ललित गद्य म्हणजे काय ?

Submitted by विक्षिप्त on 17 May, 2010 - 12:54

ललित गद्य म्हणजे काय ? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? कुणी सांगेल काय ?

गुलमोहर: 

????????
कोणीच नाही ??? Sad

का मी कुणाच्या ओळखीचा नाही म्हणुन मला मदत करणं गरजेचं नाही... Angry

मला नक्की माहित नाही, पण जे गद्य लेखन इतर गद्य प्रकार जसे कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, समीक्षा यात मोडत नाही त्याला ललित गद्य म्हणत असावेत. हे माझ्या डोक्यात तुमचा प्रश्न वाचल्यावरच आले.

तुम्ही सगळी मंडळी खुप अभ्यासु आहात आणि म्ला माहिती आहे की तुम्ही मला मदत करु शकता पण एक्मेकांना शिव्या द्यायला, भांडायला तुम्हाला जमतं, पण 'ललित गद्य म्हणजे काय' ह्या माझ्या प्रश्नावर काहिच रीप्लाय नाहीत. Sad

लाजुन पादणे अन ह्या भिकार कवितेवर ५६ प्रतिसाद देता आणि मला खरच मराठी साहित्याची माहिती हवी तर रीप्लाय जवळ्जवळ शुन्य.. Sad बहुतेक हा विषय गरमागरम नाही आणि भांडणाची खुमखुमी मिटवणारा नाही म्हणुन का Angry

काय बळंच चिडताय?? Uhoh
तुमच्यासारखेच बर्‍याच लोकांनाही ललित गद्य काय भानगड आहे माहीत नसेल. म्हणून कोणी सांगत नाहीये.

बादवे विक्षिप्त, तुम्ही एक काम करा ना......... जे काही लिहायचं आहे, ते ललित मध्ये टाकून द्या बिनधास्त! जर का ललित नसेल तर माबोकर टोमणे मारतीलच "काय हे! याला काय ललित म्हणायचं??" मग त्यांच्याकडूनच तुमच्या साहित्यप्रकारासाठी योग्य ती category सुचवली जाईल. मग आधीचं लिखाण delete करून नवं बनवा . हा.का.न.का.

बस्के आणि निंबुडाला अनुमोदन....
मलाही या प्रकारा बद्दल फारसं माहित नाही.............निंबुडा ने सुचविलेला उपाय करा

http://www.maayboli.com/hitguj/messages/75/126974.html?1182422233

http://en.wikipedia.org/wiki/Literature

ललित साहित्य म्हणजे एकप्रकारचे कुठल्याही विषयावरचे मुक्तचिंतन ज्यात भाषिक शैली महत्वाची ठरते. या साहित्यप्रकाराचा जीव (scope या अर्थाने) कवितेपेक्षा मोठा, भाषेचा वापर सौंदर्यपूर्ण असतो.

http://www.srijangatha.com/LalitNibandh-30Mar_2k10
साहित्य दर्पण के अनुसार जिस रचना के अंग-विन्यास में सुकुमारता हो, वह ललित है – “सुकुमारतयाङगानाम विन्यासो ललितं भवेत्

एखादा विषय,अनुभव यावर असलेले मुक्तचिंतन याला ललित गद्य म्हणता येईल. त्याचा फॉर्म आणि कंटेंट या दोन्हीवर कसलीही बंधने नाहीत. पण त्याला कथा-कादंबरीचे स्वरुप नसले पाहिजे
या क्षणी माबोवर 'ललित' या सदरात असलेले बरेच काही 'ललित गद्य' म्हणता येईल.
रच्याकने,तुम्ही फार लवकर मायबोली आणि मायबोलीकर याबद्द्ल मत बनवत आहात असे वाटते,थोडा धीर धरा.तुमचा तर नुसता प्रश्न होता, इथे कधिकधी चांगले लेख,कविता दिवसेंदिवस अस्पर्श राहू शकतात.
तळटीप- 'लाजून पादणे अन' सारखे लिखाण म्हणजे नक्कीच 'ललित गद्य' नाही.कोण रे तो कवी हाणा त्याला Wink

अधिक माहिती साठी
- मर्ढेकर बा. सी- सौंदर्य आणि साहित्य
- An encyclopaedia of Marathi Literature - Edited by Sunita Deshpande on Google Books
- साहित्यातील अधोरेखीते- हातकणंगलेकर
- साहित्यातील आकृतीबंध- कोणाचे ते विसरले. राज्याध्यक्ष ?

