॥ वास्तोष्पति नमस्तुभ्यम् ॥

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 8 April, 2010 - 03:16

मानवाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र व निवारा हे आपण शालेय जीवनात शिकतो. विद्याध्ययना नंतर आपल्या या गरजांच्या पूर्तीसाठी आपण दिवस रात्र मेहनत करतो. मुंबईत प्रवेश करणा-याच्या अन्नाची व्यवस्था मुंबादेवी करते अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यानंतर सुरु होते तो निवा-याचा शोध. आपल्या आर्थिक क्षमतेप्रमाणे प्रत्येक जण स्वप्न पहातात, काहि जणांची स्वप्ने दिवास्वप्न ठरतात तर काहिंची अथक प्रयत्नानंतर साध्य होतात. सध्या वास्तुशास्त्राच्या आक्रमक जाहिरातबाजीने पुर्वी ज्यांनी घरे घेतली आहेत, त्यांच्या मनात प्रत्येक समस्येचे एकमात्र कारण वास्तुदोष असेच मनात येते, जसे कोणात्याही समस्येस एकमात्र कारण कालसर्पयोग सांगण्याचा मागील काहि काळात प्रघात झाला होता किंवा आहे. फारपूर्वी पासून आपल्या भारतीय संस्कृतीत वास्तु रचनेचा विचार केला आहे. मुख्य घराच्या पूर्वेस स्नानगृह, आग्नेयेस स्वयंपाक गृह, दक्षिणेस शयनगृह, नैऋत्येस वस्त्रगृह, पश्चिमेस भोजनगृह, वायव्येस पशुगृह, उत्तरेस भांडारगृह व ईशान्येस देवघर असे सांगितले आहे. आज प्रत्येक जण भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली व वैभवप्रद वास्तुरचनेचे कौतुक करताना दिसतात. त्याप्रमाणे गृहरचना करण्याच्या निमित्ताने आर्थिक समस्येस आमंत्रण देता, आपल्या अपयशाचे खापर गृहरचनेवर ठेवले जाते. वेदकाळापासून आपल्याकडे वास्तुरचनेचा जसा अभ्यास केला आहे , तसेच वास्तुदेवतेच्या उपासनेस महत्त्व दिले आहे. आपल्या राहत्या घरास दैवी शक्तिचे अभेद्य कवच लाभावे अशी प्रार्थना केली आहे. अशी विविध सुक्ते वास्तोष्पतिच्या ( वास्तुदेवतेचे नाव) कृपेसाठी गायली आहेत. ही सुक्ते पुष्टिकर्मासाठी म्हटली जातात. त्याचा भावार्थ किती उदात्त आहे ते पहा -

१) अन्न, धन, बुद्धि आदींनी समृद्ध असा मी या नूतन गृहात प्रवेश करीत आहे. माझे समस्त कुटुंबीय येथे प्रेमाने व निर्भयपणे निवास करोत.

२) सुख . अन्न, व समृद्धींनी परिपूर्ण असे हे गृह आम्हास लाभदायक होवो.

३) प्रवाससमयी पुनःपुन्हा आठवण येणा-या आनंददायी गृहाची आम्ही कामना करतो. हे गृह आम्हास लाभदायक होवो.

४) हे स्पृहणीय संपन्नयुक्त गृहा, तुझ्या ठायी मित्रजन सदैव, भाजनादि कार्यक्रमात मग्न असोत. येथे बुभुक्षित अथवा हपापलेले कोणीहि नसोत. येथे सर्व निर्भय असोत.

५) धेनुवृषभ आणि अज-मेढ्या आदींनी युक्त अशा या गृहामध्ये स्वादिष्ट अन्नाची लयलूट असो.

६) मधुरभाषी, भाग्यशाली लोकांनी समृद्ध अशा या गृहामधे अन्नसमृद्धी आणि आनंदमोदाचे लयलूट असो. येथे बुभुक्षित अथवा हपापलेले कोणीहि नसोत. येथे सर्व निर्भय असोत.

७) हे गृहदेवते, तू येथे प्रसन्नपणे राहून सर्वसमृद्धी घडवून आण. तू येथून जाऊ नकोस. मी आणलेल्या समृद्धीमुळे तुला मी अधिकच समृद्ध बनवीन.

(मूळ सुक्त अथर्ववेद काण्ड ७ - ६०)

अशा प्रकारचे सुक्त आपल्या घरास मंगलमय वातावरण प्राप्त करुन देते. आपण घराला पडदे, रंग, खुर्च्या कोणत्या असाव्या यांचा विचार करतो, पण आपल्या गृहदेवतेच्या कृपेसाठी आपण काय करतो हा प्रश्न तसा अनुत्तरीतच राहतो. आपल्या गृहदेवतेसाठी मराठीतील भाषांतरीत प्रार्थना म्हटली तरी सुखवर्धक अनुभव येतो . आपणही हा अनुभव घेऊन पहा. तसेच घरात शांतता नांदावी म्हणून घरात रोज कालभैरवस्तोत्र म्हणावे . या स्त्रोत्राची mp3 फ़ाईल हवी असल्यास panshikar999@gmail.com मेल करा ही सेवा विनामुल्य आहे. घराचे आनंदभुवन होण्यास वेळ लागणार नाही असा अनुभव आहे.

vikramaditya panshikar

panshikar999@gmail.com

9049600622

Pedne - Goa

गुलमोहर: 

श्री. पणशीकर,
इंटरेस्टिंग. खरोखरच आपण आयुष्याचा बराच काळ ज्या वास्तुच्या संरक्षणाखाली व्यतीत करतो तिचे स्तवन करून तिचे ऋण मान्य करणे ही कल्पनाच किती छान वटते. अथर्ववेदातली ही सूक्ते दृष्टोत्पत्तीस आणून दिल्याबद्दल आभार.

>>> तसेच वास्तुदेवतेच्या उपासनेस महत्त्व दिले आहे
या उपासनेचा एक नित्य भाग म्हणून, खर तर रोजच्या रोज, पण शक्य नसल्यास किमान सणासुदीच्या दिवशी/श्राद्धासहित विशिष्ट पुजापाठाच्या दिवशी कुलदैवत, मुख्यदैवत, गोग्रास, काकबली यान्चे बरोबरीने, वास्तुपुरुषासही नैवेद्य दाखविणे अपेक्षित असते! Happy अनेक घरातुन ही प्रथा बर्‍यापैकी पाळली जाते Happy
मात्र, नैवेद्य दाखविणे म्हणजेच धार्मिक रुढीन्ची सक्ती वा जाच असे वाटण्याच्या आजच्या कलियुगात, वास्तुपुरुषाची वास्तपुस्त कितीजण घेतील याची शन्काच आहे. Proud

आपल्या घरातील, परिसरातील व मनातील वातावरण मंगलमय ठेवण्यासाठी ही सूक्ते खरोखरीच कल्याणकारक आहेत. माहितीबद्दल धन्यवाद व पु.ले.शु. Happy

कालभैरवस्तोत्र अतिशय छान स्त्रोत्र आहे. त्याची लय, शब्द, चाल सुंदर आहेत. ऐकताना मन शांत होतं. पुढील लेखनास शुभेच्छा.