ललित गद्य म्हणजे काय ?

Submitted by विक्षिप्त on 17 May, 2010 - 12:54

ललित गद्य म्हणजे काय ? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? कुणी सांगेल काय ?

गुलमोहर: 

खुपच माहिती मिळाली ललित गद्यावर. मग ललित पद्य म्हणजे मु़क्तछंद कविता की आणखी काही ? हे विषयांतर आहे म्हणुन उत्तर इथे देण्या ऐवजी संपर्कात ( नित्या __वा ) म्हणुन दिले तरी चालेल.

खुप आभार सगळ्यांचे आणि माफी मागतो की मी थोडी घाई केली.....
रागावु नका मंडळी... खुप छान आणि हवी तशी माहिती मिळाली मला पण हे पुढ चालु द्या लोकहो...

पुन्हा एकदा मनापासुन माफी मागतो.... SORRY !!

लिंबूकाका,
धन्य आहात तुम्ही...........पण तुम्ही केलेले विश्लेषण एकदम बरोब्बर....... अगदी शंभर मार्क तुम्हांला........ "टीचभर जीवाला हातभर झगा" म्हणजेच ललित गद्य, हे अगदी खरे......... पण तसे केल्याशिवाय त्या घटनेचे वर्णन प्रत्यक्षदर्शी होणार कसे? म्हणूनच वातावरणनिर्मितीसाठी जरा पाल्हाळ लावावेच लागते.......... होय ना? Happy

स्फुट लेखन म्हणजे काय?
ललित आणि स्फुट ह्यात फरक आहे का? असेल तर काय आणि किती?

सध्या डोक्यात आलेले हे दोन प्रश्न. जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती Happy

जाणकार सांगतीलच.
तोपर्यंत ...
मोल्सवर्थ शब्दकोशात -
स्फुट (p. 877) [ sphuṭa ] p (S) Blown, opened, expanded. 2 Burst, rent, broken or torn open or asunder. 3 Opened, figuratively; explained, expounded, explicated, manifested, declared, revealed: also as a open, plain, clear, apparent, evident. 4 as a Loose, separate, detached; that stands alone, or forms no part of a collection, disquisition, or book;--as a stanza, verse, sentence, story, tale. 5 In astronomy. Apparent; as स्फुटसूर्यगतिः Apparent motion of the sun.

बर्‍याचदा स्फुट आणि ललित हे interchangeably वापरल्या जातात.
स्फुट म्हणजे जे कुठल्याही वास्तवाचा आधार घेउन असे, पण तरीही लेखकाचा दृष्टीकोण विषद करणारे स्तंभलेखनासारखे आणि एक प्रकारे वर भरतने म्हणले आहे तसे वर्तमानपत्री ललित. (?)
स्फुटकाव्य अशा शीर्षकाची पुस्तकं पाहिली आहेत.
ललितलेखनचा वास्तवाशी वास्तवाच्या कुठल्या घटनेशी संबंध असेलच असे नाही. ललितात त्या अर्थाने कल्पनेच्या पाट्या टाकता येतील.

चिनूक्सचं टोपणनाव 'जाणकार' हे ठरुनच गेलं आता Happy
छान चर्चा चाललीय. रैना, पुन्हा एकदा मस्त पोस्टींची मेजवानी दिलीस.

निम्बुडा, ते मान्य, अन त्या पाल्हाळाबद्दल आक्षेपही नाही! Happy
रैना, तू बीए-एमए वगैरे केलहेस का? भारीच अभ्यास हे तुझा!

(इथे जाणकार कुणाला समजाव याचे बन्धन नाही, पण हा शब्द मायबोलीवर रुजवण्याचे काम मात्र अस्मादिकान्नी केल आहे)

आगाऊ, चिनूक्स आणि जाणकार्स- प्लीज इथे सांगा.
मी फक्त मला समजलय ते लिहीलं आहे, पण साहित्याच्या अभ्यासकांची व्याख्येची वाट पहाते आहे. Happy

अरेरे लघूकथा म्हणु नका, नायतर नेमाड्यांच्या लेखी ते साहित्य नाही (नुसत्या उपसाहित्याच्या गमजा), तसेही ते मौज प्रकाशीत म्हणजे नेमाडे उचकतीलच. Proud
शांताबाईंनी डोहच्या प्रस्तावनेत ललित म्हणलय ना बहुतेक? मराठी ललितास वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असे काहीतरी?

नेमाडे बाकी टोटल प्राध्यापक- वास्तवाला धरुन लिहिण्यासंबंधीचे परिच्छेद अक्षरशः टेरिफिक.

मला या सर्व विद्वानांच्या वर्गीकरणाच्या भांडणातून समजलेले एकच तत्व (माबुदोस) :
अस्सल साहित्य आणि प्रतिभा वर्गीकरणांची (आणि व्याकरणाचीही) मोहताज नाही.

बरं इकडे अजुन लोकांनी हेट मेल्स पाठवल्या नाहित म्हणुन लिहायचं धाडस करते आहे.
मला वाटतं मराठीत(च) ललिताचे एवढे स्तोम माजण्याचे कारण म्हणजे तिथे ठोस भुमिका घ्यावी लागत नाही. रंजन हाच हेतु असतो. फार खोलात जाऊन काही पाहण्याचे कारण नसते. वाचणारा आणि लिहीणारा दोघांची साहित्यसेवेची माफक अपेक्षा असते.