मला वाटतं काणेकरांनी वगैरे ललितलेखनाची अशी एक परंपरा रुजवणे चालु केले. चु भु द्या. घ्या.
काणेकर, कुसुमावती देशपांडे, इरावतीबाई, दुर्गाबाई, फडके, खांडेकर,(आनंदीगोपाळवाले) जोश्यांपासुन विंदा/शांताबाई आणि बोरकरांपर्यंत ते आताआतापर्यंतच्या टिपीकल दवणे, पिंगेंपर्यंत ललितलेखांचा सुळसुळाट झाला मराठी भाषेत. प्राध्यापकांची, टीकाकारांची प्रतिभा (कथा, कादंबरी, कविता, नाटक सारख्या साहित्यप्रकारांना)अपुरी पडली पण ललिताच्या फॉर्म ने त्यांना तारलं असावं, इतकं की ललितलेखन वॉनॉबे साहित्यिकांचे आणि प्राध्यापकांचे राखीव कुरण बनलं. पूर्वीचे ललितनिबंध तसे ठाशीव वाटतात. ते साधारण विषयाभोवती रिंगण घालतात, म्हणुनच लघुनिबंधात त्यांचे बीज आढळते. अलिकडचे नुसते भाषेची वीण उलट सुलट घालतात. स्मृतीरंजनाच्या शिळ्या कढीला बरंका कोणाचे तरी काहीतरी वाक्याची फोडणी घालावी, चांगली संस्कारांची उकळी आणावी आणि वर गोडगोड शब्दांची कोंथींबीर भुरभुरावी- झाले ललित तयार Proud

मराठीतील सर्वोत्कुष्ट ललितलेखन ?? अ‍ॅड करा.
१) किमया- आचवल
२) डोह- श्री. वि. कुलकर्णी
३) काणेकर/फडक्यांचे निवडक
४) शांताबाईंचे काही
५) इरावतीबाई/दुर्गाबाई

इतकं की ललितलेखन वॉनॉबे साहित्यिकांचे आणि प्राध्यापकांचे राखीव कुरण बनलं.

रैना अनुमोदन
वॉन्नाबी बट कॅनॉट बी....
शाळेत आपल्याला सारांशलेखन असायचं. प्रवीण दवणेंच्या लेखाचा सारांश लिहायचा तर पान कोरे ठेवावे लागेल, पण गुण मात्र पैकी मिळतील, अगदी पेपर त्यांनी स्वतः तपासला तरी.
शिरीष पैंचा एक लेखसंग्रह वाचला होता.'आजचा दिवस'.खूप छान होता.
ललितलेखनाची अलीकडची दुसरी एक ओळख म्हणजे वर्तमानपत्रातून आलेल्या लेखांचा संग्रह. मग त्यांचे कालमूल्य तेवढेच राहते.

आपल्याला ललित लेखन् करायला सांगून विक्षिप्त काका कुठे गेले?

>आपल्याला ललित लेखन् करायला सांगून विक्षिप्त काका कुठे गेले? <
"आपण यांना पाहिलंत का?" मध्ये त्यांची माहिती द्या :

तशी तर माझी "स्वगते" देखिल ललित लेखनातच मोडतात बर का भाऊ! Proud
तरी माझी ललिताची व्याख्या काय ते सान्गतो....
समजा तुम्ही तुळशीबागेच्या समोरुन जाताना तिथुन मोगर्‍याचा गजरा घेतलात, अन घरी गेल्यावर तो बायकोस/प्रेयसिस मोठ्या प्रेमाने दिलात. तर "तुळशीबागेत तिन रुपयान्चा मोगर्‍याचा गजरा घेऊन तिला दिला" हे झाले नुस्ते गद्य (किन्वा फारफारतर निबन्धातील एक वाक्य! Biggrin )

