कालसर्पयोग - सत्य परिस्थिती
आपल्या सभोवताली प्रत्येकाचा यशाचा पाठलाग करण्याचा दिवसरात्र प्रयत्न सुरु असतो. अपयशाची मालिका खंडित करुन विजयोत्सवाचे स्वप्न साकार करणे हे उदिष्ट आपणास सतत कार्यप्रणव करत असते. अशा वेळी आपण जन्मकुंडलीतील ग्रह काय म्हणतात ? याचा शोध घेतो. आपल्या समस्यांचे कारण कालसर्प योग आहे. असे सांगितले गेले कि आपल्या डोक्यात निराशेचे तांडव सुरु होते. आता आपले आयुष्य निराशेच्या विळख्यात गुरफटले जाणार हि भीती अधिकच गडद होते. उत्साही मनास निराशेचे पाझर फुटण्या पूर्वी कालसर्प योग म्हणजे काय आणि तो खरच अस्तित्वात आहे काय ? याचा विचार करणे नितांत गरजेचे आहे. आपल्या पत्रिकेत राहू व केतु याच्या मध्ये सर्व ग्रह असतील तर कालसर्प योग होतो , परंतु सर्वात शीघ्रगती ग्रह चंद्र सव्वादोन दिवसात एका रास बदलतो. यामुळे चंद्रासह रव्यादिग्रह निश्चीतपणे १५ दिवस एकाच बाजुला असणारा काळ केव्हा तरी असणारच. या काळात सर्वांनांच कालसर्पयोगाने भयावह फळ मिळेल असा अंदाज वर्तवणे अशास्त्रीयच म्हणावे लागेल. कारण लग्नबिन्दु, ग्रहांचे स्थानबल, नवमांश विचार, अष्टकवर्गपद्धतीनुसार बलाबल, नक्षत्रनिहाय फल , महादशा विचार या सर्वांची फलश्रृती आपणास विचारात घ्यावीच लागेल. केवळ कालसर्पयोग म्हणून आशेचे किरण आपणास दिसणार नाहीत असा समज करु नये. कारण ह्या योगास अधिकृत असा दाखला उपलब्ध होत नाही. या योगाचे भय विनाकारण लोक मनात बाळगतात. स्वतःच्या ,कुटुंबाच्या,मुलांच्या कल्याणासाठी अनेक खर्चिक उपाय करण्यास भयापोटी तयार झालेले दिसतात. आपण सर्वथा निराधार अशा या कालसर्पयोगाचे भय न बाळगता ,
आपले जीवन सुखसंपन्न होण्यासाठी पापनिष्कृती कशी होईल याची विचार करण्यावर भर देणे गरजेचे आहे. आपल्या पत्रिके नुसार आपल्या प्रगतीत अडसर येण्यास जी विविध कारणे असतात ती दूर होण्यासाठी आपली नित्य ईशसेवा गरजेची ठरते. केवळ मोठे खर्चिक विधी करुन फळाची अपेक्षा करणे हे योग्य ठरणार नाही.
मोहि समान को पाप निवासू। हा रामचरितमानस मधील पापनिष्कृती करणारा मंत्र सर्वशक्तीनीशी रोज म्हणावा . यामुळे पुण्यकर्म करण्याची प्रेरणा तर मिळेलच, पण आपल्या प्रगतीस निसंशयपणे चालना मिळेल. सर्वसमस्यांवर मात करण्याचे सामर्थ्य मनात निर्माण होईल.आपण हा साधा, सोपा, केवळ श्रद्धेची पुंजी लागणारा उपाय केल्यास यशाची महाद्वारे आपणास खुली होतील.
विक्रमादित्य पणशीकर
पेडणे गोवा
panshikar999@gmail.com
skype id -vikram.panshikar
9049600622
>>>> परंतु सर्वात शीघ्रगती
>>>> परंतु सर्वात शीघ्रगती ग्रह चंद्र सव्वादोन दिवसात एका रास बदलतो. यामुळे चंद्रासह रव्यादिग्रह निश्चीतपणे १५ दिवस एकाच बाजुला असणारा काळ केव्हा तरी असणारच.<<<<
गेल्या शतकात म्हणजे १९०१ ते २००० दरम्यानच्या १०० वर्षात असे किती कालावधी येऊन गेले याची मोजदाद सहज शक्य आहे का? माहिती करुन घ्यायला आवडेल!
पणशीकरजी, ज्योतिशाच्या
पणशीकरजी, ज्योतिशाच्या तांत्रिक बाबतीत न पडता तुम्ही सुगम रीतीने सांगितले ते आवडले. हा प्रकार मुळी काही पोटभरू मंडळी नी सुरू करून दिला आहे . त्यावर ते कोट्यधीश झालेले मी पाहिले आहेत. ह्या सर्पयोगावर उपायही काही विशिष्ट क्षेत्रात आणि विशिष्त पुरोहितांकडूनच का व्हावे यातच खरे इंगित दडलेले आहेत. आणि तिथेच या विधीचा उगम आहे...
टोणग्याच्या पोस्टशी मी सहमत
टोणग्याच्या पोस्टशी मी सहमत नाही!
याउलट चार्वाक-चार्वाकीणी / मन्डनमिश्र-मिश्रीणी काय? कोणत्याही युगात मन्दिरापासून दारुच्या गुत्त्यापर्यन्त अन मायबोलीच्या कविता विभागापासून जाचक बीबीपर्यन्त कुठेही भेटू शकले/शकतात! कलियुगात तर खात्रीने! 
बाकी टोणग्यान्चा तसे पहाता भूतभविष्याशी सम्बन्ध नसून केवळ वर्तमानाशी अस्तो याचि पक्की खात्री असल्याने या विषयावर टोणगे अन केवळ वर्तमानात जगणार्या आधुनिक चार्वाकान्शी मला चर्चा करायचीही नाहीये!
कारण स्पःष्ट आहे, मी जरी आद्य शन्कराचार्यान्च्या गुरुवार या जन्मवारी, कृष्ण पन्चमी या जन्मतिथी वा आर्द्रा या जन्मनक्षत्री श्रीमतआद्यशन्कराचार्यान्चेच चरणी जन्मलो असलो तरीही, मी शन्कराचार्य नाहीये याचे मला भान आहे!
.
.
लिंबु दा... पणशीकरदादा
लिंबु दा...
पणशीकरदादा माहितीसाठी आभार !
मी ज्योतिष शिकलो. याबाबतीत
मी ज्योतिष शिकलो. याबाबतीत कै. धुंडीराजशात्री दाते ( सोलापुरकर - पंचाग कर्ते ) यांनी कालसर्पाची भिती व त्यावरचे उपाय याचे खंडन केल्याचे स्मरते. हा लेख एका वर्षाच्या पंचांगात लिहुन आला होता.
बराच विचार केल्यानंतर असे वाटते की लोकांच्या अपेक्षा आजच्या काळात खुपच वाढल्या आहेत. ज्याला त्याला असे वाटते की मी यशस्वी व्हावे. पत्रिकेत मुळचे बलवान राजयोग, गजकेसर योग नसताना यशाचा दर्जा सुमार रहातो. यात काहीतरी शास्त्राधार नसणारे लेख लिहुन शंकेत टाकणारे महाभाग खुपच आहेत.
माझा रोख पुण्याच्या एका कालसर्प व नारायण नागबली स्पेशालिस्ट कडे आहे ज्यांनी १४४ प्रकारे कसा कालसर्प योग पत्रिकेत येतो याबाबत मागे एकदा लिहीले होते. हे नियम सर्वच पत्रिकांना लागु होऊन नवशिकातर गोंधळुन जातो.
प्रत्येकाला हमखास यश कसे मिळावे ? प्रत्येकाने आपले अपेक्षांचे गाठोडे व उपलब्ध साधने, कौशल्ये, इच्छाशक्तीनुसार स्वत:ला तपासावे की हे यश मिळवण्यास आपण लायक आहोत का?
एका उदाहरणाने आपली खात्री पटेल. माझ्या मित्राची मुलगी जी बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट होते आहे, एका दुकानात एक वस्तु आणायला गेली. घासाघीस न करता तिने एक वस्तु आणली. तिचे वडील म्हणाले घासाघीस का नाही केलीस ? ती म्हणाली मला ते भिक मागितल्यासारखे वाट्ते. व्यापारात यशस्वी व्हायचे असेल तर ही चुकीची अॅटीट्युड मुळातच निर्माण व्हायला नको. पण त्यासाठी व्यापाराची पॅशन हवी. लहानपणा पासुन जेव्हा असे व्यवहार पाहिले जातील, केले जातील तेव्हा ही अॅटीट्युड निर्माण होईल. नोकरदार आपल्या मुलांना सर्व व्यवहारापासुन लांब ठेवतात. साधी पेन्सील सुध्दा मुलांना शाळेच्या काळात स्वतः खरेदी करु देत नाहीत आणि अपेक्षा व्यवसायात यशाची ठेवतात. कसे मिळणार यश ? मग पत्रिका, खडे नको त्या गोष्टी.
जेव्हा आपण परंपरागत व्यवसाय करतो तेव्हा या गोष्टी आपोआप येतात. शिकाव्या लागत नाहीत. पण परंपरा सोडुन जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा पॅशन/ अॅटीट्युड या त्या व्यवसायाच्या ज्ञानाइतक्याच महत्वाच्या असतात ज्या अभावी अपयश येऊ शकते.
विषयांतराचा धोका टाळण्यासाठी माझे मत आग्रहाने मांडतो. ( वाचण्यासाठी फक्त ) चर्चेसाठी नाही.
याबाबत कै. धुंडीराजशात्री दाते ( सोलापुरकर - पंचाग कर्ते ) लेख प्रमाण मानावा हे सांगणे आहे.
नितीनचिंचवड
नितीनचिंचवड
नितीन सुन्दर संयमित लेखन.
नितीन सुन्दर संयमित लेखन. काही मतभेद असूनही लेखना अॅप्रोच आवडला. नाहीतर लिम्ब्याचे पोस्ट एखाद्या चावर्या श्वानाप्रमाणे लेखन...
कालसर्पयोग , पत्रिकेतील मंगळ
कालसर्पयोग , पत्रिकेतील मंगळ यावर चर्चा व्हायला हवीच . परंतु ती अभ्यासु रीतीने व्हावी एवढीच अपेक्षा .