आमचा रतन गडचा बेत सतत पुढे ढकलला जाऊन जाऊन फायनली कँसलच झाला
मग एक दिवस कॅप्टनचा फोन आला "मुलांचा कँप घेऊन जाउयात का पेठला ११-१३ एप्रिल ला?" एक जीप्सी आहे माझ्या खोल मनात दडुन
त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. कारण तब्येतीच गार्हाणं, जाणार्या सुट्ट्या सगळ सगळ बाजुला सारुन भटक्या वृत्तीने डोक वर काढल 
लहान मुलांच्या आधी आम्हीच उत्साहाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. सोमवार मंगळवारची सुट्टी जातेय्...!
जाने दो..
कँप तो होना ही चाहिये... 
पण मुलं यायला हवीत, आयोजक मंडळ जमल पाहिजे.....
मग तिथे तीन दिवस काय करायचं, कसं जायचं ह्या सगळयाचा फोनाफोनी करुन आढावा तयार केला. माहितीतल्या बंचे कंपनीची यादी तयार करुन फोनायला सुरुवात झाली.
अगदी लहान म्हणजे ६-७ वर्षाची जी ३-४ जण होती त्यांच्या बरोबर पालक मंडळींपैकी एकजण तरी येणार होतं त्यामुळे त्यांची थोडी जबाबदारी त्या त्या पालकांवर वाटली गेली.
होता होता सगळी मिळुन २० मुलं तयार झाली आणि आम्ही मोठे १२ धरुन ३२ जणांच्या चमुच जायच ठरलं.
एक्-दोन पालकांनी रॅपलिंग वगैरे घेणार का? नविन काही शिकवणार का? नुसतच काय ट्रेक करायचा? असा सुर लावला. मुलांचा कँप नेण्याची कॅप्टनची पहिलीच वेळ नसली तरी मदत करणार्यांपैकी मी, विश्वेश, अजुन गृप मधले १-२ जण हे नवखे ऑर्गनायझर्स होतो. मुलांचा देखील नीटसा अंदाज नव्हता, कितपत चालतील, जेवण, पाणी पचेल की नाही...आई वडीलांशिवाय रहाणार्या मुलांबद्दल जरा काळजी वाटत होती मला तरी. त्यातुन माझी तब्येत जरा बरी नव्हती पण मुळात माझी इच्छा शक्ती आणि इतक्या पालकांनी ठेवलेला विश्वास म्हणुन बाप्पाच नाव घेतलं नी जायचच काहीही झालं तरी अस ठरवलं.
मुलांनी काय आणायच बरोबर त्याची यादी माझ्यावर भिस्त ठेऊन येणार्या पालकांना फॉरवर्ड केली, तिथे काय मिळेल, काय न्याव लागेल त्याप्रमाणे कॅप्टनने व्यवस्थीत कानपिचक्या दिल्या होत्याच. त्या बरहुकुम सगळ होत होतं तरी आदल्या दिवशी झोप काही लागली नाहीच नीट.
सकाळच्या कर्जत ट्रेनकरता डोंबिवलीहुन येणारे सगळे ४ नंबर प्लॅटफॉर्मवर भेटणार होतो. माझ्या एका मैत्रिणीचा ९ वर्षाचा मुलगा एकटाच येणार होता. तिचा त्याला सोडताना चेहरा बघुन मला अजुनच
जबाबदारी वाढल्यासारख वाटलं. बरोबर आहे म्हणा, मुलांना अस एकट पाठवताना किती टेंशन येत असेल त्याची कल्पना आहे मला. मुल मात्र नेहमी प्रमाणेच टेंशन फ्री दिसत होती. पालक बरोबर नसणार म्हणुन अगदी खुष वाटत होती 
काही मुलं एका मिनिटात ओळख करुन घेऊन इतर मुलांमधे मिक्स होत होती, काही जरा लाजत बुजत होती. कर्जतला उतरुन टमटमने प्रथम कडावचा गणपती बघितला आणि तिथुन आंबिवलीत मुक्कामाच्या घरी पोहोचलो. हेच ते हॉटेल कोथलीगड्...पुढचे तीन दिवस जे आमचं घर होतं.
(ह्यांच्या घरी उतरलो होतो)
थोडी विश्रांती, पोह्यांचा नाश्ता आणि थोडे मुलांसाठी गेम्स असा बेत होता जेवणं होई पर्यंत. तरिही एक मुलगा एकटा एकटा रहात होता. कोणत्याही खेळात, गप्पांमधे भाग घेत नव्हता. थोडं टेंशन आलं "हा मुलगा पुढचे तीन दिवस एंजॉय करेल ना?" पण तो ही दुपारची झोप झाल्यावर एकदम व्यवस्थीत मिक्स झाला.
जेवण पण बरच काही शिकवुन गेलं....त्यांनाही नी मलाही. एकतर आपल्याला नी आपल्या मुलांना मऊसुत पोळ्या, भाजी, भातावर तूप अशा जेवणाची सवय्....तिथे गावात मुख्य अन्न भात, तांदुळाच्या भाकर्या, कितीही कमी तिखट भाजी म्हंटली तरी त्यांच कमी तिखट= आपल हाय हुस्स तिखट
तिथे भाजीत खोबरं-गुळ हा प्रकारच नाही त्यामुळे मुलांना आधीच सांगाव लागायचं.....थोडं घ्या...जे आवडेल ते पुन्हा घ्या.....घरी बहुतेक तरी आपण आया मुलांना वाढुन देतो.....लहान मुलं असतील तर बाहेर गेल्यावर त्यांच उरलेलं आपण आधी संपवतो.....त्यामुळे त्यांना स्वतःला किती पोळी-भाजी जाईल्....कमी पडेल की जास्त होईल ह्याचा अंदाजच येत नाही
तोच प्रकार बॅगेचा..........काही मुलं स्वतःच सामान व्यवस्थीत (म्हणजे अगदी नीट नाही तरिही यथाशक्ती) स्वतःच्या बॅगेत्/बॅगेच्या जवळपास ठेवत होते.......काहिंना सवयच नव्हती ह्या टोकाला ब्रश पडलाय, त्या टोकाला शर्ट्.........कुठे रिकामी पाण्याची बॉटल. एक जाणवलं पालक म्हणुन की ह्या सवयी हळुहळू आपणच घरी लावायला हव्यात आणि त्याही उगाचच शिस्तीचा/धाकाचा बडगा न दाखवता . त्यांच सगळं सामान जागच्या जागी आपण ठेवुन त्यांना हे जमणार तरी कधी? मी शिकलेले हे दोन धडे मला नक्कीच उपयोगी पडतील.
दुपारची विश्रांती होऊन आम्ही संध्याकाळी राईस मील बघायला गेलो. काही मुलांनी उत्साहाने माहिती वगैरे विचारुन घेतली, बाकिच्यांना कधी एकदा नदीवर जातोय अस झालेलं. तिथुन निघुन टमटमने अनिरुद्ध बापुंचा आश्रम बघायला गेलो. (आश्रमाच्या बाहेर घेतलेला गृप फोटो)
श्रद्धा अश्रद्धतेचा भाग बाजुला ठेवला तरी तो सुंदर, स्वच्छ परिसर शांत अनुभव देऊन गेला. आश्रमातुन निघाल्यावर मुलांच्या आवडीच्या कार्यक्रमाला म्हणजे नदिवर डुंबायला निघालो. हे तिनही दिवस मुलांनी नदीवर मनमुराद डुंबुन घेतलं. गावात एरव्ही पाण्याचं दुर्भिक्ष त्यामुळे आम्ही हॉटेलवर अंघोळीची गोळीच बरोबर घेतली होती
तेव्हा नदीवरची अंघोळ हाच घामाच्या धारांवर उपाय होता.
तिथुन मुलांना बाहेर काढण सर्वात कठीण काम होतं. शेवटी टमटम जातील निघुन नी चालत जाव लागेल हॉटेल पर्यंत ही मात्रा लागु पडली. किती ती रिक्षाची सवय आपल्याला 
रात्री लवकर नीजानिज केली कारण सकाळी शक्य तितक्या लवकर पेठ चा किल्ला चढुन जायच होतं. सगळी मुलं अपेक्षेपेक्षा लवकर तयार झाली नी आम्ही सकाळी ६.३० वाजता हॉटेल सोडलं (सोबत ग्लुकॉन डी, ठेपले नी ब्रेड जॅम घेउन) (ये ल्लो ग्लुकॉन डी बॉटल मे भरके हम रेडी हो गये ट्रेक के लिये :P)
गडाची वाट अजिबात किचकट नव्हती, पण उन्हाची काहिली व्हायच्या आत मुक्कामी पोहोचायच होतं. पावसाळ्यात जी जमिन हिरवा गालिचा अंथरुन स्वागत करते तीच ह्या उन्हाच्या तडाख्यात भेगाळलेली दिसत होती.
(कॅक्टस्....बाकी जमिन भेगाळलेली दिसतेय ना तिच जमिन पावसाळ्यात हिरवा गालिचा अंथरते)
(करवंदाची फुले)
झाडं म्हणजे कॅक्टस, करवंदीची जाळी, चाफा, घोस्ट ट्री ते ही मधल पठार पार केल्यावर जास्त करुन दिसली.
