ढेकणांसाठीची ट्रीटमेंट | पुण्यातले कॉन्टॅक्ट्स हवे आहेत

Submitted by नानबा on 19 May, 2010 - 21:41

पुण्यात ढेकणांवर इफेक्टीव ट्रीटमेंट करणारं कुणी माहित आहे का?अर्जंट माहिती हवी होती..

--------------------
अवांतरः
नवरा भारतात गेल्यानं, ह्या महिन्यात एका मुलीबरोबर शिफ्ट झाले .. आणि आज कळलं की त्या मुलीच्या घरात बेडबग्ज आहेत. म्हणजे माझ्या सामानाबरोबर भारतात येतील Sad
(कुतबो मधेच टाकणार होते खरतर.. त्या मुलीला ढेकूण आहेत माहित असूनही तिनं घरातलं फर्निचर दोन चार जणांना विकलं..त्यातली एक बाई तर प्रेग्नंट आहे! Sad Sad )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या पोष्टीचा का म्हणे अनुल्लेख ?? मी पण लिहिलं होतं ना सकाळमध्ये जाहिराती विभागात बघ म्हणुन Uhoh

नानबा, अगं एवढं तरी काय ढेकणांचं...येतील तुझ्याबरोबर...राहतील तुझ्या घरात...तुला पण सवय होइल हळुहळु...तसं पण सहवासाने प्रेम वाढतं (म्हणे) Proud

on a serious note, तिथे पेस्ट कंट्रोलिंग करशीलच पण इथे पॅकिंग करताना काही काळज्या घे. सगळे कपडे गरम पाण्यात धुवून गरम सेटिंगवर ड्रायरमधे वाळवून सील करुन ठेव. सील केल्याशिवाय घरात आणु नकोस. सील करण्यासाठी (नव्या/न वापरलेल्या) गार्बेज बॅग्स किंवा बेड बाथ आणि पल्याड वगैरे मधून वॅक्युम प्रूफ बॅग्स वापर. जे कपडे ड्राय क्लिमिंगचे आहेत ते वेगळे काढ आणि नीट झटकून वेगळ्या बॅग्समध्ये सील कर. भारतात गेल्या गेल्या ड्राय क्लिनिंगला पाठव.

इतर वस्तूंसाठी: हेअर ड्रायर हाय हीट सेटिंगवर ठेवून त्या वस्तूवर ब्लो कर. सगळे कानेकोपरे व्यवस्थित. ब्लो करुन झाले की लगेच एक एक वस्तु झिप लॉकमध्य सील करुन टाक. ज्यात सामान पॅक करणार त्या बॅग्स पण अशाच ब्लो-ड्राय करुन घे. वेळखाऊ काम आहे पण ढेकणांची अंडी मरायला हा एफेक्टिव ऊपाय आहे. स्टीम स्प्रे मिळतो बाजारात तो मिळाला तर तो वापर. पण स्टीम स्प्रेने वस्तू ओलसर होतात.

शक्य झाल्यास नवीन बॅग्स विकत आण आणि त्यात सामान ने. ढेकणांचा बंदोबस्त करायला जितका वेळ आणि पैसे खर्च होतील त्यापेक्षा नव्या बॅग घेणे नक्कीच परवडेल. शक्य झाल्यास लाकडाच्या सर्व वस्तुंवर पाणी सोड(म्हणजे वस्तु फेकून दे). All the best Happy

मला हे सर्व कसं माहिती विचारु नये ~(कडक) हुक्मावर्नं

मिनी, Tonaga, फारेंड, दीपूर्झा, माधव, महागुरु, स्वर, साक्षी, साजिरा, सिंडी आणि माझ्या दु:खात सहभागी झालेल्या/ त्यावर उपाय सुचवलेल्या सर्व माबोकरांनो, अगदी मनापासून थँक्स!

सिंडी, That sounds like a plan! नक्की करेन हे सगळं..अगं, बॅगा बदलल्या तरी प्रॉब्लेम हा आहे की मी जाईपर्यंत त्याच घरात रहाणार असल्यानं पुन्हा नवीन बॅगात होऊ शकतातच!
(हॉटेल्स ऑफिस पासून बर्‍यापैकी लांब असल्यानं कम्युटेशनचा प्रॉब्लेम - आणि पुन्हा मी स्प्रेड व्हायला मदत केली म्हणून गिल्ट.. त्यामुळे इथेच रहायचं ठरवतेय..)

बॅग्स जायच्या आदल्या दिवशी आण. स्वच्छ धुतलेल्या चादरीत पक्क्या गुंडाळून ठेव. जाताना चादरी फेकून दे. नाही तर त्या बाईलाच दे. कुणी मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांच्या घरी नाही का ठेवता येणार नवीन बॅग्स ?

