(मी मोर्चा नेला नाही..) मी पोळ्या केल्या नाही...

Submitted by रेणू on 31 March, 2010 - 00:35

मूळ कविता :

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

-Sandeep Khare
-----------------------------------------------------------------------
संदीप खरे यांची माफी मागून,

मी पोळ्या केल्या नाही, मी पुरणही केले नाही
मी कणीक सुध्दा साधी, कधी तिंबवलेली नाही

भवताली घाई चाले, ती विस्फारुन बघताना
कुणी भाज्यांवर् चिडताना, कुणी कलथ्याने लढताना
मी कलथा होऊन बसले, बेसिनच्या बाजूस जेव्हा
तो हलवायाला देखिल, मज कुणी उचलले नाही Angry

बेशिस्त आळशी आहे, पळी-भांडी कुठल्या कोठे
पावसात हिरवा पाला, थंडीत ब्रेडवर भागे Sad Sad
पण पोटातून कुठलीही, पचल्याची चिन्हे नाही!
कुणी वैद्य भेटला नाही, अन् वैदुही पळून जाई Angry

कुठलासा इडली-डोसा, रामेश्वर ही काशी Happy
ओठांवर अजून फिरते, सदृश्य घाणशी माशी Angry
मी पिझ्झा करण्या भ्याले, मी अंड्यालाही भ्याले
मी मनात सुध्दा माझ्या, कधी भात शिजवला नाही

मज जन्म मुलाचा मिळता, मी 'दाम्ले' झालो असतो
मी असते जर का मुलगी, 'लाडांची कविता' असते Sad Sad
मज पैसा देऊन कोणी, खाण्या फ्री दिधले नाही
(हाय, हाय!) मी मुलगा झालो नाही, मुलगीही झाले नाही

-रेणुका (ख-रे) खटावकर-रेपाळ..
३०/०३/२०१०

आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, गैरसमज नको.. Happy

गुलमोहर: 

Pages