नेव्हर गिव्ह अप भाग - २

Submitted by आवळा on 26 April, 2010 - 02:09

भाग - १
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सतिशला प्लॅन पटला....
ठरल्याप्रमाणे.. मी सर्वात आधी प्रॅक्टिकल्सच्या रिडिंग काढुन मास्तरला दिल्या.. आणी
(सतिश ने आधीच वार्निंग बेल लावुन ठेवलेली.. नीट अभ्यास करुन घे.. तो सनकी काहीपण प्रश्न विचारेल... )
अगदी सगळे ठरल्याप्रमाणे होत होते.. मास्तर रिडिंग अ‍ॅक्युरेट आहे .. हे पाहुन जरा साशंकीत झाला..
पण अ‍ॅक्टींग मधे आपला हात कोण पकडणार.. "अ‍ॅटेक ईज द बेस्ट डिफेंस" .. तो काही विचारायच्या आत .. त्यालाच सगळी प्रोसेस सांगितली.. त्याचा चेहरा थोडा खुलला होता.. तो पण जरा खुष झाला..
आणी हानला की डायलॉग त्यानी.. मला जो पाहीजे होता तोच ...
Very well done kishor . Everyone see these readings are accurate.. and if you need any help kishor will help you Happy
च्या मारी हे काय.. माझा कंपु जरा हादरलाच .. एका जिवलग मित्राच्या लक्षात आलेच.. काहीतरी गौडबंगाल आहे

सगळे आश्चर्यचकीत होऊन माझ्याकडे पाहत होते.. शुर्पनखा सुध्दा .. पण मी तिच्या कडे लक्षच दिले नाही ..
चार पाच कामचुकार आणी टवळी मित्र मंडळ लगेच घेऊन गेले.. त्यांच्या रिडिंग वगैरे बघायला..

(जर मुंबईच्या मुलींशी मैत्री करायची असेल तर खालील पैकी एक गोष्ट तुमच्यात पाहीजेच पाहिजे..
१ -> अमाप पैसा आणी तो योग्य प्रकारे कंपुमधे ऊडवणे
२ -> अभ्यासात हुशार असणे
ही गोष्ट एव्हाना समजुन चुकली होती..
अर्थात १ला पर्याय मला applicable नव्हताच.. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे )

त्या चार पाच टुकार गँग मधे २ मुली . एक दिल्ली ची तर दुसरी गुज्जु... एकदम हाय फाय ..
त्यांचे कपडे सर्व ब्रँडेड होते.. आणी १-२ जणांकडे ४ व्हीलर .. त्या सगळ्यांशी ओळख झाली.. (प्लॅननी काम केले होते याची जाणीव झाली.. पण ही दुसरीच गँग होती.. )

रोजचे हाय हेल्लो सुरू झाले.. त्या पब्लिक बरोबर..

आणी तो दिवस आला.... त्या गँग ने लाँग ड्राईव चा प्लॅन केलेला..
मुंबई ते लोनावळा.. व्हाया खंडाळा.. मला ऑफर आली .." चल हिरो तेरे को भी जन्न्त की सैर कराते है "..
माझ्या डोळ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न पैसे किती लागनार..
त्यानी सांगितले कुछ नही बे २००० बहुत है... (माझ्या समोर तारेच ऊभे राहिले... आयला महिन्याभराचा खर्च आहे की हा तर आपला) .. त्याला सांगितले .. "नही यार नही होगा मेरेको.. अंकल के घर पे जाने का है, और २००० तो मेरे महिने का खर्चा है"
"२००० तो मेरे महिने का खर्चा है" ह्या लाईन ला तो असला हसत सुटला ... आणी फिदी फिदी हसत .. "अबे सुना क्या तुम लोगोने.. ये भाईसाहब बोल रहे है ईस्का पॉकेट मनी २००० है "
मला काहीच कळ्त नव्हते.. त्या हिऱो ने पॉकीट उघडले.. आणी ५०० च्या ५-६ करकरीत नोटा बाहेर काढ्ल्या .. आणी म्हणाला ईतना मुझे .. वीकली मिलता है..
आले लक्षात माझ्या "बडे बाप की औलाद है.. Happy " ...

ईछा खुप असताना मी गेलो नाही. त्या दिल्ली च्या मुलीने.. तरी म्हणालेली.. "वी विल मॅनेज.. यु डोण्ट पे" तरी पण मला तसे जायचे नव्हतेच.. मी थोडा हिरमुसुन म्हणालो .. "फिर कभी चलेंगे" ...
त्याच्या नेक्स्ट वीक मधे तो योग आला..

"अरे मेरेको ४ पासेस मिले है .. velocity --- couple entry free".. भयंकर खुष होउन तो सांगत होता.
"अबे ये क्या बक रहा है .... velocity क्या है.. कोई function है क्या?"

ह्या माझ्या निरागस प्रश्नावर सगळे लोळुन लोळुन हसत होते.. आणी एकच वाक्य "ईसको velocity नही पता" ...
तो एक ऊच्चभ्रु सोसायटी मधील लोकांना जास्त झालेले पैसे ऊडवायचे ठिकाण (DJ club) आहे.. हे माहीती कुणाला होते ..

माझा परत तोच प्रश्न .. " couple entry free है.. मतलब तुम ४ लोग तो आराम से जाओगे. २ लडकिया है.. लेकिन बाकी २ बंधे है उनका नही होगा... "

तिकडुन परत फिदि फिदि हसत ऊत्तर "तु बच्चा है रे.. तेरेको कुछ भी नही मालुम.. देख first टाइम है तेरा ईसिलीये बोल रहा हु... ऊधर जानेका.. बाहर लडकी लोग.. wait करता है .. free entry के लिये.. बिन्धास्त जाके किसिको पकडनेका Wink "
"मुझसे नही होगा. मै किसी भी अनजान लडकी से बात नही करता... तुम लोग ही जाओ.. "

ह्या वाक्यावर प्रचंड हास्यकल्लोळ ऊडाला..
तो: " अबे ये हिरो... तेरे गांव मे लडकिया नही है क्या..."
मी: "है ना.. लेकीन वहाँपे 4th standard के बाद.. लडके और लडकीया बात नही करते... "
तो: "क्या पका रहा है.. स्कुल/ कॉलेज मै? "
मी: " नही रे.. स्कुल मै भी नही... और कॉलेज मै भी नही .. सिर्फ भाई और बहिन(तुफान मराठी) है तो ही बात करते है "
तो: "कोनसी सडी हुयी जगह से आया है... अब तो सुधर जा.. देख अभी हमारे साथ रहेगा तो सब सिख जायेगा"
मी: " (च्या आयला ह्यच्या माझ्या गावाला नाव ठेवले .. परत दुसरा विचार .. त्यात ह्याची काय चुक.. मग मी पण त्याला आणी मला थोडे बरे वाटावे म्हणुन म्हणालो) .. ऐसा कुछ नही है.. गाव मे भी अछी लडकीया होती है.. मुझे 8th मै एक अछी लगी थी और 12th मै भी एक"
तो: " सही है .. फिर क्या हुआ"
मी: "किसका? "
तो: "तुमने कुछ तो किया होगा"
मी: "(थोडासा लाजुनच म्हणालो) ह्म्म ...... मै क्लास मै ऊसको देखता था और वो भी मुझे .. सायकल पे अबतक ५-६ बार
ओवरटेक किया है .. और हा.. एक बार बहुत बुरा अ‍ॅक्सीडंट हुथा .. मेरा और मेरे दोस्त का .. तो ऊसने मुझे वोह हालत मे देखा था.. वोह मेरे तरफ देखके हसी और चली गयी... ऊस्स दिन मै बहोत खुष था.. रातभर ऊसका खयाल था दिमाग मै.. साला हाथ और पैर को लगा था.. कुछ भी दर्द नही हुआ Happy "
तो: " फिर क्या किया.. कही पे तो मिला होगा ना ऊसको.. या फिर लेटर तो लिखा होगा मिलने के लिये"
मी: "नही बे... पागल हो गया है क्या.. ऐसा किया तो हमारे ऊधर पिटते है और बदनामी होती है.... अब मुझे मालुम भी नयी वोह कहाँपे है."
तो: "(कपाळावर हात ठेऊन) .. तेरी लाईफ का तो सत्यानाश है.. म्हणून तो आणी सगळे .. फिदी फिदी हसत होते"
मी: " (मनातल्या मनात विचार केला ... खोटे तर काहीच बोललो नाही.. जे सत्य आहे तेच सांगितले.. खरच फार मागासलेले आहोत आपण ह्या लोकांसारखे का नाही राहत आपल्याकडचे पब्लिक )"
आणी ह्या so called club बद्द्लची फारच तुरळक माहीती मिळाली..
ती पण सिनेमा आणी काही गावाकडच्या आप्तेष्ट मित्रांकडून ऐकलेली/पाहीलेली ..
फार मजा असते म्हणे.. मुले मुली एकत्र येऊन नाचतात

"Little knowledge is very dangerous" हे का म्हणटले गेले असेल ह्याचा परिचय झाला..
मुंबई मधे येऊन अवघ्या २ महिन्यातच..

वेळ शनीवार सं ९:०० ..
स्थळ : मुंबई.. velocity club

ते समोरचे द्रुष्य पाहुन पायाखालची जमीन सरकली..
४-५ तरुण मुली.. सिगरेट पेटवत होत्या.. आणी तोंडावर अत्यंत घाणेरडा गडद मेकप.. आणी ईंग्रजाळलेल्या भाषेत काहीतरी बरळ्त होत्या..

मी फार फार आश्चर्यचकीत होऊन (जणू जगातले आठवे आश्चर्य समोर अवतरले आहे असा तोंडावर भाव आणून )
मित्राला म्हणालो

मी:"अबे.. ओ देख .. लडकिया सिगरेट पी रही है ओ भी आधे कपडों मे है.. "
तो: "(माझा अचंबित चेहरा पाहुन) तो क्या हुआ.. तु गाँव मे नही है.. GROW UP DUDE"
मी: "(माझ्या कपाळावर आठ्या.. कमी कपडे घालून सिगरेट पिणार्या मुलींबरोबर बोलत बसणे म्हणजे ग्रो अप होणे?? )"

हा क्षण मी कधीच विसरु शकत नाही....

दिल्ली वाली classmate पण .. अर्ध्या कपड्यात अवतरली.. हातात सिगरेट चे पॅक घेऊन..
मला फक्त चक्कर यायची राहलेली.. (स्वता: शीच बरळत होतो कुठे येऊन फसलो राव)

तो: "You are looking gorgeous today.. give me a hug"
ती: "(जरा कंबर तिरकट करुन.. माझ्या कडे पाहीले आणी सिगरेट चे पॅक पुढे करुन मंद स्मित देऊन एक सिगरेट्चा झुरका घेऊन म्हणाली).. have one.."

तो आणी ती मस्त एकमेकांच्या मिठीत रमले..

मी : "आता डोळ्यासमोर सगळे तारे फिरत होते.. हे सीन फक्त सिनेमात पाहीलेले.. आणी मुलगी सिगरेट पीते हे
मनीषा कोईराला च्या "अकेले हम अकेले तुम" पिक्चर मधे पाहिलेले" तोच सीन आठवला ( ती हिऱोईन होते.. पण तिचा मुलगा आणी नवरा जवळ नसतो म्हणून ती सिगरेट पिते ..).. आता हे दिव्य प्रत्यक्षात पाहतोय.."
एव्हाना तो सिगरेट चा दुर्गंध नाका मधे जात होता आणी तो कुबट असा वास घ्यायची ईछा होत नव्हती..

मी: "अरे ये क्या करी हो.. लडकी होके सिगरेट पिती है.. तुम्हारी मम्मी और पापा को पता चल गया तो तुम्हारा कुछ् खैर नही है (परत तुफान हिंदी) "
ती:"(एकदम तावात येऊन..) अरे तुम घाटी लोगो को कुछ enjoyment नाम की चीज मालुम है या नही .. तुम लोग सिर्फ खयालो मै रहो. दिन मै और रात मै दो टाईम सपने देखते रहो.. बाकी है क्या तुम्हारी लाईफ मै..
and btw.. I smoke since CBSE and my parents know about it ..
who the hell you are to tell me not to smoke"

त्या कंपुतल्या एका शहाण्या व्यक्ति ने येऊन वातावरण थोडे निवळन्याचा पराक्रम केला..

हातावर एक छाप मारला club entry च्या वेळी.. अर्थातच. आपली १०००००० प्रयत्नानंतर हिम्म्त झालीच नाही.. कोणत्या मुलीला जाऊन विचारायची... पाऊले पुढे जात होती.. आणी परत मागे जिथे होतो तिथेच.. फरक फक्त एवढाच की घामाच्या धारा जरा जास्त वाहत होत्या.. Happy

शेवटी गुज्जू classmate बरोबर मधे गेलो.. आणी ते द्रुष्य बाहेरच्यापेक्षाही भयानक..

