उदगीर

Submitted by admin on 3 April, 2008 - 01:40

उदगीरचे मायबोलीकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाउस अजुन पण नाही ... खरीपाच्या पेरण्या चालु झाल्या. पाउस पडावा अशी प्रार्थना.
अजुनही नळाला २०-२० दिवस पाणी येत नाही असे ऐकले.

ओह तुमच्या साईडला खूपच बिकट परीस्थिती आहे. तुमच्या ईकडे कोणती पिक घेतली जातात.
पाउस पडावा अशी प्रार्थना. <<< + १

महागुरु, आमच्याकडे दमदार पावसाला सुरुवात झाली मागच्या दोन आठवड्यापासून. जे लोक शेती करतात त्यांची शेतीची काम चालु झाली. आमची शेत जमिन पड आहे गेली काही वर्ष. Sad एक दोन वर्षात त्या जमिनीत सुद्धा आंबा, काजू ची झाड लागतील. Sad गावात ३-४ जणांना विचारल भात शेती आमच्या जमिनीत फुकट करा पण त्यासाठीसुद्धा नकार मिळाला.

आमच्या गावात बर्‍याच जणांच्या जमिनी पड आहेत. भरपूर पाऊस आहे पण शेतीची काम करायला माणस नाहीत. ज्यांच्या जमिनी आहेत ते लोक्स दुसर्‍या राज्यात / देशात पोटापाण्यासाठी गेले.

वरची प्रार्थना तुमच्या साईडला पाऊस पडावा ह्यासाठी होती.

रामराम !
उदगीर जिल्हा करणार असे कुठेतरी वाचले.प्रत्येक सरकार हे गाजर दाखवत असते.
जिल्हा झाल्यावर तरी महिन्यातुन कमितकमी २ दा नळाला पाणी येईल का?

उदगीर पाणी प्रश्न खुपच गंभीर आहे.
गेल्या दोन एक दशकात पुरेसे पाणी नाही. महिन्यातुन एक वेळ ते पण काही मिनिटे पाणी येते. जे नळातुन येते ते पाणी की गाळ इतपत वाईट परिस्थिती आहे.

कोणत्याही राजकीय पुढार्‍याने आजपर्यंत ह्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा पण नाही घेतला.
(औरंगाबादमधे पंचतारांकीत अतिथीगृहात घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे उपाययोजना नव्हे)

udgir_water.jpg