मधे १५-२० मिनिटांची विश्रांती पेठ गावातल्या एका घरात घेऊन आम्ही पुढे निघालो. गावातल्या विहिरीत फक्त ओंजळभर पाणी शिल्लक होतं. १५ दिवस झाले ट्रांसफॉर्मर जळल्यामुळे संपुर्ण गावात वीज नव्हती. आम्ही जेवायला ह्याच घरी परत येणार होतो म्हणुन वरुन म्हणजे केव्ह्जच्या इथुन टाकांमधल पाणी भरुन घेऊन यायच ठरलं. गावकरी रोज लागणारं पाणी ह्याच टाकांमधुन घेऊन येतात ते ऐकुन अंगावर काटा आला आणि त्या पार्श्वभुमीवर आपण शॉवर बाथ घेण्याची चंगळ करतो, वहात्या नळाखालीच भांडी घासली जातात बॉ नीट असे डायलॉग्ज मारतो हे सारं ब्लॅ़क अँड व्हाईट पिक्चर सारख अंगावर आलं 
गावातुन निघुन फारफार तर ३० मिनिटात आम्ही केव्हज मधे पोहोचलो.
(केव्हज मधे विश्रांती)
(केव्हजमधे नाश्ता)
तिथेच ब्रेकफास्ट करुन डोंगर माथा गाठायला निघालो. खालुन टोपी सारखा दिसणारा पेठचा किल्ला हा पुर्वी टेहळणी बुरुज म्हणून वापरला जायचा, त्या टोपीतुन वर जाणार्या पायर्या कोरल्यात. आता अगदी नीट नेटक्या नाहित राहिलेल्या त्या. तरी त्या पायर्यांवरुन वर गेलं की डोंगर माथ्यावर पोहोचता येतं. (हाय का नाय रोमँटिक पोज
:P)
एकदा वर पोहोचलो की "येव्हढ्या उन्हात का चाललो आपण?, काय गरज आहे का पाय दुखवुन ट्रेक करायची?" असले सगळे प्रश्न निरर्थक ठरतात. भर उन्हाळ्यात सुद्धा हा परिसर मोहुन टाकतो तर पावसाळ्यात तो किती मनमोहक दिसत असेल? दुर्बीणितुन समोर दिसणारा पदरगड वगैरे बघुन आम्ही पुन्हा केव्हज मधे आलो. इथेच एका खोलीत अजुन दोन खोल्या दिसल्या त्यात आम्हाला वटवाघळांनी दर्शन दिलं. (बघितलीत ही वटवाघळं)
गुहेच्या बाजुला भैरोबाच देऊळ आहे त्यात बायकांना प्रवेश नाही अस मला न आवडलेल एक वाक्य वाचायला मिळालं आणि आम्ही पण पुरुषांना जाच करुयात अस ठरवुन गुहेच्या एका बाजुला तोफ ठेवलेय तिथे पुरुषांना प्रवेश बंद अस जाहिर केलं (खर कारण तिथे आम्ही मुलिंना फ्रेश व्हायला नेलं होतं हे होतं :P)
पुन्हा गावात येऊन जेवण, मग परतीचा प्रवास. हॉटेलात येऊन फ्रेश होऊन पुन्हा एकदा नदीवर डुंबायला तयार. रात्री कँप फायर अस करत दोन दिवस कधी संपले ते कळलच नाही. (हे आमचे सोबती होते. हॉटेलवाल्याचे दोन कुत्रे. त्यांनीपण आमच्या बरोबर ट्रेक, नाश्ता सगळ सगळ पुर्ण केलं :P)
तिसरा दिवस रिकामाच ठेवलेला, मुलांना पुन्हा नदीवर जायच असल्याने बरिचशी मुलं आणि पुरुष मंडळी नदीवर गेली. आम्ही तिथेच छोट्या मुलांबरोबर जरा खेळून, ज्यांच्या घरी राहिलो त्यांच्याशी थोड्या गप्पा मारुन वेळ घालवला. अजुनही गावात बर्याच ठिकाणी टॉयलेटची सोय नाही. आम्ही ज्या हॉटेल मधे राहिलो होतो तिथे त्यांनी एक्-दोन वर्षापुर्वीच टॉयलेट बांधुन घेतलय. गावात दवाखाना दिसला नाही पण दारुच दुकान मात्र दिसलं 
ते तिनही दिवस सानुला कार्टुन नेटवर्कची आठवण देखील झाली नाही इतके चांगले पर्याय तिच्या पुढे होते. पुढचा कँप कधी? असं मुलांच विचारणच कँप झाला बाबा चांगला ह्याची पावती देऊन गेलं 
वेगवेगळे अनुभव जोडीला बांधुन घेतले, काही गोष्टी शिकलो. मुलं किती अतरंग गिरी करु शकतात ते ही अनुभवलं. कधी प्रेमाने समजावल, कधी ओरडुन घेतल
पण पुन्हा परत येईपर्यंत एक नातं निर्माण झालं मुलांशी. मुलं तर शिकली असतीलच काहीना काही पण त्या निमित्ताने मी बरच काही शिकले. तीन दिवस मोकळ्या हवेतला ऑक्सिजन घेऊन आम्ही कर्जत ट्रेन मधे बसलो पुन्हा एकदा आमच्या सिमेंटच्या जंगलात येण्यासाठी..
