मातृदिन : माझ्या आईनी काढलेल्या रांगोळ्या

Submitted by दीपांजली on 10 May, 2010 - 03:30

रांगोळी ची कला आईकडे बहुदा तिच्या अई कडून आली असावी.
आज्जी म्हणे देवांची चित्रं किंवा अवघड डिझाइन्स फार सुंदर काढायची !
तशीच माझ्या आईची नाजुक डिझाइन्स आणि डिटेलिंग ही खासियत पण अता पूर्वी सारख्या मोठ्या रांगोळ्या काढणं आईला गुडघेदुखीमुळे जमत नाही !
आम्ही लहान असतानाच्या आईच्या रांगोळ्या बेस्ट होत्या !
पारंपारीक ठिपक्यांच्या रांगोळ्या आईनी कधीच नाही काढल्या, आईला नाजुक नक्षी, कोयरी, सरस्वती,मोर, राजनर्तिका, राजस्थानी मिनिएचर स्टाइल सजलेल्या स्त्रियांच्या रांगोळ्या , निरनिराळे पक्षी, समई,अशी फ्री हँड डिझाइन्स किंवा गालिचे काढायला आवडायचे.
आईच्या रांगोळ्यांच्या लाइन वर्क मस्तं असत, पूर्वी रंग न भरताच केवळ पांढर्‍या रांगोळीनी काढलेल्या नक्षीदार रांगोळ्या आई जास्त काढायची, त्या रंगीत रांगोळ्याम पेक्षाही जास्त छान वाटायच्या !
तेंव्हाच्या रांगोळ्यांचे फोटोज नाहीत याची फार चिडचिड होते !
हे अत्ता अत्ता चे फोटो, आईच्या पूर्वीच्या रांगोळ्यांच्या मानाने हे खूप च सिंपल Happy
तरी मदर्स डे निमित्त काही फोटो टाकतेय.

.mb1.jpgmb5.jpgmb8.jpgmb7.jpgmb9.jpgmb92_0.jpgmb95.jpg

गुलमोहर: 

मस्त आहेत सगळ्या. रंगसंगतीही छान आहे. सगळ्यांना पांढर्‍या रांगोळीने बॉरडर केली आहे, त्यामुळे फारच उठाव आलाय, अन हे काम फारच कौशल्याचे ! मस्त !

तोरण रांगोळी तर झक्कास... सर्वात शेवटचीचीपण रंगसंगती अप्रतिम! आधीच्या काही वर वर्णन केलेल्या असतील तर टाका ना इथे.. दिवाळी वा पाडव्याला वगैरे ट्राय करता येतील...