कुणीतरी वर म्हंटलय कि 'अमेरिकेत ढेकुण असल्याच हल्लीच कळलं' म्हणुन. मी तर अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदा आयुष्यात ढेकुण पाहिलेला. Sad मैत्रिणीच्या अंगावर रॅश येत होते नंतर कळल कि ढेकुण चावल्याने अस होतय म्हणुन.

नानबा, ऑल द बेस्ट तुला. सिंडी सांगत्ये तसे उपाय केलेस तर होपफुली मरतील सगळे ढेकुण.

मी तर अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदा आयुष्यात ढेकुण पाहिलेला
>> येक्झॅक्टली.. भारतात कधीच त्रास झाला नव्हता.. (तसही आत्ता ढेकूण चावत नाहीयेत.. पण ते कुत्र आलेलं - ढेकूण शोधणारं - Detective Shadow म्हणे.. त्यानं सांगितलं की सगळ्या घरात आहेत)

नानबा, भारतात गेल्यावर जे उपाय करायचे ते करशील पण इथेच ढेकणांचा बंदोबस्त का करत नाहीस ? अत्यंत गरजेचे आहे ते. तुमच्यानंतर त्या घरात राहायला येणार्‍या भाडेकरुंना त्याचा त्रास होऊ शकतो. चाळीस डॉलर्स स्प्रे चा खर्च चार जणांत वाटलात तर काहीच भार येणार नाही. ढेकणांच्या बाबतीतला आमचा हा अत्यंत वाईट अनुभव !
आम्ही दीड वर्षांपूर्वी भारतातून मिनेसोटात आलो तेव्हा आमच्या अपार्टमेंटमध्ये आधीच्या भाडेकरुंच्या कॄपेने बेडबग्ज होते. बरेच दिवस तिथे कुणी राहत नसल्याने ते डॉर्मन्ट स्टेजमध्ये होते. माझं दुर्दैव हे की त्याआधी मी ढेकूण कसे असतात आणि दिसतात हे पाहिलंच नव्हतं ( विश्वास ठेवा अथवा न ठेवा ) त्यामुळे भिंतीवर एक दोन दिसल्यावर कसर वगैरेसारखे लाकडातून येणारे किडे असतील असं मला वाटलं आणि त्यावर साधा स्प्रे मारला ( त्याने ते मरत नाहीत ) नवर्‍यालाही सांगितलं नाही. त्यानंतर साधारण पंधरा दिवसांत ते फक्त मलाच चावू लागले ( भिंतीच्या साईडला मी झोपत असल्याने ? ) तरीही मला कळलं नाही. डॉक्टरला अ‍ॅलर्जी, रॅश येतोय म्हणून दाखवायला गेले Uhoh तिने माझ्याकडे ( संशयाने पाहत ) अ‍ॅलर्जी नाहीये, किडे (बग्ज) चावत नाहीयेत ना ? असं विचारलं तरी डोक्यात प्रकाश पडला नाही. त्यानंतर दोन्-तीन दिवसांत मुलालाही चावू लागले तेव्हा मात्र लगेच आम्ही इंटरनेटवर सर्च दिला आणि उलगडा झाला. ताबडतोब लिजिंग ऑफिसमध्ये तक्रार केली तर त्यांनी कानावर हात ठेवले कारण आम्हाला मूव्ह होऊन महिना उलटून गेला होता. ते सांगतील त्या माणसाकडून हीट ट्रिटमेंटच करुन घ्यावी लागली. आणि त्याचे तेराशे डॉलर्स बिल आले. खूप मनस्ताप झाला. मात्र ढेकणांचा पुरता बंदोबस्त झाला. हे मित्रांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला वेड्यात काढले. त्यांचे म्हणणे बॅचलर्स राहत असलेल्या घरात बरेचदा ढेकूण होतात. डाऊनटाऊनमधील अपार्टमेंटस मध्येही बरेचदा असतात. वॉलग्रीन्स किंवा ऑनलाईन ऑर्डर करुन तीस्-चाळीस डॉलर्सपर्यंतचा स्प्रे मिळतो. तो मारायचा ( आणि नंतर काही आठवडे नियमित मारत राहायचा ) की जातात. हे कळण्यासाठी आम्हाला एवढा भूर्दंड सोसावा लागला.
आमच्या अनुभवातून मायबोलीकरांनाही शिकायला मिळावे म्हणून एवढ्या विस्ताराने लिहिले. नाहीतर हा प्रकार इतका लाजीरवाणा आहे ( आमची चूक नसूनही ! ). इंटरनेटवर ह्या विषयावर वाचताना फक्त अस्वच्छतेतून ढेकूण होतात हा गैरसमज आहे हे वाचले तेव्हा बरे वाटले होते.

