Submitted by अरुण मनोहर on 14 May, 2010 - 21:38
ती चिडली तेव्हा भीषण, भांड्यांचा निनाद होता
वेगात फ़िरवले लाटणे, तो नवरा चुकवित होता
तरी घावही त्याच्या भाळी, येऊन थबकले होते
टरटरून जणु फुगलेला, फ़ुग्गा मग दिसला होता
ती बाई होती म्हणुनी, घळघळुनी उलटी रडली
त्या वेळी गप्प बसोनी, तो टेंगुळ दाबित होता
अन क्षणात गमले त्याला, संपली जेवणे त्याची
पोळीवर धुरकट जेव्हा, आंबील घास तो घेता
हे अन्न असे चिवडुनी , तो मुळी बिथरला नाही
खपलीत टेंगुळाच्याही, स्वातंत्र्य चौघडा होता
गुलमोहर:
शेअर करा
<अन क्षणात गमले त्याला, संपली
<अन क्षणात गमले त्याला, संपली जेवणे त्याची>
जबर्या...
<आई होती म्हणुनी> --> <बाई होती म्हणुनी> यमक के नाम पे ~~~
(No subject)