माझ्या वैयक्तिक खाडाखोडीपैकी वेगळीच गझल आधी चुकून इथे कॉपी पेस्ट झाली होती.
अभिप्रेत गझल देत आहे. ही गझल मी व अजय जोशी आयोजीत करत असलेल्या गझल सहयोगच्या मुशायर्यात फेब्रुवारी महिन्यात सादर केली होती.
-------------------------------------------------------------------------------
पालखीत पादुका, जिवंत लोक चालतात, हाल हाल पाहुनी कमाल वाटते
पांडुरंग, माउली, तुका मिळून एकजात नाद लावतात यात चाल वाटते
आमचा गुलाल लाल हिंदवी रुपातला, तुझा गुलाल वेगळाच पाकधार्जिणा
फक्त दंगलीत मात्र आमच्याकडील वा तुझ्याकडील रक्त लाल लाल वाटते
आजवर पुण्यात शांतताच नांदली, जगात आमचे शहर कुणास माहिती नसे
स्फोट जाहला, अनेक लोक संपले, अता पुण्यात राहणे कसे विशाल वाटते
राजकारण्या पहा विशाल जाहिरात ही तुझाच वाढदिवस साजरा करायला
गोष्ट वेगळी म्हणा, तुझ्यामुळेच वाहतूक तुंबते, शहर अती बकाल वाटते
कोंडदेव की जिजाउ, रामदास की तुका, अशावरून आज रक्त सांडतो अम्ही
बायका धुणी धुतात, पोरटी जुगार खेळतात, हे अम्हास बेमिसाल वाटते
एक बुद्ध जाहला नि एक भीम जाहला, पुन्हा न आमच्यात जाहले कुणी तसे
वारसे म्हणून मागुनी मते जगाकडे निवडणुकीत लागला निकाल वाटते
मुंज लागताच तो बटू जरा सुधारतो, धरून जानवे हळूच पेग लावतो
बाप सांगतो मुलास 'चोख तंगडी', मधेच बायको म्हणे 'अहो हलाल वाटते'
'बेफिकीर'ला सभागृहात बोलवायचे असेल तर विचार कर, विचार कर जरा
एक एक शेर मुखवट्यास फाडतो, ज्वलंत ओळ ओळ पेटती मशाल वाटते
-'बेफिकीर'!
आमचा गुलाल लाल हिंदवी
आमचा गुलाल लाल हिंदवी रुपातला, तुझा गुलाल वेगळाच पाकधार्जिणा
फक्त दंगलीत मात्र आमच्याकडील वा तुझ्याकडील रक्त लाल लाल वाटते
हे शब्द भिडले एक्दम!!!! मस्त मस्त मस्त!!!
ब-याचदा प्रत्यक्ष ऐकण्याचा
ब-याचदा प्रत्यक्ष ऐकण्याचा योग जुळून आलाय ही गझल.....प्रत्येकवेळी वाचताना त्याचाच पुन: प्रत्यय येतो
धन्यवाद !
अहाहा! क्या बात है!!
अहाहा! क्या बात है!!
Pages