सदस्यत्वाचे नाव कसे बदलावे / देवनागरीत कसे तयार करावे?

Submitted by मदत_समिती on 24 March, 2008 - 17:58

१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)

नंद्या, मी ते बदलून पाहीलं. ("नुकताच केलेला बदल साठवला आहे" हा मॅसेजसुध्दा आला.) पण आयडी काही बदलला नाही...........जैसे थे!!!!!!!

मी नवीन सदस्य नोंदणी करीत असताना चुकुन माझे नाव प्रज्ञा कुलकर्नि असे झाले आहे ते बदलुन प्रज्ञा कुलकर्णी असे पाहिजे. ते कसे बदलयचे?

मी नवीन सदस्य नोंदणी करीत असताना चुकुन माझे नाव प्रज्ञा कुलकर्नि असे झाले आहे ते बदलुन प्रज्ञा कुलकर्णी असे पाहिजे.
तसेच गावाचे नाव "पुने " असे लिहिले गेलेय ते "पुणे' असे पाहिजे.
ते कसे बद्लायचे?

मायबोलि - स.न.
"माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.

या प्रकारे स्वत:चे सदस्यनाम आपणच बदलू शकता. माझे सदस्यत्व हा मेन्यू तुम्हाला सर्वात उजव्या बाजूल दिसेल.

Thanks! नंद्या , तुम्ही सांगीतल्याप्रमाणे केले. बरोबर झाले. मी नविन member असुनहि लगेचच मदत केली. Thanks again!

१ सजेशन आहे,

मायबोलीवर लॉगिन करताना,
बाय डीफॉल्ट 'इंग्रजी' भाषा सिलेक्टेड असते.
मी पाहिलेले मायबोलीवरची ९०-९५ टक्के सदस्य नावं मराठीमध्ये आहेत, त्या सर्वांना लॉग-इन करताना प्रथम भाषा बदलावी लागत असणार.
म्हणून मला असं वाटतं की मायबोलीवर लॉगिन करताना, बाय डीफॉल्ट 'मराठी' भाषा सिलेक्टेड असावी.
ते ९०-९५ टक्के सदस्यांना सोपं पडेल.

bnlele नमस्कार,

तुम्ही लेखाची लिंक [URL] जशी ब्राउजरमध्ये दिसते तशीच्या तशी देऊ शकता. तुम्ही तुमच्या सदस्यत्व खात्यातील मायबोलीवर केलेल्या समग्र लेखनाची लिंक देऊ इच्छित असाल तर ते मात्र सदस्यांनाच दिसते, त्या करिता ज्यांना लिंक द्यायची त्यांनी मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. सदस्यत्व फुकट आहे. फेसबुकवर लिंक देण्याविषयी माहिती तुम्हाला आवडलेलं लेखन, मायबोलीबाहेरच्या मित्रमंडळींना सांगायची सोय. या दुव्यावर सापडेल.

चेरी , नमस्कार

आपण मायबोलीकरांविषयी जागरुकतेने केलेल्या विचाराबद्दल आभारी आहे. मायबोलीवर प्रवेश करताना (लॉगिन) एक महत्वाचा बदल. या दुव्यावर लिहीलेल्या माहिती अनुसार प्रथम पानावर भाषा इंग्रजी आहे, जेणेकरून तुम्ही दिलेला ईमेल वापरून लॉगिन होणे सोपे जावे. आतील पानांवर भाषा मराठी आहे.

-मदत_समिती.

@प्राची ,तुम्ही तुमचं नाव स्वत: बद्लू शकता....
तुम्ही,
माझे सदस्यत्व इथे जाऊन संपादन मधे जा आणि ... तुम्हाला हवं असलेलं नाव घ्या.. आणि ते सेव्ह करा... Happy

Pages