फ्रेंच ओपन टेनीस - २०१०

Submitted by Adm on 15 May, 2010 - 17:31

फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धा पुढच्या सोमवार पासून म्हणजे २४ मे पासून सुरु होत आहे. हा धागा यंदाच्या फ्रेंच टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
यंदाच्या स्पर्धेवर खेळाडूंच्या दुखापतीचं सावट आहे. आत्तापर्यंत किम क्लायज्टर्स, सानिया मिर्झा, राडावांस्का ह्या माहिला खेळाडूंनी तर निकोलाय डेव्हिडेंको, डेल पोर्टो, जेम्स ब्लेक, टॉमी हास ह्या पुरुष खेळाडूंनी माघार घेतली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो..बलुचीने पूर्ण मॅचमध्ये ५ ते ६ वेळा राफाची सर्व्हिस ब्रेक केली पण स्वतःची सर्व्हिस नीट राखू न शकल्याने त्याला तीन सेटमध्येच पराभव पत्करावा लागला.. पण त्याने काही काही पॉईंटस मस्त मिळवले..

आता राफा आणि अल्माग्रोमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीची लढत... अल्माग्रो चांगला खेळतोय.. राफाला बर्‍यापैकी लढत देईल असे वाटतेय..

आज फेडी आणि सोडर्लिंग यांच्यातली मॅच आहे.. सोडर्लिंगचा फॉर्म पहाता मॅच बघायला मजा येईल..

फेडरर आणि सेरेना यांच्या समोर सगळे खेळाडू लटपटतात, तिथे राफा, नोव्हाक, जस्टिन हेच पाहिजेत. येलेना सर्बियाची आणि रशियाची, समंथा या सेरेन समोर टिकणार का? सोडर्लिंग गेल्यावर्षीपेक्षा जास्त चांगला खेळतोय, की त्याला आतापर्यंत ड्रॉ सोपा मिळाला?

सोडर्लिंग गेल्यावर्षीपेक्षा जास्त चांगला खेळतोय, की त्याला आतापर्यंत ड्रॉ सोपा मिळाला?...>>> मागच्या वर्षी त्याला चौथ्या फेरीतच राफा होता.. त्यामानाने यावर्षीचा ड्रॉ सोपाच म्हणायला हवा ना :)..
त्याने आत्ता चौथ्या फेरीत मरिन चिलिचसारख्या चिवट खेळाडुला सरळ तीन सेटमध्ये हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केलाय.. म्हणजे त्याचा फॉर्म चांगलाच असणार ना..

चौथ्या राऊंडपासून पहायला सुरुवात केलेली आहे.

मरे हरला. सोडर्लिंग चांगला खेळतोय वाटतं. फेडरर आणि त्याची मॅच चांगली होईल असं वाटतंय.

ESPN 360 वर पण आहे ना लाईव्ह ?

मघाशी वोझनियाकी हरली.. Sad ती दुसरी बाई कोण आहे ? १७ वी सिडेड आहे म्हणे..

फेडी हरला :(.. हरकत नाही... दोनच आठवड्यांवर विंबल्डन ..तेव्हा तो पुन्हा सज्ज होईलच... Happy फक्त फेडी -नदाल फायनल पहायचं स्वप्न परत एकदा अपूर्ण राहिलं.. Sad

सोडर्लिंग जबरदस्त खेळला.. त्याच्या काही सर्व्हिसेस तर तुफान होत्या... त्याने हाच फॉर्म जर कायम ठेवला तर फायनमध्येही तो धुमाकुळ घालेल..

राफा जर ही स्पर्धा जिंकला आता तर तो जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी येईल...

मयुरेश.. माद्रिद जिंकून तो ऑलरेडी आला ना ?? पण फ्रेंच स्पर्धेची मानांकनं माद्रिदचे निकाल अपडेट व्ह्यायच्या आधीच आली होती म्हणून राफाला दुसरे मानांकन मिळाले.. असं मला बातम्यांमधे ऐकल्यासारखं वाटतय.. कन्फर्म करतो..

