दोन मूठ राख

Submitted by अभय आर्वीकर on 15 April, 2010 - 01:06

दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...

आणि

अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"

पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????

- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुलमोहर: 

गिरीशजी,छायाजी,सानिकाजी,मुकुंददा
तुमचे अभिप्राय...... क्या बात है...!!

ही कविता सहज लिहिली मी,आणि 'काहीच्या काही कविता' मध्ये टाकणार होतो.
ही कविता,कविता म्हणुन चालेल.. हा विश्वास आज तुम्ही मला दिलाय.

हेच तर खरेखुरे रूप आहे मायबोलीचे.
हाच चमत्कार घडवला मायबोलीने माझ्या आयुष्यात...
या संदर्भात मी माझ्याविषयी थोडेसे येथे लिहिले आहे.

मानाचा मुजरा तुम्हांस आणि मायबोलीस...या विद्यार्थ्याचा.....!!

बिचार्‍या अस्तित्वहीनाला हेही माहित नाही
की अस्तित्वाने तर त्याला कधीच आपल्यात सामावून घेतलंय.....

Happy छान व वेगळी कविता!

गंगाधरजी ! Happy

अस्तित्वहिनाचीही अस्तित्वासाठीची धडपड.... आणी प्रत्येक अस्तित्वाचा स्वपश्चातही अस्तित्व टिकवण्याचा न संपणारा अट्टाहास.

चांगली वाईट ठरवण्याचा अधिकार आणी पात्रता माझी नाही. (कुठे स्पष्ट बोलुन गेलो असेनही. पण ते वैयक्तीक आहे.) नेहेमिच्या शिळ्या, प्रेम आणी शृंगारिक कवितांपेक्षा वेगळी म्हणुनही आवडली.

वेगळीच आणि सुस्पष्ट म्हणून आवडली. Happy

नेहेमिच्या शिळ्या, प्रेम आणी शृंगारिक कवितांपेक्षा वेगळी म्हणुनही आवडली.>>> अनुमोदन.

खूप छान Happy खरं तर अस्तित्त्व असलेलं आणी नसलेलं दोन्ही आपल्या आतच असतं... ह्या द्वंद्वातच आपण अस्तित्त्व सिद्ध करत आपल्याला हव ते मिळवतो आणी शेवटच्या दोन मूठी राखेइतपत येऊन पोचतो...
प्रत्येकालाच ते सापडतं असं नाही... तुम्ही तर ते शब्दांत उतरवलंत... खूप सुंदर Happy

Pages