एक समर्पित कार्यकर्ता व त्याची आश्रमशाळा

Submitted by नितीनचंद्र on 3 May, 2010 - 02:37

भारतीय राजघटनेत शालेय शिक्षण हा मुलभुत अधिकार मानला गेला आहे. आपल्याला अस वाटत की शिक्षण खात आहे. सरकारी योजने मध्ये पैसा खर्च होतो म्हणजे सगळ चांगल चालल आहे. प्रत्यक्ष वास्तव काय आहे हे जाणुन देण्यासाठी तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने समर्पित कार्यकत्यांना काय अडचणीला तोंड द्यावे लागते यासाठी सोबतची माहिती पाठवत आहे.
२०१४ पर्यत या शाळेला शासकिय अनुदान मिळणार नाही अशी परिस्थीती आहे. शाळा चालु ठेवण्याचा निर्धार आहे हेच काय ते बळ.

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची ही कथा. अन्य राज्यात काय परिस्थीती असावी याची कल्पना न केलेली बरी.

सोबातची माहिती वाचल्यानंतर आपल्यापैकी कुणाला भेट द्यावी किंवा देणगी द्यावी असे वाटल्यास पता.

श्री. अशोक चोरमले.
मुक्काम करोडी, ता. पाथर्डी.
जिल्हा : अ'नगर पिन कोड : ४१४१०२

आपणास याबाबत अन्य माहिती हवी असल्यास श्री. अशोक चोरमले यांचा दुरध्वनी क्रमांक : ०९४२३३९००५५

आपला चेक अथवा ड्राफ्ट खालील नावाने पाठवावा
" भारतमाता जनसेवा प्रतिष्ठान, करोडी "

श्री. अशोक चोरमले. हे माझे मित्र आहेत. यांनी स्वतः वार लाऊन पदवीपर्यत शिक्षण घेतले आहे. आजच्या त्यांच्या भेटीत त्यांनी ही तळमळ व्यक्त केल्याने व त्यांना इमेल हे प्रभावी माध्यमाचा परिचय असला तरी अनुभव नसल्याने त्यांचे मनोगत आपल्या पर्यत पोचवतो आहे.
नितीन जोगळेकर.

त्यांनी मला दिलेले कागद्पत्र जसेच्या तसे पोचवेत म्हणुन स्कॅन केले आहेत.
Bharatmod1.1.JPGBharatmata2.2.JPGBharatmata3.JPG

खाली आर्थिक वर्ष २०१०-२०११ चे अंदाज पत्रक दिले आहे. यावरुन आपल्याला अंदाज येईल की कोणतीही उधळपट्टी न करता सदर शाळा चालवण्याचा खर्च किती माफक आहे.

श्री. अशोक चोरमले यांना असे आश्रयदाते हवे आहेत जो हा भार काही प्रमाणात उचलु शकतील व जेणे करुन हा उपक्रम चालु ठेवता येईल.

Bharatmata 4.1.JPG

Taxonomy upgrade extras: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

नितीनचिंचवड , मान्य आहे तुमचे मित्र प्रयत्न करत आहेत , पण जे ओझं पेलवण्चं शक्य नाही ते उचलुन स्वतःचही नुकसान करुन घेत आहेत आणि विद्यार्थ्यांचं पण नुकसान .
३ शिक्षक ३ वर्गांना कुठले कुठले विषय शिकवु शकतात ? १२०० रुपयांच्या प्रयोगशाळा साहित्यात ८ वी , ९ वी , १० वी चे किती प्रयोग करणं शक्य आहे ? उधळपट्टी सोडुन द्या , जे हवयं ते सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवता येत नसेल तर विद्यार्थ्यांच नुकसान करण्यात काय अर्थ आहे.

श्री अस का म्हणताय? तुटपुंज असल तरिहि शिक्षण तर आहे. ही शाळा बंद झालि तर त्या विद्यार्थ्यांच शिक्षण हि पुर्णपणे बंद होइल. सुर्य नाहि म्हणुन सगळा अंधार असण्यापेक्षा पणतिचा उजेड केंव्हाहि चांगला अस मला वाटत. तुमचा मुद्दा खोडुन काढायचा म्हणुन नाहि पण मला अस प्रामाणिक पणे वाटत कि ८,९,१० च्या अभ्यासक्रमात (अ‍ॅटलिस्ट मी जेंव्हा शिकले तेन्व्हा) विज्ञानाच्या अभ्यासक्रमात एकुण वेळेच्या ९८% थिअरिवर आणि २% प्रयोगशाळेत अशि विभागणि होति. बॉयलॉजि च्या अभ्यास्क्रमात तर पट्ट, गोल आणि कुठलेतरि कॄमि आणि बरेचसे किटक (फॉरमॅलिन मध्ये स्टोअर केलेले) बघणे (फक्त एकदा) आणि मग परिक्षेच्या वेळेस ओळखणे इतक केविलवाण अभ्यासाच स्वरुप होत. त्यामुळे प्रयोगशाळा नाहि म्हणुन ही मुल (इतर मुलांच्या तुलनेत) फार काहि गमावतात आहेत अस वाटत नाहि. अर्थात त्यांना सुसज्ज अशि प्रयोगशाळा मिळालि तर उत्तमच आणि ती मिळो अशि शुभेछ्छा!

