..... आठवण आईची....

Submitted by उमा सप्रे on 9 May, 2010 - 01:52

जिच्या ठायी पंचमहाभूते वसली | म्हणूनी सारी बाळे तिच्या उदरी जन्मली ||
त्या बाळासी ती होते नित्य सावली | आशा सद्गुणांची ती असे एकमेव माउली ||

तुला आठवताच नयनी दाटतात आश्रू| माझ्यासाठी तुच सर्वस्व होती माता-पिता-गुरू ||
तुझ्या इच्छा तुझी स्वप्ने आम्ही साकरू| तुझ्या आशीर्वादाने कीर्ती,यशाची गुढी उभारू ||

|| मातृदेवो भव ||

गुलमोहर: