साडेसाती - शनिकृपा

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 6 April, 2010 - 06:08

शनिकृपा
आपण मागील लेखात कृपाळू शनिची कर्तव्यनिष्ठ कार्यप्रणाली वाचलीत. लहान-थोर, गरीब-श्रीमंत प्रत्येकाचे आपल्या समस्यांचा जनक शनि असे ठाम मत झालेले आहे. हे सार्वत्रिक मत बदलावे या साठी हा लेखन प्रपंच करत आहोत.

मानव आपल्या स्वार्थलोलुप स्वभावधर्मानुसार गैरमार्गाने प्रगतीच्या वाटा पादाक्रांत करत जातो, आणि कर्मफलाचा न्याय निवाडा होताच. शनिला आरोपीच्या पिंज यात उभे केले जाते. आपल्या मनाला ,विचाराला मानवतावादी दृष्टीकोन प्राप्त व्हावा. आपणास नर का नारायण होण्याची सुवर्णसंधी प्राप्त व्हावी यासाठी शनिमहाराज सदैव प्रयत्नशील असतात. त्यांचा उदात्त हेतु आपण लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. शनिकृपेची उत्तम लक्षणे म्हणजे मानवाकडे असणारा सकारात्मक दृष्टीकोन, अभेद्य इच्छाशक्ती, अपयशाची कडूगोळी पचवण्याची मनःशक्ती. आपल्यामध्ये असणारे हे गुण विकसीत करणे हे प्रत्येकाचे प्रधान कर्तव्य आहे. असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी या पुरुषार्थच्युत विचारसरणीचा शनिने निषेध केला आहे, हे विसरून चालणार नाही.

आपणास शनिकृपेस पात्र होण्याची इच्छा असेल तर काय करणे शक्य होईल याचा विचार करू. शनिमहाराज प्रयत्नशील राहण्याचा सल्ला देत असल्याने कोणत्याही क्षणी दैववादाच्या आहारी न जाता, प्रयत्नात सुसूत्रता आणणे हा शनिस अत्याधिक प्रिय उपाय ठरतो. दैवी उपाय ,शनिसेवा करण्याची इच्छा असेल तर आपण सत्यवचनी असणे अत्यावश्यक आहे. शनिकृपेसाठी औषधी स्नान करण्याचे विधान आहे, यासाठी काळे तीळ, काळे उडीद, लवंग, सुगंधीत पुष्प या वस्तु लोखंडी बादलीत पाण्यात भिजवाव्यात व त्या पाण्याने दर शनिवारी स्नान करावे.स्नान करताना ॐ शनैश्चराय नमः। हा मंत्र म्हणावा. हा उपाय अतिशय सोपा असला तरी त्याचा अनाकलनीय लाभ झाल्याचे अनुभवास आले आहे. आजच्या शनैश्चर जयंतीच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर काळे उडीद, तीळ तेल,काळे उडीद , काळे कापड, लोह पात्र, या वस्तु शनि मंदिरात दान कराणे.

शनिकृपेसाठी आपण नित्य खालील तुलसीदास महाराजकृत रचना रोज १००८ वेळा म्हणण्याची सवय केल्यास उत्तम लाभ होईल.
सुमिरी पवनसुत पावन नामू। अपने बस करि राखे रामू॥

नवग्रहस्तोत्रातील शनिमंत्राची mp3 फाईल या लिंक वर मिळेल -
http://www.divshare.com/download/10977561-09f

ॐ शनैश्चराय नमः। या शनिमंत्राची mp3 फाईल या लिंक वर मिळेल -
http://www.divshare.com/download/10983523-16d

Vikramaditya Panshikar
Pedne - Goa
9049600622
Skype ID - vikram.panshikar

गुलमोहर: