पोमोसची प्रतिकृती

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

मी विविध देशातील नाणी व नोटांचा संग्रह करतो हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक वेगळे काही दिसले की माझ्यासाठी ठेवतात. इटलीत अन्नुचार्य ज्वालामुखीमुळे आठ दिवस अडकुन पडलेली सिमोना काल पॅसॅडेनाला परतली. येतांना टर्की व ग्रीस खाली असलेल्या एका छोट्या बेटावर पसरलेल्या सायप्रस नामक देशाचे एक दोन युरोचे नाणे (माझ्या वैयक्तिक जालावर नसल्याचे पाहुन) आणले.

pomosmap.jpg2_Euro_coin_Cy.gif

नाण्यावरील बाहुलिने लगेचच माझे लक्ष वेधुन घेतले. तो काहीतरी पुरातन प्रकार आहे हे स्वयंसिद्ध होते. त्याबद्दली माहिती लगेचच मिळाली. साधारण ५००० वर्षांपुर्विची पोमोस नामक गावात सापडलेली व त्यामुळे त्याच नावाने प्रसिद्ध अशी ती एक प्रजनन बाहुली आहे. भारतात प्राचीन काळी शिवलिंग, नंदी, कमंडलु, सिंह हि चिन्हे जशी वापरल्या जात त्याचप्रमाणे ही बाहुली वापरल्या जाई. दोन्ही हात पसरवलेली ही बाई जणु समभंग स्थितीत उभी आहे. गम्मत म्हणजे तिने गळ्यात स्वत:चीच प्रतिकृती घातली आहे. स्वत:लाच उध्रुत करण्याचा (self-reference) हा पहिलाच प्रसंग असावा का?

विषय: 
प्रकार: 

वा वा! मस्त माहिती! बाहुली आपल्याकडच्या बुजगावण्यासारखी दिसत आहे. आणि स्वतःच्या गळ्यात स्वतःचीच प्रतिकृती म्हणजे मजेशीरच! Happy

मी ज्या फर्म मधे काम करत होतो, त्यांचे मुख्यालय सायप्रसला होते. आम्ही तिथे तयार झालेले कागद वापरत असू.

(एका जेम्स बाँड पटात, तिथले चित्रण आहे. )

लिंबूने बूक, केलेय, पण काहि देशातील नाणी मी पण देऊ शकेन. भारतात आलो, कि संपर्क साधेन.

इष्टर बेटावर तयार झालेल्या, एका लाकडी बाहुलीसंदर्भात, बीबीसी चा उत्तम लघुपट आहे.