फसवणुक

Submitted by reshmasandeep on 24 May, 2010 - 03:02

!! श्री !!
मला कळतच नव्हत॑ माझ्या आणि पपा मधे आताशी इतके वाद का होत आहेत ते ?

मी तर किती लाडकी आहे पपाची, कुणी हया मुळ नशत्राचा शोध लावला? सगळीकडे एकच कारण नकाराच मुलगी मुळ नशत्रात जन्मली आहे........ पपाचा आधी तर विश्वास नव्हता पत्रिकेवर मग आताच का हा बदल ?

लग्न जमत नही ह्याचा राग माझ्यावर आहे आस सतत जाणवत होत आणि एक दिवस श्रीमान सुनिल आले पहायला, ५.८, सावला, कम्युटर Engg त्याचा response पाहुन वाट्ल कि लग्न करुनच जातो कि काय घरी ? मलाहि तो आवड्ला होता त्याचा होकार आल्यावर मग त्याचि आई आलि पहायला आणि येताना तिचा छोटा अपघात झाला होता ( शरिरा वर तश्या खाणाखुना तर दिसल्या नाही ) माझ्या मुळ नशत्रामुळे हे झाल हे सुचवन्याची एकहि मोका नाही सोड्ला.... मग आमची फोनाफोनी चालु झाली, २६ जुलईचा पाऊस, एकमेकाबददलची चिन्ता पण पपाना वेगळच टेन्शन होता मला पहायला हि व्यक्ति मार्च मध्हे आलि होती आणि आजुन काहिच बोलनी सुरु झालि नव्हती. मुलाला विचारला तर आई कडे बोट आईला विचारला तर मुला कडे बोट. हे आस जवळ जवळ मार्च पासुन Oct पर्यत चालु होत.

शेवटी एकदाचे ती लोका बोलनी करायला आलि आम्ही सोलापुर चे आहोत आमच्याकडे बोलनी करार लेखी आसतो हि रीत त्या लोकाना मान्य नव्हती त्यामुळे लेखी काही नाही झाल. काहीतरी चुकत आहे आस जाणवत होता पण नक्कि काय ते उमगत नव्ह्त. बाप्पावर विश्वास होता....

आमच्या साईडला लग्नाआधी भेटी नाहि होत, फोनाफोनी दर्म्यान खुपदा प्रश्न यायचा तुला मि नक्कि आवड्लो ना ? तुला दुसरा कुणि आवड्त आसेन तर बोल तुझ त्या मुलाशि लग्न लावुन देयिन नाहितर तुला हवी ती मदत करेन. एकदा बोलता बोलता बोलुन गेला कि माझ्या भावाला तु आवड्ली पाहिजे मी बोलले तुझा भाऊ तर expire झाला ना ? तर तो बोलला कि आईला भेट्त आसतो आणि मग subject change काय बोलाव सुचे ना.........

डिसेबर शेवटी पपा ना एका मित्राने एक किस्सा सागितला कि एक बाई आहे तिला ७-८ लाख कर्ज आहे
(बिशि मधे फसली ) तिचा मुलगा कम्युटर Engg आहे, ती लोका मुलि पहायाल जातत आणि अन्दाज घेतात किती मिळु शकता, पपानि विचार् पुस केल्यावर कळला कि आपण फसलो पण मी इथे बोलेन मी वाचले आश्या फालतु व्यक्ति बरोबर लग्न नाहि झाल.

छोट्या भावाला बोलाले कि आपण तक्रार करु, भाऊ बोलला दीदी तुझ बोलण तो record करायचा, खुप दिवस झाले तरी पण मनात सल आहे, कधितरी त्याला जाब विचारेन कि नेहमी प्रमाणे मी सगळ बाप्पावर टाकेन....

Group content visibility: 
Public - accessible to all site users