शेरलॉक होम्स

Submitted by निंबुडा on 9 April, 2010 - 05:26

हल्ली हल्लीच "शेरलॉक होम्स" या पुस्तकाचा (लेखक - Sir Arthur Conan Doyle) पहिला व्हॉल्यूम वाचून संपवला आहे. दुसरा वाचते आहे. आत्ता पर्यंत शेरलॉक होम्स हे पात्र (character या अर्थाने) नुसते ऐकून माहिती होते. मनोगतावर शेरलॉक होम्स च्या अनुवादीत कथा वाचून मूळ कथा वाचायचा मोह झाला. मित्राकडून दोन्ही भाग मिळाल्या मिळाल्या त्यावर तुटून पडले आणि शेरलॉक होम्स ची अशी काही मोहिनी पडली की त्यातून अजून बाहेर पडलेले नाहीये.

अनुवादीत कथा सारांश स्वरुपातील आहेत, परंतु मूळ कथा जास्त रोमांचकारी आणि खिळवून ठेवणार्‍या आहेत. कथेतली मुख्य पात्रे शेरलॉक होम्स आणि त्याचा डॉक्टर सहकारी वॅटसन ही आहेत. शेरलॉक होम्स कडे येणारे क्लायंट्स, Scotland Yard चे police detectives, कथेतील इतर पात्रे यांचे इतके अचूक वर्णन लेखकाने केले आहे की ती ती पात्र डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाहीत. सर्व घटनाक्रम जणू आपल्या समोर घडतो आहे असा feel येत राहतो.

शेरलॉक होम्स ची अचूक निरिक्षणशक्ती, गूढ उकलण्याची त्याची methodology, त्याची अचाट साहसे इ. इ. सर्वच छान.
आतापर्यंत जितक्या कथा वाचल्या त्यापैकी सर्वात आवडलेल्या कथा या आहेतः
The Adventure of the Engineer's Thumb
The Adventure of the Dancing Men
The Adventure of the Second Stain
The Adventure of the Devil's Foot
The Adventure of Silver Blaze
The Adventure of the Six Napoleons

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! छानचं! अभिनंदन एक खंड पुर्ण केल्याबद्दल. तू मला मनोगताच्या त्या अनुवादीत कथांची लिंक देतेस का?

अहाहाहा. काय आठवण.
आता कित्येक वर्षात वाचले नाहीयेत. पण तेव्हा लै भारी वाटायचे.

शेरलॉक होम्स :-)!!!!!!! कितीही वेळा वाचली तरी खूप मजा येते वाचताना अशा पुस्तकांच्या यादीतील डॉयल साहेबांची होम्सगाथा...... फार मस्त आठवण करून दिलीस. तुला पुढील वाचनासाठी शुभेच्छा!

अहाहाहा. काय आठवण. >>> ह्म्म्म खरेच पछाडले होते एके काळी शे. होम्सने ! Happy

.
त्या आठवणींपायी सिनेमा पाहीला.... पण त्यातले होम्सचे कॅरेक्टर माझ्या इमॅजिनेशनला पार तडा देऊन गेले. सिनेमा ठीक आहे पण तरीही..!

बी,
http://www.manogat.com/ या साईट वर जा. उजव्या बाजूला "शोध" ऑप्शन वर क्लिक करा. "शेरलॉक होम्स" असा शब्द टायपा आणि "शोधा" बटनावर क्लिक करा. "शेरलॉक होम्स" हे शब्द ज्या ज्या साहित्यात आला आहे त्या सर्वांची एक यादी दिसेल. एक एक करून सर्व कथा वाचून काढा. सर्व कथा एकापेक्षा जास्त भागांमध्ये लिहिलेल्या असून प्रत्येक भागाच्या सुरुवातीला इतर सर्व भागांच्या links दिलेल्या आहेत. बघा जमतंय का.