ह्या स्पर्धांची मानांकनं तसं पण जागतिक रँकिंगप्रमाणे नसतात ना. वर्षभरातली आणि करंट सीझनमधली क्ले वरची (किंवा ग्रासवरची) कामगिरी बघून ठरवतात. काही गुण अर्थातच गेल्या वर्षीच्या स्पर्धेतल्या कामगिरीला असतात.

काही गुण अर्थातच गेल्या वर्षीच्या स्पर्धेतल्या कामगिरीला असतात. >>>> हे फक्त विंबल्डन मधे असतं असं मला वाटतय.. अर्थात हे ही कन्फर्म करावं लागेल..

हरला का फेडी.. अरेरे.
सोड्याने जेव्हा चिलीचला सरळ सेटमध्ये ६-२ ६-३ असं किरकोळीत हरवलं तेव्हाच वाटलं होतं की तो चांगला खेळतोय. नदाल जिंकेल ह्यावेळी असं दिसतंय. पण तरी फ्रेंच ओपनचं काही सांगता येत नाही. नेहमी चित्रविचित्र निकाल असतात ह्या स्पर्धेचे (परागची आवडती इव्हा मायोली आठवा Happy )

मिल्याला शिक्षा म्हणून आता दोन आठवडे त्याच्या गजला आणि कविता वाचू नका रे.. Proud

मिल्याला शिक्षा म्हणून आता दोन आठवडे त्याच्या गजला आणि कविता वाचू नका रे >>> त्यापेक्षा त्याला फक्त इतरांच्या गझला आणि कविता वाचायची शिक्षा द्या Proud

रँकिन्ग्मध्ये राफा अजून पहिला आला नाही, फेडी त्यातही सॅम्प्रसच्या विक्रमाच्या जवळ जात आहे असं काल ऐकलं. सीडींग आणि रँकिन्ग वेगळ्या गोष्टी आहेत. स्पर्धेचे सीडींग बाकी गोष्टींबरोबरच स्पर्धेत इतर कोण खेळत आहेत यावरही ठरत असेल.

पराग,मगाशी मॅच चालु असताना कॉमेंट्रेटर सांगत होता की जर फेडरर ही मॅच हरला आणि राफा ही स्पर्धा जिंकला तर तो जागतीक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी जाईल.. ७ का ८ जूनला ही क्रमवारी जाहीर होणार आहे...

फ्रेंच ओपनचे प्रेक्षक किती पक्षपाती. सोडर्लिंग एकट्या फेडररशी नाही, तर अख्ख्या स्टेडियमशी खेळत होता. किती टर उडवली त्याची, त्याने बॉल पडल्याच्या जागा पाहिल्या तेव्हा. फेडरर आपण जराही विचलित झालो नाही असे दाखवत होता...अगदी चौथ्या सेटमधे पण. जेवढे जास्त खेळाडू टॉप खेळाडूला हरवायच्या क्षमतेचे येतील, तेवढी खेळाची रंगत वाढेल.
सोडर्लिंगने पिचले साल का बदला लिया, अब राफा की बारी.
बर्डिच धुमकेतूसारखा आलाय अगदी,आणि नोव्हाक कडे कुणाचे लक्षही नाहीए.

सिंडी, फचिन Lol

मिल्याला शिक्षा म्हणून आता दोन आठवडे त्याच्या गजला आणि कविता वाचू नका रे >>>
अरे फचिन आधीच माझ्या गझला फार जण वाचत नाहीत त्यात आणि शिक्षा कशाला? ***      ***

>>> त्यापेक्षा त्याला फक्त इतरांच्या गझला आणि कविता वाचायची शिक्षा द्या >>> ही शिक्षा मी आपण्हून अधून्मधून भोगत असतोच की Proud

Pages