याचे "ललित गद्य" करायचे झाल्यास, तुळशीबाग, तिथले वर्णन, तिथे उपस्थित असण्याचे कारण, फुलान्च्या घमघमाटाचे वर्णन, समोरील गजरे बघितल्यावर झालेली तिची आठवण, मग खिशातली टन्चाई विसरुन घेतलेला गजरा, तो देखिल सराईतपणे किन्वा पहिलटकराप्रमाणे घेतला त्याचेही वर्णन, विक्रेता/ती चे वर्णन, मग घरी पोचणे, तिने दार उघडणे (वा ती बागेत भेटणे) मग इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर ज्या कोणत्या पद्धतीने तिला गजरा दिला असेल वा डोक्यात माळला असेल, त्याचे वर्णन, हातात दिल्यास हाताच्या वा माळला असल्यास केसान्च्या निसुटत्या स्पर्षाचे वर्णन वगैरे वगैरे लाम्बण लावली की झाले ललित गद्य! हाय काय अन नाय काय!
त्यातुन तुमचे लन्ग झालेले नसल्यास, वा प्रेयसी नसल्यास, वा आयुष्यात एकदाही फूल्/गजरा असे विकत घेतलेले नसूनही जर तुम्ही वरिल प्रकारे सर्व लिहू शकलात तर तुम्ही "श्रेष्ठ ललितलेखक"
आता कळ्ळ? मग करा सुरु गृहपाठ..... गजरे माळण्याचा नाही, लेखनाचा! Proud

(याच प्रकारे याच धर्ती दलितलेखनाबद्दल पण सान्गता येईल... पण तो या बीबीचा विषय नाही, तुर्तास इतकेच पुरे!)

विक्षिप्त (नाव सार्थ केलंत!), 18:54 ला पोस्ट केल्यावर लगेच 19:33 ला प्रतिसादाची अपेक्षा! केवळ ३९ मिनिटात!! इथे तुमचं शंकानिरसन करायलाच बसले आहेत सगळे...
... आता रैना आणि आगाउच उत्तर येउन तीन तास झाले तरी त्याची acknowledgment नाही! काय हे!!
... जाउदे...

येस्स, एलकुंचवारांचे 'मौनराग' तर कुठल्याही होतकरु ललित लेखकासाठी 'मस्ट रीड' आहे.त्यात शेवटी त्यांचा ललित लेखनावरच एक लेख आहे तो तर निव्वळ अप्रतिम.
रैना, प्रचंड अनुमोदन. Happy

<<<त्यातुन तुमचे लन्ग झालेले नसल्यास, वा प्रेयसी नसल्यास, वा आयुष्यात एकदाही फूल्/गजरा असे विकत घेतलेले नसूनही जर तुम्ही वरिल प्रकारे सर्व लिहू शकलात तर तुम्ही "श्रेष्ठ ललितलेखक">>>
हे एकदम बरोबर लिंब्याभाव Lol

यादीत इंदिराबाई संतांचं पण नाव हवं. (मृद्गंध)
शांताबाईंचं 'मदरंगी'.
पद्मजा फाटकांचं एक अप्रतिम पुस्तक आहे. नाव आठवून सांगतो.

रन्गासेठ, शाळेत दिलेल्या मुद्यान्वरुन प्रसन्ग रन्गवित निबन्ध लिहायला सान्गायचे आमच्या काळी तो एकप्रकारचा "ललितलेखनाचा" श्रीगणेशाच होता, अस माझ मत Happy
अन सिद्धहस्त लेखक, वर दिलेल्या मुद्यातुन दिवाळी अन्काकरता दोनचार कथा, एकदोन कादम्बर्‍या सहज पाडू शकतील, गेलाबाजार वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीकरता तर नक्कीच कॉलम्स भरतील! Proud

विक्षिप्त काकांच ज्ञान वाढलं का नाय... माहित नाही.. पण आमचं भरपूर वाढलं.. काय काय छान छान वाचायच राहिलय अजून.. धन्स आगाऊ,चिनुक्स ,रैना,भरत..लिंबु Lol

रैना मस्त पोस्ट. तरीही बरेच प्रश्न पडल्येत डोक्यात. नीट मांडता आले की मांडते म्हणजे त्यावर पण उत्तर मिळतील Happy

Pages