नानबा, भारतात गेल्यावर जे उपाय करायचे ते करशील पण इथेच ढेकणांचा बंदोबस्त का करत नाहीस ? अत्यंत गरजेचे आहे ते. तुमच्यानंतर त्या घरात राहायला येणार्‍या भाडेकरुंना त्याचा त्रास होऊ शकतो. चाळीस डॉलर्स स्प्रे चा खर्च चार जणांत वाटलात तर काहीच भार येणार नाही
>> अपार्टमेंटवाले लोक ते करणार आहेत आम्ही मूव्ह झाल्यावर.. त्यांनीच कुत्र बोलावलेलं (परमेश्वरी कृपेनं - नाहीतर मी निवांत गेले असते भारतात)

कुणी मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांच्या घरी नाही का ठेवता येणार नवीन बॅग्स ?
>> अगं मागच्या दोन महिन्यात बरेचसे मित्र परत गेले भारतात..
आणि खरं सांगायचं तर जरा भितीही वाटते (की चुकूनही दुसर्‍या कुणाच्या घरात नकोत व्हायला आपल्यामुळे - एक नातेवाईक आहेत- त्यांना ऑल्रेडी प्रसाद दिला नसला म्हणजे मिळवलं..ज्याम गिल्टी वाटेल - तसं झालं तर! Sad )

कुणी मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांच्या घरी नाही का ठेवता येणार नवीन बॅग्स ?
---- मन चिंती ते वैरी न चिंती... अर्थात त्यांच्या घरी आधीच ढेकणांनी ठाण मांडलेले असेल तर?

अर्थात घाबरु नका... धिराने घ्या.

मला हे सर्व कसं माहिती विचारु नये ~(कडक) हुक्मावर्नं>>> Rofl

आणि त्याचे तेराशे डॉलर्स बिल आले. >>> Sad
चांगला डीएसएलाअर कॅमेरा आला असता एवढ्या पैशात.

ढेकणांवर इफेक्टीव ट्रीटमेंट काय आहे? गेल्या २ वर्शापासून मला हा त्रास आहे. सर्व उपाय करुन थकले पण काहि उपयोग झाला नाहि, पेस्ट कन्त्रोल पण केले पण परत हे येतातच काय कराव आता? अगदी गाद्या पण नविन बनवून घेतल्या.

मेघाराणी, तु पुण्यात आहेस ना? मग स्वारगेटजवळ ते नाईक बी-बियाण्यांचे जे दुकान आहे ते माहिती असेल तर तिथे विचार. ते एक औषध देतात ते रॉकेलमधे मिसळुन स्प्रे करायचे. आठवड्यातुन एकदा असे दोन-तीनवेळा केल्यावर जातात . मात्र वास अतिवाईट आहे.

ढेकूण आहेत हे सांगायला कुत्रा! स्वतःला कळत नसेल, त्रास होत नसेल तर आणखी पैसे कशाला घालवायचे? बहुधा तशी फॅशन असेल.

ढेकूण शोधणार्‍या कुत्रेवाल्याला बोलावण्या आधी बेटर बिझनेस ब्यूरो मधून तो माणूस खात्रीलायक आहे याची खात्री करून घ्यावी, नाहीतर ढेकूण नसले तरी आहेत असे सांगून फसवतात.

त्याच्या आधी घरच्या लोकांना खालील कामे करावी लागतात:

घर आवरणे, साफसफाई, नको असलेल्या गोष्टी फेकून देणे, कपडे ड्रायरमधे घालून गरम सेटिंगवर अर्धा तास ठेवणे वगैरे, वगैरे.

अर्थात ही कामे करायला कुणाला वेळ नसतो. म्हणून मग नोकरी नसलेले होतकरू नट नट्या ही कामे करतात. तासाला २० ते ३० डॉ. मिळतात. होतकरू नट नट्याच का, मेक्सिकन का नाहीत? कारण नट नट्यांच्या एजंट्सनी सांगितले की नट नट्या (विशेषतः होतकरू) हे अत्यंत मनमिळावू असतात. पुनः त्यांना इंग्रजी येते. आपल्या घरात सर्वत्र फिरणारा माणूस, (बाई) जरा फ्रेन्डली असेल तर बरे ना!
आथवड्याला २० ते ३० काम केले की आठवड्याचा घरभाडे सोडून बाकीचे खर्च सुटले.

टर्पेन्टाइन स्प्रे बोतल मधे घालून मारायचे का?

टर्पेन्टाईन, रॉकेल, पावडर काहीहि मारा, पण फेटा दाढीवाल्यासारखे करू नका. तो म्हणतो, ढेकूण मारायच्या औषधाची अख्खी बाटली पितो. आता ढेकूण चावतील तर मरतील!! बरी अद्दल घडेल त्यांना!

