Submitted by क्रांति on 18 May, 2010 - 00:06
{जगातल्या सगळ्या आया आणि त्यांच्या लेकरांची माफी मागून}
अलिकडे निंबोणीचे झाड राहिलेच नाही
चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई!
गाय पदपथावर, चिमणीला घरटे नाही
परस ना वेली, कुठे झोपतील जाई-जुई?
शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई!
देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली
हट्ट पुरविता तिची झोळी रिकामीही झाली!
नको रडगाणे, हवी जाहिरातीमधली आई!
गुलमोहर:
शेअर करा
चंद्र वेडा मोबाइलच्या
चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई!
हवी जाहिरातीमधली आई!
मस्त!!!!!!!!!!
मस्तच !
मस्तच !
व्वा!! या क्षेत्रातही
व्वा!! या क्षेत्रातही क्रांति!!