पुनमच्या सुचने नुसार कँप, संयोजक ह्याविषयी माहिती देत आहे.
संयोजकां विषयी थोडसं:
हा आमचा ओळखी ओळखीतुन झालेला ट्रेकर्स गृप आहे. त्याच रजिस्ट्रेशन वगैरे कुठे केलेलं नाही. श्री. शैलेंद्र सोनटक्के ज्यांना आम्ही कॅप्टन म्हणतो त्यांच्या नेतृत्वा खाली आम्ही ट्रेक्स करतो. ते गेली २५-३० वर्ष ट्रेक्स करतायत. आजपर्यंत त्यांनी २०० च्या वर ट्रेक्स पुर्ण केलेत.(आमच्या गृपच मधे जीटी़जी झाल होत तेव्हा तयार केलेली ट्रेक्स किती पुर्ण केले त्याची जेपीजी सोबत जोडतेय)
मध्यंतरी कॅप्टनच्या पाठिच्या कण्याच्या दुखण्यामुळे ३-४ वर्ष त्यांचे ट्रेक्स पुर्ण बंद होते. आता त्यांच्या बरोबर असेच बरिच वर्ष ट्रेक्स करुन अनुभवी झालेले सहकारी आम्हाला मदत करत असतात. ते पुर्वी म्हणजे त्यांची सगळ्यांची मुलं लहान असल्या पासुन असे कँप्स आयोजित करायचे. मग मुल मोठी झाल्यावर हळु हळु हे प्रमाण कमी झालं. अर्थात १०० वगैरे मुलं नाही नेऊ शकत कारण आमचा गृप तसा छोटा आहे पण जास्तीत जास्त ५० जण नेऊ शकतो.
कुठेही जाहिरात वगैरे देऊन हा कँप नेला नव्ह्ता (तेव्हढा खर्चही नको होता, कारण ना नफा हे तत्त्व आहे "ना तोटा" हे ही जमल तर हवच होतं) ओळखीचीच मुलं २२-२३ झाली. त्यातुन २-३ गळली नी जाईपर्यंत २० शिबिरार्थी नी १२ आम्ही ताई नी काका काकु असे एकुण ३२ जण फायनली गेलो.
कॅप्टनशी ओळख तशी उशिरानेच म्हणजे विश्वेश जेव्हा बदली होऊन त्यांच्या डिपार्टमेंटला जॉइन झाला तेव्हा झाली. तो आधी ३-४ ट्रेक्स त्यांच्याबरोबर एकटा जाऊन आला. सानुला घेऊन जाण्यासारखा ट्रेक जेव्हा कळला तेव्हा आम्ही दोघीही जॉइन झालो. त्यांच्याबरोबर दोनच ट्रेक्स केले आत्ता पर्यंत पण येव्हढा विश्वास बसला की मीच त्यांना कँप नेऊयात म्हणुन मागे लागले. होता होता सगळ जुळुन आलं नी कँप झाला ही ते देखील पुढचा कँप पण नेऊयात सुट्टी संपायच्या आधी असं ठरवुनच
कॅप्टन ह्या सगळ्याच ठिकाणी बरिच वर्ष येत असल्यामुळे गावातल्या बर्याच जणांना नावानिशी ओळखतात. त्यांचा डेटाही अपडेट आहे. त्यामुळे टमटम ठरवण्यापासुन ते रहाण्याची जेवणाची सोय कशाच बाबतीत काहीच अडचण आली नाही.
मस्तच ..मंद्याला अनुमोदन
मस्तच ..मंद्याला अनुमोदन
कवे माझ्या मागणीला मान देऊन
कवे माझ्या मागणीला मान देऊन ह्या वेळी चित्रासकट लिहिल्याबद्दल धन्यवाद.. :p
मस्त पण आता बालसंगोपन केंद्र उघडायला हरकत नाहि तुला आणि विश्वेशला..
फोटो आणि वर्णन झक्कास. चंगा उपक्रम..:)
Pages