साजिरा | 19 May, 2010 - 04:32
स्फुट प्रकारात एखाद्या शास्त्रीय शोधाबद्दल माहिती, सरकारच्या एखाद्या निर्णयामागची कारणमीमांसा पासून ते एखाद्या प्रसंगावरचं भाष्य आणि एखादा अनुभव असं काहीही येऊ शकतं; बाकी साहित्यिक मुल्य आणि भाषासौंदर्य याशी फारसा संबंध नाही असं मला वाटत होतं.

अरभाट | 19 May, 2010 - 04:46
ललितलेखनाला थोडी चिंतनाची, संशोधनाची डूब असेल तर वर जाते. दाखवलेल्या गोष्टींवर बोलून न दाखवलेल्या गोष्टींवर विचार करायला भाग पाडणारे लेखन सशक्त म्हणावे का? थोडं तरी पल्याड (transcendence) जाता आले पाहिजे. त्यामुळे दुर्गाबाई, इरावतीबाईंचे ललितलेखन मला फार आवडते. कथा-कादंबरी-कविता यांच्यामुळे आपण समृद्ध होतो आणि ललित-स्फुटे यांच्याद्वारे आपली समृद्धी (वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक इ.) जोखता येते. फिनिशिंग टच?

चिनूक्स19 May, 2010 - 04:29
मागे, म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी, मी एक दीर्घलेख वाचला होता. त्यात मराठीतल्या ललितलेखनाचा आढावा घेतला होता. ना. सी. फडक्यांपासून ते अरुणा ढेर्‍यांपर्यंत लेखक त्यात होते. फडक्यांवर बरीच टीका केली होती. त्यांनी परकीय कल्पना कशा चोरल्या, याची वर्णनं होती. म्हणजे मुळात फडक्यांनी लघुनिबंध मराठीत आणले (अनेक निबंध भाषांतरीत करून स्वतःच्या नावावर खपवलेही) आणि तो फॉर्म पुढे 'ललित' म्हणून ओळखला जाऊ लागला. 'ललित' हा शब्द काणेकरांनी कसा रुळवला, हे त्या लेखात बर्‍याच विस्ताराने आलं होतं.
आता नेमकं काहीच आठवत नाहीये.

ललित लेखनाबद्दल माझी स्वतःची अशी खास समजुत आहे!
जे कोणतेही लेखन, वाचकास त्याच्या वर्तमानकालिक भौतिक व मानसिक परिस्थिती विसरायला लावुन लेखनातल्या परिस्थितीत तत्काल सामावुन घेते (वाचक त्या परिस्थितीशी तादात्म्य पावतो) ते ते सर्व लेखन ललित लेखन म्हणता येईल! Happy
अधिक विचार करता अगदी वृत्तपत्रीय बातमी देखिल कशा प्रकारे दिली यावर ती केवळ बातमी रहाणार की ललितात मोडणार हे ठरू शकते. बातमी चा उल्लेख अशासाठी केला की ठराविक प्रकारच्या बातम्या उत्साहाने वाचल्या जातात तर बाकी बर्‍याच नजरेआड केल्या जातात.
साप्ताहिक भविष्य लेखन देखिल या अर्थी ललितात मोडू शकेल.

मला आवडलेली ललित लेखांची ही आणखी पुस्तके :पावसाआधीचा पाऊस -शांताबाई.
काही आंबट काही गोड -शकुंतला परांजपे- हे जास्त स्मरणरंजनपर आहे, पण काही लेख वैचारिक आहेत(पण जड नाहीत).

पांढरे केस हिरवी मने - वि.द्.घाट्यांचे -लघुनिबंध होते की व्यक्तिचित्रे ते आठवत नाही.

बर्‍याच दिवसापासून ललित, लघुनिबंध आणि स्फुट यामधला फरक काय हा प्रश्न होता.
धन्स रैना आणि चिनुक्स ! Happy

माहितीपूर्ण धागा Happy ललित गद्य म्हणजे नक्की काय? याच्या शोधात होतो इथे माहिती मिळाली. सुरवातीचे काही प्रतिसाद आणि धाग्यातला "लाजून पादणे"चा संदर्भ हहपुवा Rofl

स्फुट म्हणजे संपदनकाव्यं. हा शब्द कवी / गीतकार सुधीर मोघेंनी योजला होता असे डॉ. राहुल देशपांडे यांनी सांगितले. ते पद्य असणे आवश्यक नाही. कवितेप्रमाणेच भाव भावनांच्या स्पंदनांचा अविष्कार स्फुटात येतो. काही वेळा त्याला छोटेखानी ललित असे म्हणता येते. हे दोन्ही प्रकार आत्मलक्षी असतात शक्यतो.
जेव्हां याच प्रकारे याच शैलीत परंतु अभ्यासपूर्ण अथवा माहिती देणारे ललित असते तेव्हां त्यास निबंध म्हणतात. उदा. किल्ल्याची माहिती वगैरे.. पण किल्ल्यामुळे मनात आलेल्या भावना आणि त्याचे आपल्या आयुष्यातल्या घटनांशी काही साधर्म्य वगैरे व्यक्त करायचे असल्यास ते ललित.

Pages