जुना शेरलॉक होम्स (टीव्ही सीरियल - जेरेमी ब्रेट) आपल्याला भारी आवडायचा.... त्याचं ते धारदार नाक, पातळ ओठ, भेदक नजर.... परफेक्ट डिटेक्टिव्ह!! Happy
holmes2.jpg

आमच्याकडे आहे 'संपूर्ण शेरेलॉक होम्स्'चे अनुवादित पुस्तक. मस्त आहे. मराठी अनुवाद आहे, तरीही वाचायला मजा येते. ह्यात सर्व प्रकाशित होम्सकथा अनुवादित स्वरूपात आहेत. मोठ्ठं जाडजूड पुस्तक आहे. चवीचवीने वाचतो ते पुस्तक.

कोठे अन्य साईटवर अपलोड करून त्याची लिंक देता आली तर बघा ना.... म्हणजे ईस्निप्स [esnips] सारख्या साईटवर.....

एकदम जिव्हाळ्याचा विषय काढलात.......ह्या पुस्तकांवरच प्रेम तर कधीच नाही कमी होणार. जेरेमी ब्रेटच्या तर जन्माचं सार्थक झालय. पुस्तक मिळत नसेल तरी हे आहे - http://sherlock-holmes.classic-literature.co.uk/.
http://www.veoh.com/collection/sherlockholmes/watch/v951771tyqKdb4x# हे पण घ्या.

हो जमलं.... त्या पीडीएफ आयकॉनवर क्लिक केलेत की बहुधा येत असावी.... त्यापेक्षा तिथे डाऊनलोड ऑप्शन आहे तो घ्या.... २९ एम.बी. असल्यामुळे वेळ लागतो, पण होतं डाऊनलोड!

माझ्याकडे पण अनुवादित संच आहे. ६ भाग आहेत. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा त्या कथा वाचायला भारी मजा येते. मला सगळ्यात आवडलेली कथा म्हणजे 'नाचणार्‍या बाहुल्या'

Granada TV निर्मीत "शेरलॉक होम्स" चे सर्व भाग नुकतेच Netflix वर पाहुन सम्पवले. जेरेमी ब्रेट या नटाची अप्रतिम भुमिका असलेली ही सिरीज ८०-९० च्या दशकात british tv वर प्रदर्शीत झाली. ब्रेट हुबेहुब Doyle ने रन्गवलेल्या होम्स प्रमाणे दिसतो.या अभिनेत्या मधे होम्स इतका भिनत गेला कि शेवटी त्याना maniac depression चा सामना करावा लगला.त्यानी होम्स च्या सर्व eccentric लकबी (मधेच हात वारे करणे, "हा" असे अचानक ओरडणे इ.) perfect उचलल्या आहेत.http://en.wikipedia.org/wiki/Jeremy_Brett.
या मधे तत्कालीन England चे फरच सुन्दर चित्रण आहे.मी शेरलॉक होम्स ची हजारो पारायणे केली आहेत आणी basil rathbone, ronald howard, christopher lee या सर्वान्चा होम्स पण पाहिला आहे.trust me no one even goes near brett.अमेझॉन वर सर्व भाग उपलब्ध आहेत्.ज्याना Sir Arthur Conan Doyle चा शेरलॉक होम्स प्रत्यक्षात पहयचाय त्यानि ही सिरीज जरुर पहावी.यातले Dr.Watson, Mrs.Hudson, inspector lestrade ही पात्रे पण मस्त.
मला आवडलेले काही एपिसोडस

THE HOUND OF THE BASKERVILLES, THE PROBLEM OF THOR BRIDGE,
THE BOSCOMBE VALLEY MYSTERY
THE THREE GABLES, THE CREEPING MAN, THE DYING DETECTIVE,
THE GOLDEN PINCE-NEZ
A SCANDAL IN BOHEMIA, THE DANCING MEN,
THE NAVAL TREATY
THE EMPTY HOUSE, THE ABBEY GRANGE,
THE MUSGRAVE RITUAL
THE SECOND STAIN, THE MAN WITH THE TWISTED LIP,
THE PRIORY SCHOOL, THE SIX NAPOLEONS
SILVER BLAZE, WISTERIA LODGE

मस्त आठवण. किती वेळा वाचले गणती नाही.

पडद्यावर शेरलॉक झाले बहु, होतील बहु पण शेरलॉक म्हटले जेरेमी ब्रेटच समोर येईल. फक्त नंतरच्या सीझनमध्ये त्याचे वजन वाढले तेव्हा बघायला त्रास होतो.