"आत एक विक्षिप्त प्रकारे केस आणी दाढी कापलेला.. माणुस... किशोर कुमारच्या गान्यांची वाट लावत होता.. त्याच्या हातात एक सिगरेट.. व कानात हेडफोन "

बाजुला दारुडे पब्लिक.. आणी मध्यभागात वेडी वाकडी कंबर हालवुन मद्यधुंद झालेल्या मुली आणी मुले..
बस्स्स्स झाले राजे पळा आता.. ईथुन पुढे गेलात तर झाले आपले कल्याण झालेच म्हणून समजा.. अर्थातच मला त्यातील एक व्ह्यायचे नव्हतेच..

सगळ्यांची नजर चुकवुन पळ काढ्ला.. थेट.. रेल्वे स्टेशन कडे.. (तरी एकाला सांगुन आलो.. तब्येत नाही ठीक माझी मी निघतो.. त्यानी ओळखुन घेतले जे ओळखायचे होते ते)

टीकीट काढ्ले. एक कुर्ला स्टेशन ..
रात्रीचे ११ वाजलेले ट्रेन मधे गर्दी तुरळकच..... डोक्यात नुसते विचार फिरत होते.. (च्या मारी झक मारली आणी ह्या ****** पब्लिक सोबत गेलो.. ह्यांना कायमचा रामराम ठोकला पाहीजे)
स्टेशनला ऊतरलो.. घरी पायी चालात जायला २ कि.मी. अंतर.. बसचा अवांतर खर्च कशाला आजुन म्हणून चालत होतो.(आज केला तेवढा पुरे झाला)

डोक्यात विचारांचे थैमान चालु...
ह्यांच्या मायला.. माझ्या मराठवाड्यातील गावाला नाव ठेवतात.. स्वता पार वाया गेलेले आहेत... अक्कल,
संस्क्रुती, मर्यादा बंधणे काहीच नाहीत..
मग आपण ह्यांच्यापेक्षा कितीतरी पटिने चांगलेच आहोत. हे लोक आपल्याला नाव ठेवतात मागासलेले म्हणतात.. ह्यांनी पुढे जाऊन काय दिवे लावलेत.. ई

घरी येऊन शांत पडलो..

गावाकडच्या मित्रांची फार आठवण येत होती..
सोबत बुडवलेले तास.. माळराणात/गावाबाहेरच्या घाटातल्या नदीत कोणी किती पाण्याचे झरे काढले. ह्याची competition..
संध्याकाळी बस स्टँड वर जाऊन खाल्लेली पाणीपुरी (किंमत केवळ १ रू.).. आणी भेळ पुरी .. (किंमत केवळ २ रू.) जी आज लाखमोलांची वाटत होती..
घरी आईच्या हातची केलेली चपाती आणी मेथीची भाजी..
हे सगळे आठवत होते..
सत्य एकच होते.. की हे सर्व आता मागे राहीले आहे... (नकळतच दोन्ही डोळ्यांच्या कडा पाण्याने भरुन आल्या)

ह्या एका बेसावध क्षणी.. आयुष्याने एक वळण घेतले.. जिथुन मागे फिरणे केवळ अशक्यच होते
(एका क्षणात विचार आला.. द्यावे सोडुन सगळे आणी गावी परत जावे.. कशाला आणी कशासाठी असल्या अमानवीय लोकांसोबत
राहायचे आहे.. परत दुसरा विचार.. ५ ही बोटे सारखी नसतात.. परत कंपुची आठवण झाली.. चला.. परत असल्या टुकार पब्लिक सोबत रहायचे नाही.. आपण बरे आणी आपल्यासारखीच मध्यमवर्गीय असणारी गँग बरी... )

कंपुतल्या एका मित्राने आधिच सांगितले मुंबई की ३ चीजोंसे के पीछे कभी नही जानेका
"लेडी,गाडी और बारिश" कभीभी धोका दे सकती है ....
तो लेडी का म्हणाला असावा.. याची मला थोडी खात्री पटली Happy

====================================================================================

असेच १-२ आठवडे गेले.. पण शुर्पणखा/दिल्ली दिसली की डोके फिरायचे... Sad

====================================================================================

वेळः दु.१:३५मी.
स्थळः F.Y.(div A) class room 102 - first floor
शुर्पनखा.. फारच अस्वस्थ वाटत होती.. बहुतेक तिच्या सर्व अंगाला खाज सुटली असावी..
शुर्पनखा :(हाता/पायाला) खाजवत ऊभी राहीली mam.. I am not feeling well...
मी:.. (शेवटच्या bench वरुन स्वताचे हसु शक्य तितक्या परीने दाबत होतो... आणी मनातल्या मनात.. अब आया ना मजा
आयडिया काम कर गयी हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ ) Happy Happy Happy
क्रमशः
=================================================================================

गुलमोहर: