ही साईट म्हणूनच वेगळी तयार केली आहे. त्यामुळे ज्या विभागात आणखी वाचकांनी यावे म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत त्याच विभागात आलेल्या वाचकांना बाहेर पाठवणे योग्य होणार नाही. आणि त्या त्या दुव्याचे वर्गिकरण नसेल आणि त्या दुव्याच्या लोकप्रियतेबद्दल, दर्जाबद्दल माहिती नसेल तर आपण अजून वाचकांपासून दूर जाऊ.
याच कारणांसाठी कानोकानीसारख्या साईटवर मायबोलीसारखी वर्दळ कधीच दिसणार नाही. कारण ज्याना मायबोलीवर येऊन रेंगाळायचे आहे ते इथे असलेले वाचण्यासाठी आलेले आहेत, बाहेरचे वाचण्यासाठी नाही. नाहीतर ते इथे आलेच नसते. या उलट कानोकानी वर पटकन वाचकांना हवे ते सापडून ते त्या त्या वेबसाईटवर गेले तर तेच यश असेल.
<आज जर मायबोलीवर इतके वाचक
<आज जर मायबोलीवर इतके वाचक नसते तरी मी हे लिहिलं असतं का?>
माझ्यापुरते उत्तरः होSSS. तसे एकेकाळी, मायबोलीवर फार लोक नव्हते तेंव्हा लिहीत होतोच. त्या सर्वांच्या प्रोत्साहनाने खरे तर आजकाल मी इतके लिहितो की लोक म्हणतात आता पुरे.
<मी इथे काही लिहीतो ते कुणी वाचतात तरी का हे कसे समजावे?>
आयला, हा प्रश्न मला कधीच पडत नाही. लोक एव्हढे प्रतिसाद देतात, नि पुष्कळ लोक सांगतात, आम्ही रोमात होतो, नि तुम्ही लिहिताय् ते वाचतोय् (हां!).
<ज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांनी बोध घेतला म्हणजे मिळवली!>

अहो पण अनेकदा ज्यांच्यासाठी लिहिलय् त्यांना (वयाने मोठे असले तरी) फारशी अक्कल नसते. त्यामुळे तसे होईलच असे नाही.
लिंकबद्दल धन्यवाद!
लिंकबद्दल धन्यवाद!
Pages