शिवाय बायकांनो, नवर्‍याला सांगू नका, ढेकूणांची पावडर घेऊन या म्हणून. तो लगेच ओरडेल 'कशाला हवी पावडर? आज पावडर, उद्या लिपस्टिक! नसती सोंगे, भलते लाड!'

मी मायबोलीवर उंदिराप्रमाणे ढेकूण असा धागा काढावा असे म्हणताना जरा सर्च मारले तर हा धागा दिसला..

आमच्या घरी ढेकूण नाहीत पण कालच मुलाच्या कॉलेजच्या बॅगेत एक भला मोठ्ठा ढेकूण आढळला. जाम फुगला होता. आता मला भितीच वाटतेय की काय करायचे.

माझ्या चिंचवडच्या एका मैत्रिणीकडे ढेकूण झाल्यापासून ३ वर्षात ना आम्ही तिच्याकडे गेलो ना तिला बोलावले. तिने म्हणे पेस्ट कंट्रोल केले, नंतर घराचे दार उघडले तेव्हा ती चक्कर येऊन पडली औषधाच्या वासाने पण एकही ढेकूण काही मेला नव्हता. माझे साबू तिला एकेकाला पकडून रॉकेल पाज म्हणून चेष्टा करायचे.. तिने एक आयपीए नावाचे औषध (इंडस्ट्रियल अल्कोहोल) स्प्रे केले तर हळूहळू सर्व ढेकूण मेले. आता तिच्याकडे नाहीत ढेकूण.

हे औषध कम्‌ अल्कोहोल केमिस्ट (मेडिकल चे दुकान नाही) कडे आपण काही इंडस्ट्रियल काम करतो (उदा. पीसीबी बोर्ड धुणे इ.) असे सांगितले तरच मिळते.
यात काहीही मिसळायचे नाही.
मी करून पाहणार आहे. अर्थात त्यासाठी घरात ढेकूण हवे तर ते मेलेले कळतील.
ज्यांच्याकडे असतील त्यानी हे करून पाहून इथे लिहावे.. म्हणजे इतरानाही समजेल.

कृपया जे काही कराल ते अत्यंत काळजीपूर्वक करा.
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात लगेच झोपल्याने गुदमरुन मेल्याच्या बातम्या ताज्या आहेत.

नक्कीच नारबा, अल्कोहोल म्हणजे काय चेष्टा आहे?
हे संपूर्ण पेस्ट कंट्रोलसारखे न फवारता ढेकूण प्रविष्ट जागांवरच मारायचे आहे. अर्थात मुले इ. लांब ठेऊनच.
पण ढेकूण अल्कोहोल प्यायल्यावर मरतात कसे काय ही माझी शंका अद्याप मिटायची आहे.

माझा एक मित्र कधी तरी सान्गत होता कि त्याच्या घरी म्हने त्याने एक पुजा केली ,काहितरी उद्क पुजा का उद्क शांन्ती पुजा.होम केला होता त्यात .काय काय टाकल असेल होमात माहित नाही . पण त्याने ढेकण मेली अस तो म्हणाला.फार खर्च केला त्याने ते गोष्ट वेगळी.
मला स्वताला यावर विश्वास नाहि.पन कदाचीत एखादी जडीबूटी असेल त्यात आहुती मधे.

जस कबुतरान मुळे जर कधी पिसवा आल्या तर त्यावर गवती चहा ची पान उकळवुन ते पाणी शिंपडतात तसच काहि तरी असेल.

कालची सुट्टी ढेकूण मारण्यात सत्कारणी लावली.
सर्व प्रथम संपूर्ण बेड उघडला.काही पार्ट उन्हात ठेवले.
संपूर्ण बेड वर एक लीटर रॉकेल फवारले.एका कोपरयात बेड बग्स कॉलोनी होती ती रॉकेल टाकून उध्वस्त केली अन नंतर टूथ ब्रशने तो भाग अक्षरश घासून काढला.जिथे बरेच दिवस ढेकुण असतात तिथे तो भाग त्यांची अंडी अन अजुन काय काय मुळ घाण होतो व एक प्रकारचा थर साचतो तो सर्व ब्रश ने घासून साफ़ केला.
सगळ झाल्यावर दोन तास रुम बंद केली.नंतर तुळशी बागेतून आणलेली झुरळ व मुंग्या मारायची पावडर अन रॉकेल एकत्र करुन ती पेस्ट बेड च्या सर्व फटित भरली अन सर्व काल रात्रभर तसेच ठेवले.आज सकाळी गादी टाकुन बेड निट केला.
हीच कृति मी अजुन 15 दिवसांनी करणार आहे .रिजल्ट्स काय आहेत ते पोस्ट करेलच.सध्या तरी ₹60 मध्ये काम झाल आहे.

Pages