ऑनलाईन शेती.. अर्थात FarmVille

Submitted by Adm on 7 April, 2010 - 18:16

हे पान आधुनिक शेतकर्‍यांच्या कंपूसाठी.. Happy
Farmville वरील घडामोडी मुख्य म्हणजे काही हवं असल्यास (जसं की प्राणी, झाडं, खिळे, हार्नेस इ. इ. इ.) ती मागणी नोंदवण्यासाठी..

आत्तापर्यंत जमलेला कंपू : adm, पन्ना, आऊटडोअर्स, मिनी, अमृता, सायलीमी, मृदुला, Swa_P_Nil, नंदिनी, चिनुक्स, नीलू, स्वाती, भास्कर, अश्विनी_के

फळी आणि खीळे पाठवण्यासाठी लिंक्स :

Link to send nail:
http://apps.facebook.com/onthefarm/gifts_send.php?gift=nail

Link to send Board:
http://apps.facebook.com/onthefarm/gifts_send.php?gift=woodenboard

फार्मव्हील बद्दल अधिक माहिती..
www.farmvillefreak.com
www.thefacegamer.com

बुशेल्स बद्दल माहिती:
शेतात फार्मर्स मार्केटचा तंबू लावावा (मार्केट मधुन विकत घेऊन) त्यानंतर त्यात ३ ऑप्शन्स आहेत ..

१. My Bushels मध्ये आपण जमा केलेली बुशेल्स दिसतील. ती नंतर वापरता येतात.

२. My Stall मध्ये आपल्या शेतातली बुशेल्स शेअर करण्यासाठी असतील .. बाकीचे शेतकरी ते घेउ शकतात .. त्यांनी घेतलीत की आपल्याला फार्मर्स मार्केटवर एक बाण दिसेल (जॉब पुर्ण झाल्यावर दिसतो तसा)
.. त्यातुन ३ गिफ्ट ऑप्शन मिळतील .. कॉईन्स, १५ युनिट्स फ्युएल (कॅन्स नाही) किंवा १० एक्स पी पॉइंट्स ..

३. त्यात Get Bushels वरुन वेगवेगळी बुशेल्स मिळतील .ती जमा करायची .. हे होम पेज वरच्या फीड्स मधुन पण करता येतं.. ही आपल्या शेतात वापरायची ..
->कुठलंपण पीक कापण्यापुर्वी My Bushels मधुन त्याच पीकाचं Use Bushel करायचं .. ते २ तास काम करते .. त्यामुळे जर त्या पीकाची मास्टरी झाली असेल तर कापतांना १ जास्तीचा एक्स पी मिळतो .. नसेल तर १ जास्तीचा मास्टरी पॉईंट मिळतो .. तसच लॉक्ड असलेली पीकं पण पेरता येतात आणि त्यांची मास्टरी पण मिळवता येते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला.. हा बाफ कसा काय वर आला एकदम.. Happy
लोकं खेळतात का अजून ? मी मधे एकदा शेतात जावून जुने दिवस आठवून आलो.. Proud

स्वप्निल, द शेतकरी आणि त्याच्या शेतकरणीचं अभिनंदन.. आणि शुभेच्छा. Happy

अरे लोक्स, मी बंद केली होती शेती सहा महिने. सहज चक्कर मारायला गेले नि अडकले =))

माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की....
झाडाने दिलेल्या सोन्याचे काय करायचे ? साठवायला हंडा नसेल तर ?
हे बावळट लोक्स ( फार्मविले बनवणारे ) त्याचे दागिने पण करू देत नाहीत !!!!

शेतकर्‍यांच्या नेत्याचं मनापासून अभिनंदन. आता शेतकरणीच्या मदतीने हा शेतकरी त्याचं शेती अजून जोमाने करेल यात शंकाच नाही.

मला शेतात friends ची आवश्यक्ता आहे...वर जी नाव दिली आहेत ती facebook वर कशी ओळखची.

मी सुद्धा farmville खेळत होते. 173 level पर्यंत आले पण नंतर वाटले खूप झाले खेळून .... आता थांबायला हवे..म्हणुन खेळणे बंद केले. १ वर्ष झाले, आता हा बाफ वाचुन परत शेतात जाऊन यावेसे वाटत आहे.