@ नितिन,

ही माहिती आमच्या पर्यंत पोहचवलित त्याबद्दल मनासुन धन्यवाद! मी खात्रिने सांगु शकत नाहि पण येत्या देशवारित मी स्वतः शाळेला भेट देण्याचा नक्कि प्रयत्न करिन. तुम्हि हे लिखाण 'ध्यासपंथि पाउले' मध्ये हलवु शकाल का? म्हणजे इछछुकांना पुढेहि ते तिथे सापडेल.

रमा यांच्या मताशी सहमत... आम्ही ९ वी पर्यंत प्रयोग केले होते असे मला पण आठवत नाही... सर्व फळा, कागदावरच. १० वी मधे अगदी थोडेफार प्रयोग केले असतील (मायक्रोस्कोप खाली कांद्याची पात पहाणे...).

शाळा बंद पडली तर विद्यार्थ्यांकडे काय चांगले पर्याय उपलब्द आहेत? सर्व सुखसुविधांनी युक्त अशी आदर्श शाळा आणि वरिल शाळा यात जमीत-अस्मानाचा फरक आहे हे मान्य... पोटभर खायला मिळत नसेल आणि कुणी अर्धपोट भरण्याचा पर्याय देत असेल व त्या साठी कंबर कसत असेल तर प्रोत्साहन द्यायला काहीच हरकत नाही.

२५०० रु पगार शिक्षकाचा पगार - Sad

नितिन छान माहिती दिलीस. धन्यवाद!

माझाही शिकण्याच्या अनुभव रमेशी जुळतो आहे पण आमचे शिक्षक विषय खूप छान शिकवायचे.

नितीन, लेखनिक आणि स्वयंपाकी यांच्या वार्षीक पगाराची रक्कम चुकिची आहे तिथे. १२ गुणिले १८०० = २१६०० होतात.

बाकी रमा आणि उदयशी सहमत. अगदी काहिही शिक्षण न मिळण्यापेक्षा जे आहे ते खुपच चांगले आहे नक्कीच.

उदय, अरे यांच्याकडे पैसे नाहित म्हणुन २५०० देताहेत. हे निदान मान्य तरी करु शकतो आपण.

मी जेव्हा एम.एस्सी. झाल्यावर लेक्चररशिप शोधत होते भारतात तेव्हा मला मोठ्या मोठ्या नॉन ग्रँटेड कॉलेजमधे १०००-१२०० पगार सांगितले होते. आणि माझ्याबरोबरच्या अनेकांनी केले देखील असे जॉब.

शहरातली शिक्षणावरचा खर्च आणि खेड्यातला यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा प्रत्येक शिक्षक शेतकरी असतो. त्याला फार कमी गोष्टी विकत घ्याव्या लागतात. त्यामुळे आपल्यादृष्टीने जरी रु.२५००/- कमी असले तरी शिक्षक या वेतनावर जगु शकतो.

श्री. आपल म्हणण शतःशहा मान्य पण ही शाळा आपण मायबोलीकरांनी उचलली तर काय अशक्य आहे ? सरकारी अनुदानाशिवाय माझे मित्र ही शाळा चालवण्याचा प्रयत्न ? छे धाडसच म्हणावे लागेल.पुढील तीन वर्षे अनुदान मिळेपर्यत शहरातील एका व्यक्तीने एक दिवस दत्तक घ्यावा ज्याची व्यवहारीक किंमत रुपये २०००/- फक्त आहे. ज्यात एका दिवसाचा सर्व खर्च अपेक्षीत आहे येव्हडीच अशोकरावांची अपेक्षा आहे.

मी हे केले आहे हे सांगण्याचा उद्देश फक्त येव्हढाच आहे की अन्यथा मी हे सांगु शकत नाही.

शहरातल्या मान्यताप्राप्त खाजगी शाळा, त्याच शहरातल्या महानगरपालिकांच्या/नगरपालिकांच्या शाळा आणि खेडे गावतल्या विना अनुदान शाळा यात फरक रहाणारच ( असे असु नये वाटत असलेतरी )

करोडी गावच्या आसपास भटक्या कुटुंबांची संख्या पहा म्हणजे लक्षात येईल की ही कुटुंबे शिक्षणा अभावी पिढ्यान पिढ्या उस तोडणी मजुर रहातील.

आपल्या प्रतिसादाकरिता धन्यवाद.

आत्ताच अशोक चोरमलेंशी बोलणे झाले. शाळेला शासनाचे अनुदान मिळाल्यावर शिक्षकांना पहिले तीन वर्षे येव्हडेच मानधन शासनाकडुन मिळते असे त्यांनी सांगीतले. थोडक्यात हा रेट शासनमान्य आहे.

आजच वाचनात आले, महाराष्ट्र सरकारने मोफत शिक्षणचा कायदा १ एप्रिल २०१० पासुन केलाय. शिक्षण मंत्र्यांनी अनेक गोष्टीची घोषणा केली मात्र विनाअनुदान शाळांबाबत मौन बाळगले आहे.

महाराष्ट्र सरकारने मोफत शिक्षणचा कायदा १ एप्रिल २०१० पासुन केलाय
--- सर्वांना मोफत शिक्षण मिळेल?

MSW झालेले कोणी आहे ओळखीचे आहे का? fund raise करण्यात त्यांची मदत होउ शकते. परदेशी /देशांतर्गत दात्यांकडुन निधी जमा करणे हे MSW झालेले लोक खुप व्यवस्थित करु शकतात.